मलावरोधापासून सुटका मिळवण्यासाठी योग (Yoga to relieve constipation in Marathi)

आजचा दिवस तरी रोजच्यापेक्षा वेगळा जाणार आहे का? कि आजही सततची पोटदुखी, डोकेदुखी असणार, मलनि:सारणास त्रास होणार? हे सर्व बंद होणे शक्य आहे का? पोट साफ न झाल्याने वरील समस्या दिवसागणिक अधिक त्रासदायक होऊ लागल्या आहेत. ह्या त्रासातुन सुटका व्हावी अशी इच्छा आहे.

हा संवाद आपल्यापैकी काहीजण जवळजवळ रोजच स्वतःसोबत करीत असतात. याचे कारण आहे की मलावरोध ही नित्याचीच बाब बनली आहे. आणि आपण त्याला सामान्यतः दुखणे समजतो इथे आपले चुकते; ते दुखणे नसून एक लक्षण आहे. जर योग्य वेळी उपचार केले नाहीत तर ते पोट आणि ओटीपोटाच्या विकाराचे लक्षण आहे असे समजावे. परंतू आपण मलावरोध तितक्या गंभीरपणे घेत नाही.

असे म्हणतात की, रोगाच्या उपचारापेक्षा रोगाचा प्रतिबंध केव्हाही चांगला. म्हणून या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात योगाभ्यासाचा समावेश करणे हे उत्तम राहील. दररोज काही मिनिटे योगाभ्यास केल्यामुळे आतड्यांची अनियमित हालचालींच्या समस्येवर मात करता येते, पोटावर पडणारा ताण आणि पोटाचे फुगणे याना प्रतिबंध करता येतो ज्यामुळे तुम्ही  दिवसभर आनंदी आणि शांत राहू शकाल.

मलावरोध का होतो?


वेगवेगळ्या लोकांना मलावरोधाचा निरनिराळा अर्थ होतो. काही जणांना अवेळीचा मल म्हणजे मलावरोध, तर इतरांना कठीण मल बाहेर निघणे हा होय. कोणतीही केस असू दे पण या समस्येचे सामायिक स्पष्टीकरण एकच आहे आणि निःशंकपणे ते आहे आपली अस्वास्थकारक जीवनशैली.

अयोग्य कामाच्या वेळा, विश्रांतीकरिता अपुरा वेळ आणि जंकफूडचे अति सेवन याने आपल्या शरीराची अशी हानी होते की ते आपल्या लक्षात येत नाही. तसेच, आहारात ताज्या फळांचा व हिरव्या पालेभाज्यांचा समावेश नसणे, जेवणात तंतुमय पदार्थांची कमतरता यामुळे मलावरोध होतो. पाणी कमी पिणे हेसुद्धा एक कारण आहे.

योग तुमच्या मदतीला


पण एक आनंदाची बातमी अशी आहे की, तुम्हाला काळजी करण्याचे काही कारण नाही, कारण मलावरोध होवून पोटाच्या काही गंभीर विकार होण्याआधी आपण योगाच्या अभ्यासाने त्याची काळजी घेवू शकतो. क्वचित होणाऱ्या मलोत्सर्ग मुळे पोट जड होते आणि फुगते आणि त्यामुळे आतड्यांचा काही धोकादायक आजार होवू शकतो. उपचार केल्याने बऱ्याच जणांना मलावरोधा पासून आराम मिळतो. पण आपण म्हणतो ना, पुढे निस्तारण्यापेक्षा वेळेवर काळजी घेतलेली बरी. म्हणून सर्वात उत्तम उपाय म्हणजे आपल्या रोजच्या दैनदिन नित्यक्रमामध्ये योगाभ्यास करणे.

योग तुमच्या शरीरात पुन्हा नवचैतन्य निर्माण करण्यात मदत करते आणि रक्ताभिसरण चांगले करून तुमच्या शरीरातील प्राणवायूचा प्रवाह वाढवते. जवळजवळ सर्व योगासानांमध्ये ओटीपोटाला व्यायाम मिळतो आणि म्हणूनच योगाभ्यासामुळे मलावरोधापासून सुटका मिळण्यात मदत होते.

खाली काही योगासने दिलेली आहेत ज्यांचा नियमित अभ्यास केला असता आतड्यांची अनियमित हालचाल नियमित होते.

१. मयुरासन


या आसनामुळे पचनक्रिया सुधारते आणि अपूर्ण आहाराच्या परिणामांचा नाश होतो. हे उदरपोकळीतील दबाव वाढवते ज्यामुळे प्लीहा आणि यकृत यांचा विस्तार कमी होतो. या आसनामुळे आतड्यांची कार्यक्षमतासुद्धा वाढते आणि मलावरोधाची समस्या दूर होते.

 

२. अर्ध-मत्स्येन्द्रासन


स्वादुपिंड, यकृत, प्लीहा, मूत्रपिंड, पोट आणि मोठे आतडे यांना मिळणारी चालना हा या आसनाचा महत्वाचा शारीरिक पैलू आहे; म्हणूनच आतड्यांच्या हालचालीत सुधारणा होते आणि त्यापासून मलावरोधापासून आराम मिळतो.

३.हलासन


हे आसन यकृत आणि आतड्याला आराम देते. हे संपूर्णपणे उलटे आसन ओटीपोटातील रक्ताभिसरण वाढवते आणि पचनक्रिया चांगली करते.

 

 

 

४. पवनमुक्तासन


नियमितपणे मलावरोधाचा त्रास असणाऱ्यांना वाताची तक्रार सामान्यपणे असतेच.हे आसन त्याच्या नावाप्रमाणेच शरीरातील वात बाहेर टाकायला मदत करते. हे आसन अपचन यासारख्या अनेक पचनाच्या विकारापासून बरे करते. हे आसन अपचनामुळे पित्त घशाशी येणे यापासून मुक्त करते.

५. बद्धकोनासन


ह्या पुढे वाकून करण्याच्या आसनामुळे पचनसंस्था कार्यक्षम बनते, वाताचे निवारण होते, पोट फुगण्याची व लचक भरण्याची नाहीशी होते.

 
तर काळजी करणे बंद करा आणि सराव करणे सुरु करा! तुमच्या दिवसातील केवळ काही मिनिटे द्या आणि मिळवा कार्यक्षम  पचन संस्था आणि स्वत: मध्ये दडलेली एक अतिशय आनंदी व्यक्ती पहा! त्याचबरोबर तुमच्या आहाराच्या सवयी सुधारण्यास विसरू नका – तंतुमय संपन्न अन्न, फळे आणि भाज्या, आणि पुरेश्या प्रमाणात पाणी पिणे याने मलावरोधाच्या त्रासाला दूर ठेवता येईल.
 
 

योगाच्या नियमित सरावाने शरीर आणि मन यांचा विकास होतो आणि सोबत आरोग्याचा लाभ होतो पण हे औषधाला पर्यायी समजू नये. श्री श्री योगा प्रशिक्षित शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली योग शिकणे व त्याचा सराव करणे हे अतिशय महत्वाचे आहे. वैद्यकीय समस्या असल्यास, योगाचा सराव करायच्या आधी डॉक्टर आणि श्री श्री योग शिक्षक यांचा  सल्ला घ्यावा. तुमच्या जवळील आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर मध्ये श्री श्री योग शिबिराचा शोध घ्या. तुम्हाला शिबिरांसंदर्भात माहिती हवी आहे का किंवा तुम्हाला तुमचा प्रतिक्रिया नोंदवायची आहे का? आम्हाला info@srisriyoga.in इथे लिहा

मार्च ११, १२ आणि १३ २०१६ रोजी होणारा जागतिक सांस्कृतिक उत्सव (वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल) म्हणजे दि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेवा, माणुसकी, अध्यात्म आणि मानवतावादी मुल्ये या क्षेत्रातील ३५ वर्षाच्या कार्याचे पर्व साजरे करणे होय. हा उत्सव म्हणजे संपूर्ण जगभरातील संस्कृतींमधील वैविध्य साजरे करताना मानवी समाजाचे सदस्य म्हणून आपल्यातील एकोप्याचे दर्शन घडवून आणेल.

www.artofliving.org/wcf

Interested in yoga classes?