पतंजली योग सूत्र यावर श्री श्री रविशंकर यांचे भाष्य (Patanjali Yoga Sutra in Marathi)

आपण एका कथेपासून याची सुरवात करूया-कथा हे ज्ञान देण्याचे एक मोठे आणि प्रभावी माध्यम आहे.


कोणे एके काळी, खूप खूप वर्षांपूर्वी अनेक ऋषी-मुनी हे भगवान विष्णू यांच्याकडे जायला निघाले. कारण की भगवान विष्णूंनी जरी त्यांच्या भगवान धन्वंतरी या अवतारात आयुर्वेदाच्या माध्यमातून आजार बरे करण्यासाठी अनेक उपाय सांगितले तरी देखील अनेक लोक आजारी पडत होते.आता लोक असे आजारी पडल्यावर काय उपाय करावा,हे समजून घ्यायचे होते.

काही वेळा हा फक्त शारीरिक आजार नसून काही मानसिक आणि भावनिक आजार दूर करणे गरजेचे होते,जसे की राग,विषय-लोलुपता,लालसा,मत्सर इत्यादी.ह्या अशा प्रकारच्या अशुद्धी कशा दूर कराव्यात,त्यावर काही उपाय आहे काय?

भगवान विष्णू १००० तोंडे असलेल्या आदिशेषावर पहुडले होते.जेंव्हा भगवान विष्णूंनी त्यांच्याकडे आदिशेष (सतर्कतेचे,सजगतेचे प्रतिक) यांना सुपूर्द केले,ज्यांनी या जगात महर्षी पतंजली म्हणून जन्म घेतला.अशातऱ्हेने योग सूत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या योगाचे ज्ञान देण्यासाठी पतंजलींनी या पृथ्वीवर जन्म घेतला.

म्हणूनच पतंजली हे योगज्ञान देण्यासाठी या पृथ्वीवर आले[316355:] आणि तेच योग सूत्र म्हणून ओळखले जाते.

 पतंजली म्हणाले की, जोपर्यंत १००० लोक जमत नाहीत तोपर्यंत ते योगसूत्रावर चर्चा करणार नाहीत.अशातऱ्हेने विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडे १००० लोक त्यांना ऐकण्यासाठी जमा झाले.

पतंजलींची अजून एक अट होती.तीम्हणजे,ते आणि त्यांचे विद्यार्थी यांच्यामध्ये एक पडदा असेल आणि कोणीही तो पडदा वर करून बघणार नाही तसेच त्यांचे व्याख्यान संपेपर्यंत कोणीही ते सभागृह सोडून जाणार नाही.

प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला होता.त्यांच्यापैकी प्रत्येकाने ऊर्जेचा,उत्साहाचा विस्फोट अनुभवला होता पण त्यांना तो पचवता येत नव्हता.तरीपण त्यांना शिस्त पाळण्या शिवाय पर्याय नव्हता.

नैसर्गिक विधीसाठी एका लहान मुलाला त्या सभागृहातून बाहेर पडावे लागले.त्याने विचार केला की तो गुपचूप जाऊन परत जागेवर येऊन बसेल.दुसऱ्या माणसाच्या मनात उत्सुकता होती की,“ गुरुजी पडद्याच्या मागे काय करीत आहेत, ते मला बघायचे आहे."

त्या लहान मुलाने पडदा उघडला काय?पुढच्या बुधवारी पतंजली योग सूत्र ज्ञानाच्या पुढच्या भागात शोधून काढा.

या कथेतून तुम्ही काय अर्थ शोधून काढला?

या गोष्टीला खूप खोल अर्थ आहे.पुराणांमध्ये अधिक खुलासा कधीही देत नाहीत.त्यात फक्त कथा सांगितली जाते आणि आपण त्यातला अर्थ शोधून काढायचा असतो.म्हणून तुम्हा सर्वांना काय शोधून काढायचे आहे?

  • गुरुजींनी एकही शब्द न उच्चारता विद्यार्थ्यांना ज्ञान कसे समजून दिले ?
  • पडद्याचे महत्व काय आहे?

पतंजलींची कथा भाग १>>