योग आणि आत्मनिरीक्षण Yoga and Observation in Marathi

नियमित योगाभ्यास करून स्वनिरीक्षण करणे म्हणजे जणू रंगमंचावरील नाटक पहाणे. योगासने आणि प्राणायामाच्या सातत्याच्या सरावामुळे आपण आपल्या स्व केंद्राबध्दल, आंतरिक शांती बद्दल हळूहळू सजग होत जातो. मौनामध्ये डोळे झाकून ध्यान केल्याने मनच मनाचे निरीक्षण करू लागते.

योगामुळे मनाबद्दल साक्षीभाव 

“मनामध्ये उठणारी प्रत्येक भावना शरीरात काही ना काही संवेदना निर्माण करते. जेंव्हा तुम्ही त्या संवेदनांचे निरीक्षण करता तेंव्हा भावना शरीरामध्ये संवेदना बनत बनत गायब होतात.मग संवेदना देखील नष्ट होऊन मन निर्विकार बनते.” - श्री श्री रविशंकरजी

स्वतःचे निरीक्षण करा. ऑंन लाईन मार्गदर्शक ध्यानाचा अनुभव घ्या.

आज एका विशेष नाटकाचा जागतिक प्रदर्शन दिन आहे. प्रेक्षक त्यांच्या स्थानावर स्थानापन्न झाले आहेत. लाईट लागले आहेत. वाद्य वृंद संचालकाने संगीत सुरु करण्याचा इशारा केला आहे. लाल मखमली पडदे हळुवार उघडून आतील पार्श्वभागावर निसर्गचित्राचे पडदे दिसताहेत. विंगेमध्ये त्याच्या सूचनांच्या प्रतीक्षेत रंगीबेरंगी पोशाख घालून कलाकर उभे आहेत. प्रत्येकजण आपापली भूमिका करण्यासाठी, चतुर खलनायक कपटी हसतो आहे, नायक शौर्याने लढतो आहे, शो सुरु.

नाटकात दोन ग्रुपमध्ये नृत्य आहे – विचार आणि भावना. विचार वाले नर्तक लाल पोशाखात आणि भावना चे नर्तक हिरव्या पोशाखात. दोघांनी फेर धरल्याने रंगमंच रंगानी न्हाऊन निघालाय. कधी लालभडक तर कधी हिरवागार तर कधी दोन्हीचे मिश्रण.

विचारांचे नृत्य, “आज रात्री जेवणाला काय असेल, माझा मुलगा आत्ता काय करत असेल?” मनः पटलावर कोणते विचार डोकावताहेत? विचारांचे नर्तक विंगेतून बाहेर जातात न जातात, त्यांची जागा भावनांचे नर्तक घेतात. आनंदाची भावना मग  दुःखाची भावना. पुन्हा आनंद. त्यांचे नृत्य असेच चालू राहते.

स्वयं निरीक्षणासाठी प्राणायाम 

प्राणायामाच्या सातत्याच्या सरावामुळे आपण मनाच्या खेळाकडे लक्ष देऊ शकतो. एक प्राणायाम आहे.

“उज्जयी .” उज्जयी  प्राणायामात श्वसन केल्याने मन शांत बनून छोट्या ध्यानासाठी तयार होते. या ध्यानामध्ये काही मिनिटे आपल्या मनात काय चाललेय याकडे लक्ष नेवूया.

उज्जयी  प्राणायाम शिकूया 

  • खुर्चीवर आरामात बसुया. किंवा मांडी घालून योगा मॅट वर सुद्धा बसू शकता.
  • “हा” उच्चार करत हळुवारपणे श्वास सोडूया.
  • आता हा “हा” उच्चार दीर्घ करूया.
  • “हा” चा उच्चार करत श्वास घेऊया. यावेळी तोंड बंद करून घसा आकुंचित करून घश्यातून श्वास घेऊया.
  • तोंड बंदच ठेऊन असा आवाज करत श्वास घेणे आणि सोडणे सुरु ठेऊया. १० दीर्घ आणि खोल श्वास. जेवढा वेळ श्वास आत घ्याल तितकाच वेळ श्वास सोडा.

असे प्राणायाम आर्ट ऑफ लिविंग च्या प्राथमिक शिबिरामध्ये शिका. तुमच्या जवळपास शिबीर शोधा

योग आणि स्वयं निरीक्षणासाठी ध्यान 

(या परिच्छेदामध्ये आपण एका छोट्याशा ध्यानासाठी गरजेच्या सूचना पाहूया. एकदा व्यवस्थित वाचून घेऊ. मग ध्यानामध्ये मनात काय चाललेय इकडे लक्ष घेऊन जाऊ.)

दहा उज्जयी श्वास घेतल्यावर श्वासावर लक्ष ठेऊन शांतपणे बसुया. साधारण श्वास घेत आपले लक्ष आपल्या मनाकडे घेऊन जाऊया. मनात उठणारे विचार आणि भावनांबाबतीत सजग आहात नां ? ते भूतकाळ किंवा वर्तमानकाळ किंवा भविष्यकाळाशी निगडीत असतील.

समजा तुमच्या समोर तीन बास्केट ठेवले आहेत. एखादा विचार किंवा भावना उठली तर सजग व्हा, ती जर भूतकाळाशी निगडीत असेल तर डाव्या बास्केटमध्ये ठेवा. वर्तमानकाळाशी निगडीत असे तर मधल्या आणि भविष्य काळाशी निगडीत असेल तर उजव्या बास्केट मध्ये ठेवा. पुढील तीन ते पाच मिनिटापर्यंत हे सुरु ठेवा. ठीक वाटले तर जास्त वेळ सुरु राहु दे. काय लक्षात येतेय?

श्री श्री रविशंकर आपल्याला स्मरण करून देतात, “श्वासाकडे लक्ष घेऊन चला, ”मात्र आपल्या मनात ‘हो’ किंवा ‘नाही’ असा आपला स्वतःचा संवाद सुरु असतो. श्री श्री म्हणतात, “मनातील प्रत्येक भावना तिच्याशी निगडीत संवेदना शरीरात निर्माण करत असते. तुम्ही त्या संवेदनांकडे लक्ष घेऊन जाल तर त्या भावना शारीरिक संवेदना बनत बनत नाहीश्या होतील. मग त्या संवेदना देखील नष्ट होऊन मन साफ होईल.”

योगाच्या सहाय्याने दृश्याच्या मागील रहस्य पाहूया 

मन ज्यावेळी या भावना आणि संवेदनांचे नृत्य अनुभवत असते तेंव्हा कळते की हे सर्व कलाकार आहेत जे आपापली भूमिका वठवत आहेत. या कलाकारांकडे लक्ष नेता नेता आपणास यामागील कृती ध्यानात येते. विंगेत नृत्य करता करता त्यांचे नियंत्रण लाईट, पडदे आणि ध्वनी यंत्रणेवर होते. योगामुळे ही सजगता येते की आपण मनातील विचार किंवा भावना नाही आहोत.

“दृष्याकडून दृष्टाकडे लक्ष घेऊन जाणे योगामुळे संभव होते.” श्री श्री म्हणतात. “मग तुमच्या लक्षात येईल की दृष्टा हाच आनंदाची, प्रेमाची खाण आहे. जो हे सर्व बाहेर शोधत होता तोच दृष्टा आहे.”

अधिक वाचा सजगतेने जगण्यासाठी योग वाचा.