ध्यानाद्वारे सृजनात्मकता मिळावा /सृजनात्मकतेला स्पर्श करा

सर्जनशीलता ही एक अद्भुत जादुई कांडी आहे जी जटिल समस्यांवर उपाय म्हणून मंथन करते, आश्चर्यकारक निर्मितीबद्दल भुरळ घालते आणि आपल्या जादूच्या स्पर्शाने आपले मन जागृत करते..आपल्यापैकी बऱ्याचजणांना त्याची इच्छा आहे, पण आपल्यापैकी बरेचजण असे गृहीत धरतात किंवा समजतात कि हि  देणगी  काही  ठराविक लोकांनाच  मिळालेली आहे. पण, जन्मतःच हि देणगी आपल्या सर्वांकडे  आहे हे तुम्हाला  माहित आहे का?

सृजनात्मकतेचा उपजत स्रोत 

चेतनेच्या प्रत्येक स्तरावर सृजनात्मकता  आधीपासूनच विद्यमान आहे - उर्जेचे क्षेत्र जे आपल्या शरीराच्या पलीकडे जाते. ज्यांनी कोणी काही शोध लावले आहेत किंवा सृजनात्मकतेचे क्षण अनुभवले आहेत त्याचे कारण म्हणजे ते पूर्वीपासूनच त्यांच्या चेतनेमध्ये आहेत. आपण आपल्या सर्जनशील परिणामांचे जे श्रेय घेतो त्याचे कारण आपण आधीच असलेल्या ज्ञानाचा वापर केलेला असतो.सर्जनशीलता फक्त वाहते, आणि कला घडते. वैज्ञानिक शोध असू दे किंवा कला, गूढवादाची सुरुवात एकाच प्रश्नाने होते- ह्याचे मूळ काय आहे?

गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात: आपण जेवढा  जास्त विश्राम /आराम आपल्यामध्ये करतो ; तेवढी जास्त रचनात्मकता आणि आनंद आपल्यामधून बाहेर येऊ शकतो. पण जर  सृजनात्मकता नसेलच तर ती तुम्ही दुसरीकडून कुठूनही आणू शकत नाही. हे असे आहे कि मक्याच्या दाण्यांना उष्णता दिली तर  त्यांचे 'पॉपकॉर्न' होतात. त्याचप्रमाणे, देहभानात अंतर्निहित सर्जनशीलता असते. स्रोत अज्ञातच आहे.आपल्यातील  या अज्ञात क्षेत्राचा स्पर्श अथवा तो मिळवणे ध्यानाद्वारे सहज होऊ शकतो.  ध्यानामुळे सृजनात्मकतेचा उदय होतो.

             " नवीन शोध आणि  सृजनात्मकता आपल्यामधून प्रकट होतात

             आणि अध्यात्म - आपल्यास्वतःला जाणून घेण्याचा अभ्यास  - 

             हे साधन किंवा तंत्रज्ञान आहे त्या स्रोताला स्पर्श करण्याचे, मिळविण्याचे. " 

                                                      -गुरुदेव श्री श्री रविशंकर  

ध्यान आणि सृजनात्मकतेचे तंत्र

ध्यान सहजतेनेच घडते , कुतूहल म्हणजे, मनाच्या स्तरावर जेवढे कमी प्रयत्न, तेवढे जास्त चांगले परिणाम. जेव्हा कोणतीही गोष्ट सोडून दयायला आणि  आराम करायला शिकते , तेव्हा कल्पनांचा उदय होतो. जर तुम्ही निरीक्षण केले असेल, कि जेंव्हा तुम्ही काही विसरता, जेवढे जास्त प्रयत्न तुम्ही आठवण्यासाठी करता, तेवढा जास्त वेळ ते आठवण्यासाठी लागतो? जेवढे लवकर तुम्ही ते सोडता, तेवढे पटकन तुम्हाला ते आठवते. तथापि, आपल्या मनाला त्याच्या जागरूक तासांमध्ये विश्राम करण्याची सवयच नसते.

आपले मन कायमच पुढे काय करायचे आहे याची यादी करण्यात व्यग्र असते किंवा भूतकाळात घडलेल्या गोष्टींचे चिंतन करत असते.अगदी आपल्या झोपेतसुद्धा, स्वप्नरूपात मनाची घोडदौड सुरूच असते.त्याचाच परिणाम म्हणजे, आपल्यापैकी  बरेच जण सृजनात्मकतेच्या त्या सुफर्तीचा अनुभव घेऊ शकत नाहीत जो आपल्याला अपेक्षित असतो. इथेच ध्यान त्याची भूमिका पार पडते.

ध्यान आपल्या भटकणाऱ्या मनाला जाणीवपूर्वक विश्राम करण्यासाठी मदत करते. ध्यानामुळे  मन जेव्हा जाणीवपूर्वक विश्राम करते, रचनात्मकता नैसर्गिकपणे जागृत होते.

ध्यानाचा रचनात्मकतेकरीत वापर करण्यासाठी काही सूचना / सल्ले

  • तुमचे काम सुरु करण्याआधी ध्यान करा किंवा तुम्ही कामाला जाण्याआधी ध्यान करा. याच्यामुळे  मनाला अपेक्षित विश्राम अथवा आराम मिळेल.
  • लहान निर्देशित ध्यान तुमच्या कामाच्या इथे मधल्या सुट्टी मध्ये करा.
  • आर्ट ऑफ लिविंग हैप्पीनेस अँप्लिकेशनवर रचनात्मकतेसाठी ध्यान तुमच्यासाठी आहे  त्याचा वापर करा.
  • सहा महिन्यातून एकदा  मौन शिबिर करा.

 तज्ञांच्या सूचना  / सल्ले

१. उत्साही रहा: तुम्ही सृजनात्मकतेच्या अस्तित्वाच्या तत्वाच्या अगदी जवळ आहात.

२. शांततेचे परीक्षण करा: अगदी थोड्याशा वेळेची शांतता तुमच्या व्यग्र, चिंतीत मनाला विश्राम देते.

३.क्रियांमध्ये समतोल राखणे, विश्राम आणि योगा तुम्हाला आणखी  सृजनात्मक  बनविते.

पुढे जा , तुमच्या सृजनात्मकतेला स्पर्श करा. पुन्हा एकदा सर्वकाही आल्हाददायक आणि सजीव करा.
सीमा थानेदर, शिक्षक,द आर्ट ऑफ लिविंग यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे.