आम्ही युवकांचे सशक्तीकरण कसे करतो? (Youth Leadership training program in Marathi)

आम्ही लोकांच्या जीवनात बदल घडवतो

युथ लीडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम  (वाय.एल.टी.पी.)

जगात सर्वाधिक युवा लोकस्ंख्या भारत देशात आहे. भारतात सुमारे ४०% लोकसंख्या ही य़ुवा आहे (राष्ट्रिय  य़ुवा धोरणातील व्याखेनुसार). आमचा  युथ लीडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम  त्यांना आदर्श व्यक्ती बनवतो. आमच्या प्रात्यक्षिकांसहित घेतलेल्या सत्रांमुळे खेड्यातील आणि आदिवासी जमातीतील तरुण मुले व मुली सामाजीक आणि आर्थिक दृष्टया स्वावलंबी बनतात. त्यांचा आत्मविश्वास, उर्जा आणि उत्साह वाढतो. त्यांना व्यावसायिक कौशल्ये शिकविली जातात. नैसर्गिक साधन संपतीचा योग्य वापर कसा करावा हे शिकविले जाते.

आपले य़ुवा हे आपले भविष्य आहे. आर्ट आँफ लिविंगच्या प्रकल्पांना केलेली मदत म्हणजे भारताच्या उज्वल भविष्यiसाठी केलेली गुंतवणूक ठरेल.

आमची कामगिरी (वाय.एल.टी.पी. भारत):

    • १,१०,००० पेक्षi जास्त ग्रामिण युवकांना प्रशिक्षित केले.
    • ग्रामिण भागात ४०,००० पेक्षi अधिक प्रकल्प राबविले.
    • तेवीस लाखांहून अधिक झाडे लावली.
    • १,८०० हून अधिक घरे  आणि  ५,४०० शौचालये  बांधली, १,१०० कूपनलिका खोदल्या आणि ९०० बायोगॅस प्रकल्पांची निर्मिती केली.
    • ४८,००० हून अधिक स्वछता शिबिरे आणि २३,००० आरोग्य शिबीरांचा लाभ २५,,००,००० हून अधिक लोकांना झाला.
    • ५५ आदर्श गावे विकसीत केली जात आहेत.