अॅडव्हान्स प्रोग्रॅम्स (Advanced art of living programs in Marathi)

ब्लेसिंग प्रोग्राम

"“अशी स्थिती की ज्यावेळी तुम्हाला काहीही नको असते...त्यावेळी दिलेला आशीर्वाद / ब्लेसिंग सफल होणारच.”श्री श्री

ब्लेसिंग प्रोग्राम हा एक सूक्ष्म तरीही अतिशय प्रभावशाली प्रोग्राम आहे ज्यात अशा काही प्रक्रिया आणि ध्यान आहेत जे व्यक्तीला कृतज्ञतेच्या आणि परिपूर्णतेच्या स्थितीला नेतात. सहभागींच्या म्हणण्यानुसार त्यांनी भाग घेतलेल्या इतर कुठल्याही प्रोग्रामपेक्षा यात त्यांना त्यांच्याकडे आणि त्यांच्यातून प्रचंड प्रमाणावर वाहणारा कृपेचा ओघ जाणवला.

पूर्व अट –

  • आर्ट ऑफ लिव्हिंगचे दोन पार्ट २ प्रोग्राम झालेले असावे.

 

 

दिव्य समाज निर्माण / डी.एस.एन गुरु पूजा प्रोग्राम

डी.एस.एन एक असा एक खडतर व व्यक्तीमध्ये परिवर्तन घडवून आणणारा प्रोग्राम आहे ज्यामुळे व्यक्ती कणखर बनतो. आपल्याच मनातील संकोच व आपणच स्वत:वर लादलेले निर्बंध दूर होऊन आंतरिक शक्ती व स्थैर्याचा अनुभव सहभागींना येतो.

आपली प्रत्येकाची तीव्र इच्छा असते की आपण प्रत्येक बाबतीत उत्तम असावे – पण आपली स्वत:चीच काही बंधने, सवयी, भावनिक गुंतागुंत, भीती आणि संकोच असतात जे आपल्याला जीवन पूर्णपणे जगण्यापासून रोखतात.


ही बंधने मोडून काढण्यासाठी स्वत:ला सामर्थ्यवान बनवण्यासाठी आणि स्वत:ची आणि इतरांची सेवा करता यावी यासाठी डी.एस.एन.मध्ये योगासनाचा एक विशेष संच, प्रभावी प्रक्रिया आणि गहन आध्यात्मिक ज्ञान यांचा उपयोग केला जातो.

पूर्व अट –

  • आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅपिनेस प्रोग्राम (पार्ट १) किंवा यस!+ प्रोग्राम

 

 

गुरु पूजा प्रोग्राम:

आत्मज्ञानाचे भंडार असलेल्या गुरू-परंपरेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक पारंपारिक सोहळा म्हणजेच गुरुपूजा. श्री श्री रविशंकर जी यांच्या भगिनी भानुमती यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपुजा मंत्र पठण आणि पूजाविधी शिकवले जातात. गुरुपूजा मात्र पठाण करण्याने आपले मन या गुरुपरंपरेशी जोडले जाते. बऱ्याच सहभागींना या प्रोग्रामच्या दरम्यान पूजा करीत असताना दिव्यात्वाच्या अस्तित्वाची अनुभूती मिळते. या प्रोग्राम मध्ये सुंदर असे प्राचीन ज्ञान, गोष्टी असतात आणि त्यामुळे आपल्याला गुरूच्या अस्तित्वाची तीव्र जाणीव होते.
गुरु पूजा प्रोग्रामचे दोन भागांमध्ये आहे.
भाग पहिला : पहिल्या भागात पूजा मंत्राचे पठण शिकवले जाते आणि वैदिक रहस्ये आणि परंपरा यांचा शोध घेतला जातो.
भाग दोन : या भागात पहिल्या भागात शिकवलेल्या मंत्रांनी गुरुपरंपरेला पूजेच्या द्वारे आवाहन करण्याचे अधिकार प्राप्त होतात..

पूर्व अट :

  • आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक किंवा
  • टी.टी.सी.(पार्ट १) + आर्ट ऑफ लिव्हिंगचे २ अॅडव्हान्सड प्रोग्राम+ सहज समाधी ध्यान प्रोग्राम किंवा
  • आर्ट ऑफ लिव्हिंगचे ४ अॅडव्हान्सड प्रोग्राम + सहज समाधी ध्यान प्रोग्राम

 

 

 

इटरनिटी प्रोसेस

आत्मा अमर आहे आणि सध्याच्या शरीरात त्याचा वास होण्यापूर्वीही त्याचे अस्तित्व होते आणि या शरीराचा अंत झाल्यानंतरही तो असणार आहे. इटरनिटी प्रोसेस म्हणजे मागच्या जन्मात डोकावून पहाण्याचे तंत्र आहे. ज्याच्या मदतीने मागील जन्मातील घटना या जन्मातील साचेबंद वागणुकीचे मूळ कारण आहेत कां हे तपासून बघता येते. हे साचेबंद वागणे मानसिक किंवा शारीरिक असू शकतील जे बदलण्याची किंवा केवळ समजून घेण्याची गरज आहे. या प्रक्रीयेने सध्याच्या आयुष्यातील विकास रोखणारे भूतकाळातील संस्कार पुसून टाकण्यास मदत होते जेणेकरून जीवन परिपूर्ण आणि आनंदी होते.

इटरनिटी प्रोसेस हे शिक्षक व फक्त सहभागी अशातऱ्हेचे व्यक्तीगणिक सत्र चालते. ते अंदाजे २ अथवा ३ तासांचे होते.

पूर्व अट

  • आर्ट ऑफ लिव्हिंगचे पार्ट २ प्रोग्राम – तीन वेळा. त्यापैकी एक श्रीश्रींच्या सोबत.