चिंतायुक्त विकारावर मात करण्यासाठी ९ योग सूत्रे | Cure anxiety-disorder with yoga in Marathi

चिंता आणि तणाव यांपासून अगदी सहजपणे मुक्ती मिळवा, योगाभ्यासाद्वारे !

तणाव, भीती, चिंता - या भावना आपण आयुष्यात ज्या ज्या क्षणी अनुभवल्या ते क्षण मोजणे अशक्य आहे. बोर्ड परीक्षा किंवा प्रगती पुस्तकावर आपल्या पालकांची प्रतिक्रिया यांविषयीची चिंता किंवा नोकरीसाठी मुलाखतीपूर्वीची अस्वस्थता - आपण सर्वांनी हे क्षण आयुष्यात अनुभवले असतील. थोडीशी भीती ही साहजिक आहे, खरे तर जेवणात ज्याप्रमाणे मीठ त्याप्रमाणे आयुष्यात ही भीती आवश्यक आहे, ज्यामुळे आपण शिस्तबद्ध, केंद्रित आणि गतिशील राहतो.

समस्या तेव्हा सुरु होते जेव्हा ही भीती दीर्घकाळपर्यंत राहते आणि तिचा दररोजच्या जीवनात हस्तक्षेप सुरु होतो. तेव्हा ती चिंतायुक्त विकारांत रुपांतरीत होते म्हणजेच तीव्र बेचैनी किंवा अज्ञाताची भीती. अशी स्थिती आल्यावर उपचारांची गरज भासते आणि यामध्ये योग अतिशय उपयुक्त ठरतो.

हे माहित असणे गरजेचे आहे की फक्त योग हा उपचाराचा पर्याय नाही तर डॉक्टर किंवा तज्ञांच्या सल्ल्याने केलेल्या योग्य औषधोपचाराला पूरक म्हणून योग उपयोगात यावा. डॉक्टर तुम्हाला आजाराच्या स्थितीवर अधिक चांगले मार्गदर्शन करतील आणि चिंतायुक्त विकाराचा प्रकार समजण्यास मदत करतील. तुम्हाला खालीलपैकी काहीही असू शकते - Panic Disorder (अचानकपणे घबराट उडणे) Obsessive (एखाद्या गोष्टीबद्दल वाटणारं अत्याधिक आकर्षण) Compulsive (एखाद्या गोष्टीबद्दल वाटणारं अत्याधिक आकर्षण) Disorder (विकार), Post -Traumatic (एखाद्या क्लेशकारक घटनेमुळे बसलेला मानसिक धक्का / शारीरिक आघात) Stress Disorder (तणावामुळे जडलेला विकार, Social Anxiety (सामाजिक चिंता) Disorder (विकार), or Generalized Anxiety Disorder (सामान्य चिंता विकार)

टीप : अॅलोपाथिक औषधांचे अनिष्ट परिणाम होऊ शकतात . तुम्ही होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक यांसारख्या पर्यायी उपचारपद्धतीचा अवलंब करू शकता.

पुढचा लेख वाचा चिंतेवर मात करण्यासाठी सोपे आणि प्रभावी उपाय | Simple yet effective tips on how to overcome anxiety


चिंतायुक्त विकाराची लक्षणे | सामान्यीकृत चिंता विकार के उपचार

  • तुम्हाला अचानकपणे धास्ती, भीती आणि अस्वस्तता जाणवू लागते.
  • तुमचा संयम वारंवार सुटतो, भूतकाळात घडलेल्या अत्यंत क्लेशकारक घटनेच्या विचारांनी व्यापून जाता.
  • सततच्या भयानक स्वप्नांमुळे तुम्ही झोपेतून जागे होता.
  • सतत हात धुण्याची प्रवृत्ती वाढते.
  • झोपण्याची समस्या निर्माण होते.
  • अचानकपणे हात आणि पायाचे तळवे घामाने भिजणे.
  • सततची धडधड जाणवू लागते.

अस्वस्थेवर मात करण्यासाठी योगाभ्यास कसा फायदेशीर ठरू शकतो?

नियमित योगसाधना तुम्हाला दैनंदिन जीवनाचा शांत आणि तणावमुक्त राहण्यास मदत करते तसेच येणाऱ्या प्रसंगांना शांतपणे तोंड देण्याची शक्ती देते. आसने, प्राणायाम, ध्यान आणि प्राचीन योग तत्वज्ञान अशा संपूर्ण एकत्रित रित्या याचा योग साधनेत समावेश होतो, ह्या सगळ्यांचा उपयोग अनेक अस्वस्थ रुग्णांना सावरण्यासाठी आणि जीवनाला नवीन सकारात्मकता आणि ताकदीने सामोरे जाण्यासाठी मदत होते.

सुषमा गोयल या गृहिणीने सांगितले, "मी नेहमी टेंशन आणि जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींची चिंता करत बसायची. प्रत्येक छोटे मोठे प्रसंग माझा आत्मविश्वास हिरावून घेत असत. माझ्या पतीने डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा निर्णय घेतला ज्यांनी आम्हाला सांगितले की मला सामान्य अस्वस्थता (चिंता) विकार अहे. सहा महिने मी नियमित योग साधना आणि ध्यान यांच्याबरोबर अस्वस्थता विकाराच्या उपचारांमधून गेले. आणि आज मला माझा नवीन जन्म झाल्यासारखे वाटत आहे. माझ्या विचारपद्धतीत बदल झाला आहे, मला आतून अधिक शांत वाटत आहे. आणि मला विश्वास आहे की जे पण होईल ते चांगल्यासाठीच होईल. मला आता भविष्याची भीती वाटत नाही. योगाने मला ही ताकद दिली आहे.

सुषमाप्रमाणेच तुम्हीसुद्धा योगाच्या सहाय्याने सकारात्मक जीवन जगू शकता आणि भीतीवर मात करू शकता. खालील योगा तंत्रे अशांत मन शांत करण्यास मदत करतात.


आसनांच्या सहाय्याने शारीरिक सुयोग्य हालचाली करा आणि मन तणावमुक्त करा

ही yoga postures आनंदी मन आणि निरोगी शरीर, साध्य करण्यास योगासने मदत करतात. आसने शरीर व मनातून तणाव व नकारात्मकता घालवण्यास मदत करतात.

टीप : योगासन सत्राच्या शेवटी, शरीर व मनाला काही क्षण सखोल विश्रांती देण्यासाठी योगनिद्रेत झोपावे. हे तंत्र (टेक्निक) शरीरातील घातक द्रव्ये, जे तणावाचे प्राथमिक कारण आहे, ते बाहेर टाकण्यास मदत करते.


चिंतामुक्त होण्यासाठी योग्य प्रकारे श्वास घ्या (प्राणायाम करा)

श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने चिंता निर्माण करणाऱ्या अनावश्यक विचारांच्या गोंधळातून मन मुक्त होते.
खालील श्वसन तंत्रे (टेक्निक) करून पहावीत.

कपालभाति प्राणायाम
भस्त्रिका प्राणायाम
नाडी शोधन प्राणायाम – शरीर व मनातून ताणतणाव घालवण्यासाठी प्रभावी (जेव्हा बाहेर जाणारा श्वास हा आत येणाऱ्या श्वासापेक्षा लांब असतो).
भ्रामरी प्राणायाम


तणावमुक्त आनंदी मनासाठी ध्यान करा

गोंधळलेल्या मनाला आराम देण्यसाठी, तुम्हाला निश्चलता आणि मनःशांती देण्यासाठी आणि दैनंदिन जीवनात आजूबाजूच्या छोट्या, क्षुल्लक गोष्टींनी मन कसे व्यापून राहते याची जाणीव करून घेण्यासाठी, ध्यान हे एक उत्कृष्ट साधन (टेक्निक) आहे. ते तुम्हाला अतिकाळजी किंवा अज्ञात भविष्याची चिंता न करण्यासाठी मदत करते.

तुम्ही अनेकदा "अॅड्रीनालीन रश ही संज्ञा ऐकली असेल. हे तेव्हा घडते जेव्हा तुम्ही संभाव्य धोक्याबद्दल अतिशय चिंतित होता. उदाहरणार्थ जेव्हा धाडसी सफर (राईड) करायला निघतो, त्यावेळी अड्रीनालीन होर्मोन्सची पातळी वाढते, त्यामुळे ह्रिद्यस्पन्दने जलदगतीने होऊ लागतात, जे स्नायुंमध्ये तणाव निर्माण करतात आणि आपल्या शरीराला भरपूर घाम येऊ लागतो. संशोधनाने हे दाखवून दिले आहे की नियमित ध्यान साधना, या तणाव निर्माण करणाऱ्या होर्मोंसच्या पातळीत लक्षणीय घट आणण्यात मदत करते.


योग तत्वज्ञानाचा तुमच्या जीवनात अवलंब करा, आनंदी रहा आणि प्रत्येक क्षणाचा उपभोग घ्या

प्राचीन योग ज्ञान, ज्यामध्ये काही सामान्य पण अतिशय सखोल योग तत्वांचा (यम आणि नियमांचा) उल्लेख केला आहे, ते जाणणे आणि दैनंदिन जीवनात त्याचा अवलंब करणे, हे आनंदी आणि निरोगी जीवनाचे रहस्य ठरू शकते. उदाहरणार्थ "संतोष", समाधानाचे महत्व शिकवते. "अपरिग्रह" तत्त्व आपल्याला लोभीपणा किंवा अधिकाधिक मिळवण्याची आकांक्षा, जे तणाव आणि चिंतेचे कारण असू शकते, त्यावर मात करण्यास मदत करते. तसेच "शौच" तत्व, शरीर व मनाच्या स्वच्छतेबद्दल बोलते. हा नियम विशेषतः कामास येतो जेव्हा तुम्ही संसर्गजन्य रोग होण्याबद्दल काळजी करू लागता.

योगाचे यम आणि नियम आपल्याला पोषक आहार घेण्यास आणि निरोगी जीवनशैली जगण्यास मदत करतात, ज्यामुळे चिंता आणि तणावावर मात करण्यासाठी मदत होते. योग तत्वज्ञान समजण्यासाठी तुम्ही श्री श्री रविशंकरजी यांचे पतंजली योग सुत्रांवरील भाष्य, याचे वाचन करण्याचा विचार करू शकता.


प्रार्थना करा, श्रद्धा ठेवा आणि हसत (आनंदी) रहा!

प्रार्थना हे चिंतामुक्त राहण्यासाठी सर्वोत्कृष्ट साधन आहे. दैनंदिन प्रार्थनेची सवय लावल्याने, मंत्रजप किंवा भजन गायल्याने तुम्ही सकारात्मक शक्तीने भरून जाता आणि त्यानी मन स्थिर होण्यात मदत होते. शिवाय जास्तीत जास्त हसण्याचा (चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवण्याचा) जाणीवपूर्वक प्रयत्न करा. ते तुमच्यात क्षणार्धात आत्मविश्वास, निश्चिंतता आणि सकारात्मकता रुजवते. आत्ता ह्या क्षणी हसून बघा.


तुम्ही दुसऱ्यांसाठी काय करू शकता याचा विचार करा

जेव्हा आपण कायम 'मी आणि माझे' यामध्ये अडकून राहतो, तेव्हा ताण आणि चिंता निर्माण होते. 'माझे कसे होईल' याची आपण काळजी करत राहतो. त्यापेक्षा तुम्ही, तुमच्या आजूबाजूच्यांना कसे उपयोगी होऊ शकता यावर तुमचे लक्ष केंद्रित करा. सेवा उपक्रमांनी स्वतःला उर्जित करणे हे तुम्हाला गहन समाधान आणि सर्वोच्च आनंद देऊ शकते.


जगाचा क्षणभंगुरपणा जाणून घ्या

आपल्या आजूबाजूचे सर्व काही क्षणिक आहे आणि बदलत राहील, ही जाणीव जेव्हा आतमध्ये धृढ होते तेव्हा आपण तणावमुक्त आणि अंतर्स्थित होतो. "हे सुद्धा निघून जाईल आणि कायमस्वरूपी राहणार नाही" ही भावना आपल्यामध्ये उदयास येते आणि आपल्याला चिंतामुक्त करते. जीवनाचे हे मूलभूत तत्व जाणण्यास ध्यान मदत करते.


आत्तासारखीच भूतकाळातील घटना आठवा जेव्हा तुम्ही चिंतेवर मात करू शकला होता

हे तुम्हाला प्रचंड धैर्य देते तुम्ही हा पण प्रसंग पार करू शकता. याची तुम्ही नेहमी स्वतःला आठवण करत रहा.


तुमच्या आजुबाजूला सकारात्मक संगत ठेवा

जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त वेळ सकारात्मक मनाच्या लोकांसोबत घालवता, तेव्हा तुम्ही समान विचारांनी प्रभावित होता आणि तेच तुमच्या एकूणच जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल. फक्त सकारात्मक मनच आनंद, शांती आणि तणावापासून मुक्तीचा अनुभव अनुभवू शकते.

(लेखन केले आहे प्रीतिका नायर यांनी, श्री श्री योगा शिक्षिका डॉ. सेजल शहा यांच्या सहय्याने)