आमचा व्यापक दृष्टिकोन (Art of living projects in Marathi)

आमचे काम कसे चालते?

समाजाला विशाल दृष्टीकोण देऊन,आदर्श व्यक्ती घडवून,समाज-जीवनाची भावना बळकट करून आणि लोकांना आपले विचार व्यक्त करायला संधी  देऊन आर्ट ऑफ लिव्हिंग समाजात परिवर्तन घडवून आणते.

आर्ट ऑफ लिव्हिंग–प्रकल्प व्यवस्थापन युनिट (प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट) : ही आर्ट ऑफ लिव्हिंग मधील एक विशेष तांत्रिक शाखा आहे जी सामाजिक,आर्थिक आणि पर्यावरणाच्या समस्यांवर समग्र उपायांची अंमलबजावणी करते.साधन संपत्ती उपलब्ध करून देणारे आणि समाज यामध्ये मध्यस्थ बनून समाज परिवर्तन घडवून आणणे हेच आमचे ध्येय आहे.या बरोबरच व्यक्तीचे सक्षमीकरण करणे,त्यांना जबाबदार बनवणे आणि बराच काळ चालतील असे प्रकल्प राबवणे या गोष्टींमुळे आमचे प्रकल्प यशस्वी ठरतात.

सक्षमीकरण मॉडेल :

Y.L.T.P. युथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम(युवा नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम)  द्वारे वाईट मार्गाला सहज आकर्षित होतील अशा तरुणांमध्ये परिवर्तन घडून येतो.त्यांना त्यांच्या समाजाचे नेतृत्व करण्याचे धडे दिले जातात.मग हेच तरुण समाजात बदल घडवून आणण्यासाठी कार्यरत होतात आणि आव्हाने स्वीकारतात.आम्ही या प्रशिक्षित नेत्यांसोबत काम करून त्यांच्या गावात सुधार योजना राबवण्यास मदत करतो.

प्रकल्पाची पूर्ण जबाबदारी :

आम्ही संपूर्ण प्रकल्पकाळात,प्रकल्पाची खाती आणि उपक्रमांचा अहवाल नियमितपणे पुरवत असतो. प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही जमाखर्चाचा एक अंतिम अहवाल सादर करतो, ज्यात प्रकल्प निधी कुठे आणि कसा वापरला हे प्रसिद्ध केले जाते.या टप्प्यादरम्यानचा एक विश्लेषण अहवाल  आम्ही सादर करतो.ह्या अहवालावरून हा प्रकल्प राबवण्यास आमचे मार्गदर्शन किती प्रभावी ठरले ह्याचे मूल्यमापन आम्ही करतो.यामुळे भविष्यातील प्रकल्पांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याण्यासाठी मदत होते.

कायमस्वरूपी विकास मॉडेल :

सामर्थ्यवान बनलेले आमचे युवाचार्य प्रकल्प संपल्यानंतरही स्थानिक समाजाला सदैव योग्य दिशा दाखवण्याचे काम करत असतात त्यामुळे आमचे कार्य दीर्घकाळ चालू राहते.