योगाच्या मदतीने सर्दीशी दोन हात (Home Remedies for Cold in Marathi)

ऋतू बदलला की त्या बरोबर होणारे आजार ही अगदी नेहमीची गोष्ट आहे. उन्हाळ्यानंतर पावसाळा आणि त्यानंतर हिवाळा. अशावेळी बऱ्याच जणांना सर्दी, ताप यांच्याशी दोन हात करावे लागतात. आपल्या शरिरातील प्रतिकारशक्तीमुळे असे आजार आपोआपच बरे होतात. पण तरीही त्यासाठी काही प्रतिबंधात्मक आणि बरे करणारे उपाय करणे जास्त चांगले. आधुनिक काळातील औषधे खूपच परिणामकारक असतात, पण आज तो काही एकमेव पर्याय नाही. लोक स्वत:ला बरे करण्यासाठी योगा सारख्या उपायांकडेही वळत आहेत आणि त्यांची प्रतिकारशक्ती वाढवत आहेत.

योग हे एक प्राचीन आणि विशेष असे तंत्र आहे, ज्याच्यामुळे सशक्त शरिर आणि एकाग्र मन तयार होते. सर्दीशी जास्त चांगल्याप्रकारे सामना करताना तुम्हाला उपयोगी पडणारी काही आसने अशी आहेत.

 

१. नाडी शोधन प्राणायाम

 

(अनुलोम विलोम) नाडीशोधन प्राणायाम केल्याने चोंदलेले नाक मोकळे व्हायला मांडत होते आणि फुफ्फुसांना जास्त प्रमाणात प्राणवायू मिळतो. याच्यामुळे मनावरचा ताण कमी होऊन शरिर मोकळे होते. सर्दीवर मात करण्यासाठी, दिवसातून दोन ते तीन वेळा, या प्राणायामाची या प्राणायामाची ७-८ आवर्तने करा.

 

२. कपालभाती

 

या शवासन प्रकारातील जोरात सोडलेल्या उश्वासामुळे श्वासमार्ग मोकळा होतो आणि सहजपणे श्वास घेता येतो. माज्जासंस्थेचे कार्य सुधारते, रक्ताभिसरण सुधारते. आणि मन प्रसन्न होते. दिवसातून दोन वेळा हे तंत्र वापरल्याने सर्दीशी सामना करताना नवी ऊर्जा मिळते..

 

३. हस्त पादासन

 

(उभे राहून पुढे वाकणे) उभे राहून पुढे वाक्ण्याचे आसन केल्याने डोक्याकडे जाणारा रक्तप्रवाह सुधारतो आणि सायनस ही नाकाची पोकळी साफ होते. याने मज्जासंस्थेला शक्ती मिळते आणि शरीरातील ताण नाहीसा होतो.

४. मत्स्यासन

 

या असानात केलेले दीर्घ श्वसनाने, श्वसनाचे आजार आणि सर्दी पासून आराम मिळतो. मत्स्यासनामुळे , शरीराला अतिशय त्रासदायक असणारा मान आणि खांद्यातील ताण नाहीसा होतो

५. विपरीत करणी

 
(आडवे झोपून पाय वर उचलणे) श्वासानाचे आजार दूर करण्यासाठी अतिशय परिणामकारक आसन म्हणजे विपरीत करणी. डोकेदुखी आणि पाठ दुखी दूर करण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे. याने मन शांत होते आणि सर्दीने बेजार झालेले असताना मन सशक्त ठेवते.
 

६. शवासन

 
योगासनांमध्ये सर्वाट शेवटी करण्याचे हे आसन आहे कारण त्यात शरिराला सखोल  ध्यानातील विश्रांती मिळते. या आसनामुळे शरीरातील ताण नाहीसा होतो आणि नव चैतन्य मिळते.
 

कोणत्याही ऋतूची सुरवात ही, ताप, सर्दी न होता अगदी मजेत घालवण्याची एक उत्तम संधी आहे. योगाच्या  नियमित साधनेमुले प्रतिकारशक्ती वाढते आणि जंतूसंसार्गाशी जास्त चांगल्या प्रकारे दोन हात करण्याची क्षमता वाढते.

प्राचीन आणि सर्वांगीण अशी नैसर्गिक अशी उपचार पद्धती, आयुर्वेद हाही प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी चांगला मार्ग आहे. अॅलोपॅथिक औषधांसारखे आजारावर तात्पुरते उपाय न करता आजारावर प्रतिबंधात्मक उपाय करून मूळ कारणच दूर कसे करायचे याची माहिती आपल्याला आयुर्वेदात मिळते.

नियमित सरावाने शरीर आणि मन यांचा विकास होतो आणि सोबत आरोग्याचा लाभ होतो पण हे औषधाला पर्यायी नाही. श्री श्री योग प्रशिक्षित शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली योग शिकणे व त्याचा सराव करणे हे अतिशय महत्वाचे आहे. वैद्यकीय समस्या असल्यास, योगाचा सराव करायच्या आधी डॉक्टर आणि श्री श्री योग शिक्षक यांचा  सल्ला घ्यावा. तुमच्या जवळील आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर मध्ये श्री श्री योग शिबिराचा शोध घ्या. तुम्हाला शिबिरांसंदर्भात माहिती हवी आहे का किंवा तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नोंदवायच्या आहेत का? आम्हाला info@srisriyoga.in इथे लिहा