नैसर्गिक तजेलदार त्वचेसाठी योग | Yoga for glowing skin in Marathi

सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातींमधील कौतुकास्पद चिरतरुण आणि सुंदर त्वचा पाहून नेहमी असे वाटते ना की, आपली त्वचा देखील अशी होऊ शकते का? आता ते दिवास्वप्न अजिबात राहिलेले नाही. आता तुम्ही देखील निरोगी आणि तजेलदार त्वचेमुळे इतरांच्या नजरा खेचत मिरवू शकता. ते ही कोणत्याही खर्चिक रासायनिक सौंदर्य प्रसाधानांशिवाय – आहे ना आनंदाची बातमी. ‘योगा’ ही निव्वळ दोन अक्षरे आणि त्यामुळे तुम्ही चेहऱ्यावर सतत तेज टिकवून ठेवू शकाल.

परंतु उपचारांबाबत बोलण्याआधी प्रथम सुरकुत्या आणि काळवंडलेपणा सुरु कोठून होतो ते जाणून घेऊया.

त्वचेच्या समस्येची सर्वसाधारण कारणे

  • काही स्त्रियांना मानसिक ताण-तणाव, तसेच धुम्रपान, मद्यसेवन, अंमली पदार्थाचे सेवन आणि 
    चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे अकाली सुरकुत्या पडू लागतात.
  • पुरळ, मुरुमे ही सर्व वयोगटातील महिलांची त्वचा समस्या आहे. बऱ्याच वेळा शरीरातील संप्रेरकांच्या (हार्मोन्स) बदलांमुळे हे घडू शकते. परंतु काळानुरूप ते व्यवस्थित होत असल्याने त्यांची फारशी काळजी करण्याची गरज नाही.
  • अपचन हे सुद्धा एक कारण असू शकते.

निरोगी त्वचेसाठी ५ योगिक सूचना

1

नियमित योगाभ्यास याच्यामुळे चेहरा आणि डोके यांच्यामध्ये रक्तसंचार वाढतो. उदा: भुजंगासन, मत्स्यासन, हलासन, सर्वांगासन, त्रिकोणासन आणि शिशू आसन. या सर्व आसनांमुळे फुफ्फुसांची क्षमता वाढत असल्याने प्राण वायूचा संचार देखील वाढतो. या आसनांमध्ये शरीर मागे-पुढे झुकण्याने डोक्यामध्ये रक्तसंचार वाढून स्वच्छ आणि तेजस्वी त्वचा प्राप्त होण्यास मदत होते.

2

ज्या स्त्रियांची त्वचा तेलकट आहे त्यांना उन्हाळ्यामुळे मुरमांची समस्या जास्त जाणवते. शीतली आणि शितकरी सारख्या शरीर शीतल करणाऱ्या प्राणायामांच्या सरावाने त्वचेचा तजेलदारपणा टिकून रहातो. श्री श्री योगा शिबिरामधून जलनेती शिकून सराव करावा.  या शिबिरामधून शंख प्रक्षालन विधी शिकून घ्या, जिच्यामुळे शारीरिक आणि भावनिक स्वच्छता होऊन त्याचा त्वचेवर चांगला परिणाम होतो. मात्र हा विधी सहा महिन्यातून एकदाच करा.

3

पचन क्रिया सुधारण्यासाठी, रिकाम्या पोटी पवनमुक्तासन, वज्रासन, धनुरासन, नाडीशोधन आणि कपालभाती प्राणायाम करावा. कपालभाती मुळे विषारी द्रव्ये निघून जाऊन, नावास साजेसे असे आपले कपाळ तेजस्वी होऊ लागते. यामधील जोराने उच्छवास सोडल्यामुळे विषारी द्रव्ये निघून जात असल्याने त्यांचा पहिला परिणाम म्हणजे नैसर्गिक तजेलदार त्वचा होणे.

4

घरी दररोज वीस मिनिटे चेहऱ्याचे योग व्यायाम प्रकार करा. त्यांच्यामुळे तुमच्या चेहऱ्याने स्नायू आकुंचित बनतील. तणाव कमी करण्यासाठी जबड्यानां मालिश करा. त्वरित विश्रांती मिळवण्यासाठी भुवयांचा व्यायाम करा, चेहऱ्याच्या स्नायूंच्या व्यायामासाठी ‘चुंबन आणि हास्य’ व्यायाम करा. ( बालकाचे चुंबन घेतल्यासारखे ओठ बाहेर काढा आणि मोठे हास्य चेहऱ्यावर पसरवा.). सूर्यनमस्कार सारखे गतीने करता येणारी आसनाने शरीरातून घाम गेल्याने शरीरातून विषारी द्रव्ये निघून जातात.

 

 

 

 

 

5

काही जलद रचित योग व्यायाम करा जसे की जलद सूर्य नमस्कार, जे नैसर्गिकरित्या शरीर प्रणालीतून विषारी पदार्थ काढून टाकते आणि त्वचेला कांति रूप देते.

तजेलदार त्वचा राखण्यासाठी इतर सूचना

1

भरपूर पाणी प्या

 

कोमट पाण्यातून लिंबू रस आणि मध घेतल्याने शरीरातून विषारी द्रव्ये निघून जाण्यास मदत होऊन त्वचा स्वच्छ आणि निरोगी राहते. पातंजली योग सूत्रानुसार देखील तन, मन आणि वाणी यांचे ’शौच’ म्हणजेच शुद्ध असणे हा योगातील पहिल्या पाच नियमांपैकी एक नियम आहे.

2

ताजे अन्न खा

जीवनसत्त्व ‘क’ ने परिपूर्ण असे फळे आणि भाजीपाल्याचा आहारात भरपूर समावेश असू द्या. पपई तुम्ही खाऊ शकता किंवा त्याने चेहऱ्याला मालिश करण्याने देखील आश्चर्यकारक परिणाम दिसतात. चेहऱ्यावरील काळे डाग, व्रण आणि रापलेपणा बटाट्याने देखील कमी होतो. तळलेले, मसालेदार आणि गोड पदार्थांचे अति सेवन टाळा. त्यांच्याऐवजी सुका मेवा आणि तत्सम निरोगी आहार घ्या. आपली प्रकृती वात, पित्त की कफ प्रकृतीची आहे हे जाणून घ्या. (याबाबतीत श्री श्री आयुर्वेदा वैद्य आपणास मार्गदर्शन करू शकतील) त्यातून आपल्या मूळ प्रकृतीसाठी योग्य आहार जाणून घ्या.

3

भरपूर विश्रांती घ्या

तुमच्या शरीराला मिळालेली खोल विश्रांती तुमच्या चेहऱ्यावर दिसत असते. आठ तासांची गाढ झोप योग्य विश्रांती होय.

4

त्वचेवर नैसर्गिक प्रसाधनांचा वापर करा

आयुर्वेदिक फेशियल मसाज करा. हा मसाज श्री श्री पंचकर्मामध्ये उपलब्ध आहे. या उपचार पद्धती रसायनमुक्त असून वनौषधी द्रव्यांनी युक्त आहेत, ज्यांच्या वापराने तुमची त्वचा ताजीतवानी, टवटवीत आणि तजेलदार राहील. चेहऱ्यावर औषधी द्रव्यांनी युक्त प्रसाधने आणि त्वचेला साजेसी तेलांनी आठवड्यातून एकदा मालिश करा. जीवनसत्त्व ’ई’ ने युक्त तेल योग्य आहे. चेहऱ्यावर दमटपणा टिकण्यासाठी दिवसातून दोनदा योग्य प्रसाधनांचा वापर करा. सायंकाळी घरी परतल्यावर चेहरा स्वच्छ धुवा. दिवसातून दोन-तीनदा डोळ्यांवर पाणी शिंपडा. तुमच्या शरीरासाठी योग्य तेलाने आठवड्यातून एकदा शरीर मालिश करा. यामुळे विषारी द्रव्ये निघून जातील.

5

हसत मुख रहा

हे तुमच्या चेहऱ्यासाठी उत्तम आणि सुलभ सौंदर्य प्रसाधन आहे. जेवढे जास्त हसत रहाल तेवढा तुमचा चेहरा उजळेल. तसेच सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. तुमचा स्वतःबद्दलचा दृष्टीकोन चेहऱ्यावर दिसत असतो. नियमित योगाभ्यास केल्याने तुम्ही स्वतः आणि तुमच्या आजूबाजूचा परिसर सकारात्मक बनण्यास मदत करतो आणि ही सकारत्मकता तुमचा चेहऱ्यावर झळकते.

    सूचना: वरील सूचना या उपचार नसून खबरदारी म्हणून स्वीकारा. नियमित योगाभ्यासामुळे पुरळ आणि मुरुमांची चिंता दूर करून दीर्घ काळापर्यंत तजेलदार त्वचा प्राप्त होते. आजच तुमच्या त्वचेला पार्ट १ किंवा श्री श्री योगा कोर्सची भेट म्हणून द्या.

    श्री श्री योगा प्रशिक्षक डॉ. सेजल शहा यांच्या मार्गदर्शनाने, लेखिका: प्रीतिका नायर

    Interested in yoga classes?