योगासने करून आपले वजन कमी करा (Yoga for weight loss in Marathi)

बऱ्याचदा आपण स्थूलपणा अनुवांशिक असल्याचं कारण पुढे करतो नाही का? पण नीट विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की आपणच त्याचे नियंत्रण बऱ्यापैकी करू शकतो. ह्या लेखात वजन घटवण्यासाठी काही महत्वपूर्ण युक्त्या आहेत.

योग साधनेद्वारे वजन कसे घटवाल ?

  • आपलं वजन ८०% खाण्या पिण्याच्या सवयींवर  आणि २०% व्यायामावर अवलंबून असतं.
  • चरबी बरोबरच पूर्ण शरीराचं वजन घडवणे हे उद्दिष्ट असावं.
  • योगासने नियमित करावी.
  • एकाच वेळी भरपूर खाण्यापेक्षा दर २-३ तासांनी दिवसातून ५-६ वेळा थोडं थोडं खाल्ल्याने पचन क्रिया व्यवस्थित कार्यरत राहते. ह्या मुळे “खोटी भूक” ही लागणार नाही.
  • आपल्या योग साधने बद्दल प्रतिबद्ध रहा. ह्यातून निर्माण झालेल्या आवडीमुळे तुमची योग साधना आणखी गहन होईल.
  • जेवताना अन्नाला १००% न्याय द्यावा. जेवताना टीव्ही बघणे किंवा फोन वर बोलणे टाळावे. चौरस आहार  घ्यावा.
  • वजन घटवण्यासाठी कान मंत्र: शिस्त, निर्धार, प्रतिबद्धता.

 

योगा आणि वजन घटविणे..... आत्ता पर्यंतचा सार :

योगा द्वारे खरच वजन नियंत्रित ठेवता येते का? मध्यम गतीने योग (योगासने) केल्यास त्याचा व्यायामासारखा उपयोग होतो. एखाद्या तज्ञ प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच अभ्यास करावा. योग करण्याचा मुख्य लाभ म्हणजे आसने केल्यानंतर मन प्रसन्न रहाते. ह्याचं कारण म्हणजे योगा योगा / योगासने करताना मन, शरीर आणि श्वास एकत्र येतात. ह्यामुळे इतर व्यायामाच्या तुलनेत योगासने जास्त परिणामकारक ठरतात.  रस असल्यास योग साधनेद्वारे वजन कसे घटवाल ?इथे क्लिक करा.

वजन घटविणे आणि काही इंच कमी होणे यातील फरक जाणा:

कल्पना करा, एखाद्या जवळच्या मित्राच्या लग्नात छान दिसावं म्हणून आपण वजन घटवण्याचा निर्धार करतो. १-२ इंच कमी होतातही आणि आपण खूष होतो, पण आपल्या लक्षात येते की काही वेळातच घटवलेले “इंच“ परत येतात.
ज्यांना वजन घटवायचे आहे ,अशा व्यक्तींनी छोट्या छोट्या टप्प्यांचे नियोजन करावे आणि पहा मग वजन नियंत्रित करण्याचे उद्दिष्ट सहजपणे साध्य होऊ शकते. हे छोटे छोटे टप्पे साध्य झाल्यास पुढचे टप्पे गाठण्याचा आत्मविश्वास मिळतो.

मनावर नियंत्रण:

आजकाल बाजारात बऱ्याच गोळ्यांच्या जाहिराती झळकतात ज्यात तुमचं वजन कमी करण्याच आश्वासन  दिले जाते. आधुनिक प्रकारच्या आहारानेही वजन कमी करण्याचे दावे केले जातात. पण हेच सत्य आहे की अतिरिक्त उष्मांक कमी करण्यासाठी मेहनतीला पर्याय नाही. ह्या सगळ्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला तरच म्हणजेच ह्या मेहनतीकडे मौज म्हणून बघितले तरच हे सहज साध्य होऊ शकते.

परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच आपले वजन नियंत्रित करा.

तिशी उलटण्याच्या आधी वजनावर नियंत्रण ठेवणे काहीसे सोपे असते. पण तिशी नंतर वजन कमी करण्यासाठी खास प्रयत्न करावे लागतात, त्यात आहाराची भूमिका महत्वपूर्ण ठरते. चरबी, पिष्टमय पदार्थ (carbohydrates) आणि प्रथिने, हे आहाराचे मुख्य घटक असतात. ह्या घटकांचं सेवन योग्य वेळेस आणि योग्य प्रमाणात केल्यास त्याचा भापूर लाभ होऊ शकतो. उदारणार्थ, मिश्र कर्बोदके आणि पौष्टिक पिष्टमय पदार्थांचे सेवन नाष्ट्यासाठी करणे उपयुक्त ठरेल पण रात्रीच्या जेवणात त्याचा समावेश करणे तितकेसे उचित ठरणार नाही. आपल्या आहाराचे निरीक्षण करा आपल्या शरीराला कोणत्या आहारापासून किती पोषण मिळते हे समजणे महत्वाचे आहे. खाल्लेल्या प्रत्येक पदार्थाची नोंद ठेवलीत तर अधिक जागरूकता येईल व पुढच्या वेळेस तुमच्या आवडीचा गोड पदार्थ खाण्या आधी नक्की विचार कराल. तयार खाद्यपदार्थांच्या खोक्यावर असलेल्या माहितीचा अर्थ नीट समजावून घेतला तर नको असलेले पदार्थ आपण टाळू शकतो.

खेळकर रहा.

आपले आहार नियंत्रणाचे ध्येय साध्य झाल्यास तुम्ही स्वता:ची पाठ थोपटून घ्या. ध्येय साध्य होई पर्यंत स्वत:ला प्रोत्साहन देत रहा. आपल्या दैनंदिन योग साधने बरोबरच आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शनिवार रविवार हे करून पहा:

  1. आपल्या मित्र- परिवारासोबत डोंगर दऱ्यातून  फिरायला जा. निसर्गाच्या सान्निध्यात राहून योग-साधनेला सुट्टी द्या. तुमच्या योगाची अनुसूची बनवा.
  2. कधी तरी समुद्र किनाऱ्यावर अनवाणी चाला. पांढऱ्या वाळूवर चालताना फेसाळणाऱ्या लाटांचा पायाला स्पर्श होऊ द्या. लांबच लांब किनाऱ्यावर चालताना आपलं आसन न्यायला विसरू नका.
  3. सायकल चालवणे हा व्यामाचा आणखी एक उत्तम पर्याय आहे. मित्र मैत्रिणींबरोबर सायकलिंग केलीत तर किती अंतर कापले हे लक्षातही येणार नाही.

श्री श्री योगा प्रोग्राम मध्ये शास्त्रोक्त पद्धतीने योगासने शिकविली जातात. त्याच बरोबर  संतुलित आहाराबद्दल इत्यंभूत माहिती मिळू शकते. अधिक माहिती साठी सोबत जोडलेला फॉर्म भरा.

शारीरिक व्याधीने त्रस्त आहात का? भावनावेगाचा परिणाम व्यक्तिगत व व्यावसायिक जीवनावर होत आहे का?
योगसाधनेद्वारे व जीवनशैली मध्ये कमीत कमी बदल करून नैसर्गिकरित्या ह्या समस्यांवर कशी मात करता येईल हे जाणून घेण्या साठी सोबत जोडलेला फॉर्म भरा.

Start Your Weight Loss Journey Now