काश्मीर: बॅक टू पॅराडाइस संमेलन | Kashmir: Back to Paradise Conference

इंडिया

भारत,

काश्मीर : काश्मीर पुन्हा स्वर्ग बनेल

काश्मीर, ज्या भूमीत कधीकाळी संस्कृती,शांतता आणि वैचारिक वैविध्यता गुण्या गोविंदाने नांदत होती,त्या भूमीत गेल्या दोन दशकापेक्षा जास्त काळापासून संघर्ष सुरु आहे.तेथे अनाकलनीय असा अतिरेक आणि हिंसाचार सुरु आहे.यामुळे तेथील सामाजिक आणि सांस्कृतिक गुणवैशिष्ट्यांचा ऱ्हास तर होत आहे,तसेच तेथील आर्थिक आणि सामाजिक प्रगतीदेखील थांबली आहे.

जवळजवळ वीस वर्षापासून आर्ट ऑफ लिविंग काश्मीर खोऱ्यातील संघर्ष संपुष्टात येऊन स्थानिकांचे हितसंबंध जपण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.आत्ता तेथील स्थानिकांच्यात महत्वाकांक्षा जागऊन  त्यांना  आशावादी बनवणे गरजेचे आहे.

यासाठी एक पाऊल म्हणजे आर्ट ऑफ लिविंगने तेथील स्थानिकांची परिषद आयोजित केली आहे,

“काश्मीर : बॅक टू पॅराडाईज”

बुधवार दि.२३/११/२०१६

प्रमुख मार्गदर्शक : श्री श्री रविशंकरजी, संस्थापक,आर्ट ऑफ लिविंग

प्रमुख अतिथी : ना.श्री किरेन रिजीजू,केंद्रीय गृहमंत्री.

स्थळ : अभिनव थिएटर,कॅनल रोड,जम्मू.

परिषदेची उद्दिष्ट्ये :

  • काश्मीर खोऱ्यातील अर्थव्यवस्था,कलावैशिष्ट्ये,शिक्षण आणि रोजगार वाढीसाठी तेथील कला आणि संस्कृतीचा प्रसार करण्याबाबत चर्चा करणे.
  • शांत आणि समृद्ध काश्मीर बनवण्यासाठी उपायांवर सहयोगाबाबत चर्चा करणे.

परिषदेमध्ये संबंधित विषयांवर होणाऱ्या चर्चेशी संबंधित कागदपत्रांमध्ये असणारे मुदद्ये :

१) काश्मिरी संस्कृती : मध्य आशियाई विचारधारा आणि वैचारिक विविधता.

२ )काश्मिरी संघर्ष : आरंभ आणि दूरगामी परिणाम.

३ )काश्मीर : पुन्हा शांतता स्थापित होण्यासाठी सलोखा.

काश्मीर : प्रगतीसाठी एक पाऊल पुढे

या परिषदेमुळे जम्मू आणि काश्मीरमधील खालील विविध घटकांना एक व्यासपीठ प्राप्त होईल :

  • गुज्जर बकरवाल

  • शिक्षक आणि प्राध्यापक
  • व्यापारी संघटना
  • माजी दहशतवादी
  • दगडफेक करत असणारे
  • सुफी प्रतिनिधी
  • शीख,बौध्द इ. जातींचे प्रतिनिधी
  • राज्यातील निवडक सामाजिक संस्था
  • सुरक्षा सैन्याला सहाय्य करणाऱ्या संघटना
  • लेखक आणि कवी
  • युवा नेते
  • प्रसार माध्यमे
  • महिला
  • काश्मिरी पंडितांचे नेते
  • काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे प्रतिनिधी
  • काश्मीर मधील पर्यटन मध्यस्थांचे प्रतिनिधी
  • जम्मू आणि काश्मीर हॉटेल संघटनांचे प्ररीनिधी.

परिषदेमध्ये निव्वळ निमंत्रकांनाच प्रवेश असेल.इतर माहितीसाठी संपर्क :

sanjay.kumar@artofliving