जाणा आपल्या पाल्याला (Know your child program in Marathi)

माता पिता आपल्या पाल्यासोबत चांगला संवाद कसा साधू शकतील ?

आर्ट ऑफ लिविंगची छोटीशी कार्यशाळा या प्रश्नाचे संपूर्ण समाधान आहे, जी मुलांवर, त्यांच्या वागण्यावर आणि त्यांना प्रभावित करणाऱ्या मुद्यांवर प्रकाश टाकते. मुलांचे पालन-पोषण प्रभावी, निष्पक्षतेने आणि मौज मजेने कसा करावे आणि मुलांना समजून घेऊन त्यांच्या प्रश्नांना कशी उत्तरे द्यावीत हे सर्व या कार्यशाळेत सहजतेने शिकवले जाते.

‘जाणा आपल्या पाल्याला‘ कार्यशाळा ज्यांना ८-१३ वयोगटातील मुले आहेत त्यांना उपयोगी आहे. एका बालकाचा दृष्टीकोन प्रौढ व्यक्तीपेक्षा नक्कीच वेगळा आणि आश्चर्य, विस्मय, भोळेपणा, खोडकरपणा आणि सहजतेने युक्त असतो. सुरवातीच्या वर्षांमध्ये पालक आणि शिक्षक यांचा बालकाचे संगोपन आणि मनोविश्व यांच्यावर मुख्य प्रभाव असतो. तरीदेखील प्रौढ आणि बालक यांच्या दृष्टिकोनामध्ये मुलभूत भेद असतो. वेळ जाईल तसे मुल आपल्या वातावरणाला जास्तीत जास्त स्वीकारत असतात आणि आपल्या निरीक्षणाप्रमाणे व्यक्त होण्यास सुरवात करत असते.

सांस्कृतिक गैर समजुतीमुळे मुलांना वाटू लागते की त्यांना काही समजेनासे झाले आहे आणि पालक त्याच्या या कृत्यामुळे नाराज होऊ लागतात. हा संस्कृतिक गैर समज वाढू लागला तर मुले आणि पालकांच्या संबंधामध्ये बाधा येऊ शकते आणि कौटुंबिक जवळीक कमी होऊ लागते.

‘जाणा आपल्या पाल्याला‘ कार्यशाळा पालकांनी मुलांना व्यवस्थित समजून घेण्यासाठी बनवली आहे जिच्यामुळे कौटुंबिक जीवन प्रभावीपणे सुधारण्यास मदत होते. ‘जाणा आपल्या पाल्याला‘ कार्यशाळेमध्ये मुलांच्या वागणुकीच्या मुळ कारणांना जाणून घेतले जाते आणि मग माता पिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासामध्ये सहयोगी बनतात. जसजसे ते मुल किशोर, युवा आणि प्रौढ बनत जाते यामध्ये जाणून घेतलेल्या बाबी त्यांच्या संबंधातील माधुर्य वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

लाभ 

‘जाणा आपल्या पाल्याला‘ कार्यशाळा प्रत्येक पालकांना मदत करते :

  • पाल्यांना चांगले समजून घेण्यास.
  • हे जाणून घेण्यासाठी की मुले अशी कां वागतात,
  • मुलांच्या पालन-पोषणात योग्य निर्णय घेण्यासाठी,
  • मुलांच्यासोबत मस्त वेळ व्यतीत करण्यासाठी.

कालावधी 

२ तास ३० मि. ची परस्पर संवादाची कार्यशाळा.