मेधा योग भाग-१ | Medha Yoga Level 1 | Mindfulness programs for children in Marathi

युवकांवर समवयस्कांचे दडपण खूप जास्त असते. त्याचप्रमाणे परीक्षा, पालक, नातेसंबंध, खेळ आणि प्रवेशपरीक्षा या गोष्टींचेही दडपण येते. तर मग या सगळ्यांबरोबर तुम्ही कसे काय जुळवून घेऊ शकता? ‘मेधा योग भाग-१’ कार्यशाळेत तुम्हाला सोप्या योगासानांच्या द्वारा शारीरिक सामर्थ्य, शुद्धीकरण करणाऱ्या प्राणायाम व सुदर्शन क्रिया यांच्याद्वारा, मानसिक आणि भावनात्मक सामर्थ्य मिळते.

सांघिक खेळ आणि देवाण-घेवाणीच्या प्रक्रिया, आणि गट चर्चेमध्ये मजा करत करत, आयुष्यावर परिणाम करणाऱ्या मुद्द्यांचा उहापोह करा. उदाहरणार्थ मैत्री आणि नातेसंबंधाना हाताळणे, जास्त एकाग्रतेने अभ्यास कसा करावा, पूर्ण क्षमता वापरून काम कसे करावे इत्यादी.

सुदर्शन क्रियेमार्फत योग्य निर्णय घेण्याची क्षमता कमवा. साध्या सोप्या तंत्रांनी अस्वस्थतेवर मात करा आणि सभाधीटपणा मिळवा. स्वतःवर प्रेम करायला शिका, इतरांबरोबर वाटून घेणे शिका आणि कपाळावर आठ्या पाडण्याऐवजी हसत हसत समस्येला सामोरे जाणे शिका.

या आणि जगाकडे निराळ्या दृष्टीकोनातून बघा.

 

 

  • फायदे
  • संक्षिप्त विवरण
  • कार्यक्रमाचा आशय
    • आत्म सन्मान वाढविणे आणि त्याचे संगोपन करणे
    • सांघिक कार्य, सहकार्य आणि अशाच जीवनात उपयोगी पडणारे कौशल्य वाढविते
    • दैनंदिन प्रश्नांवर साधे सरळ तोडगे
    • ताण-तणाव कमी करून स्व ला मुक्त आणि हलके करणे
    • नकारात्मक भावनांना सहजपणे हाताळणे
    • अभ्यासाबाबत सूचना
    • एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढविण्यासाठी सूचना
    • समवयस्कांचा दबाव हाताळण्याची कला
    • कुठल्याही परिस्थितीत हसतमुख राहणे
    • शरीराला आणि मनाला उर्जा मिळते
    • फक्त स्वत:बद्दल नाही तर दुसऱ्याबद्दल विचार करण्याची सवय लागते
    • नकारात्मक कमी होऊन सकारात्मकता वाढते
    • वयोमर्यादा १३ ते १८ वर्षे
    • ४ ते ६ दिवसांची कार्यशाळा
    • दिवसा ३ ते ४ तास
    • सुदर्शन क्रिया
    • ध्यान आणि नियंत्रित श्वसनक्रिया
    • रोजच्या आयुष्यात लागणारी साधे सरळ तत्वे
    • मानसिकता आणि एकाग्रते साठी तंत्र
    • भय आणि चिंता यापासून मुक्त होण्यासाठीचे तंत्र
    • देवाण-घेवाण कार्य पद्धती
    • सांघिक खेळ
    • आहारा विषयी जागरूकता
    • गट चर्चा
    • मैदानी उपक्रम
    • मौजमजा आणि खेळांमधून शिकवण
    • सेवाभाव जागवणे
    • नेतृत्व गुण आणि आत्मविश्वास वाढविणे