आकर्षक शरीराच्या ठेवणीसाठी योगासने Yoga Poses for a Better Posture in Marathi

तुम्हाला माहित आहे कां की योग्य शरीराच्या ठेवणीमुळे तुम्ही उंच, सडपातळ आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आत्मविश्वासू दिसता ? तरीदेखील आज बहुतेकजण योग्य ठेवणच गमावून बसलेत. सध्याच्या आधुनिक जीवनशैलीमुळे पाठीचा मणका बराच काळ वाकून राहून त्याच्यावर ताण येतो (ऑफिस योगा). बैठे काम, दीर्घ कामाच्या वेळा आणि विविध इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे आपली मान झुकलेली आणि पाठीला पोक आलेला असतो.

आपण या कामांमध्ये इतके व्यस्त असतो की आपण बसावे कसे, चालावे कसे एवढेच काय झोपावे कसे विसरलो आहोत. याचा अंत शरीरामध्ये कोठे ना कोठे दुखण्याने होतो. सातत्याने काही योगासने केल्याने तसेच आपण कसे उभे रहातो, बसतो, चालतो याप्रती सजग राहिल्याने या शारीरिक दुखण्यातून सुटका होते.

योग्य ठेवण कशी असते?

जेंव्हा तुमची पाठ ताठ, खांदे पसरलेले आणि सैल, हनुवटी वर, छाती बाहेर आणि पोट आत असे एका रेषेत शरीर सरळ असते तेंव्हा ती ठेवण योग्य समजावी.

हे प्राप्त होण्यासाठी योगा कसे सहाय्य करेल?

सातत्याने योगाचा सराव केल्याने सजगता प्राप्त होते हा योगाचा पहिला लाभ आहे. आणि सजग होण्याने शरीराला चांगली ठेवण प्राप्त होते. खालील योगासने सजगतेने केल्याने तुमची ठेवण सुधारते.

  • ताडासन – या आसनामुळे उभे राहण्याची योग्य ठेवण शिकायला मिळते.
  • भुजंगासन  – या आसनामुळे छाती आणि खांदे पसरतात, पाठ मजबूत बनते.
  • सर्व दिशांना पाठ ताणणे – या आसनामुळे शरीराची ठेवण सुधारते, पाठीचे स्नायू मजबूत बनतात,कणा ताणला जातो आणि पाठीचा थकवा नाहीसा होतो.
  • मार्जारासन – कणा लवचिक बनण्यासाठी आणखी एक उत्कृष्ट आसन.
  • शिशु आसन - संपूर्ण पाठ आणि खांद्यांना खोलवर विश्राम देणारे आसन.
  • वीरभद्रासन - या दिमाखदार आसनामुळे खांद्यांना आराम मिळतो आणि पाठीच्या खालच्या भागाला आणि गुढघ्यांना आराम मिळतो.
  • उत्कटासन - कंबरेचा खालचा भाग आणि गुढघे यांच्यासाठी उत्कृष्ट आसन. यामुळे गुढघे आणि माकड हाडाला विश्राम मिळतो आणि ते लवचिक बनतात.

योग्य ठेवणीसाठी आणखी काही माहिती :

 - पाठीला बाक येणार नाही अशारितीने हालचाली करा. बाक आल्याने फुफ्फुसे वाकतात आणि शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने डोकेदुखी उद्भवते. सोफ्यावर बाक आणून टीवी पाहण्याऐवजी ताठ .पणे आरामात बसून पहा.

  - योग्य रीतीने बसा.  बऱ्याच लोकांची गुढघेदुखीची तक्रार असते कारण ते बसल्यावर त्यांचे घोटे त्यांच्या गुढघ्याच्या मागे जातात. बसताना खात्री करून घ्या की पायांना आधार आहे आणि दोन्ही पाय जमिनीवर व्यवस्थित टेकले आहेत. घोटे गूढघ्यांच्या रेषेत आहेत. ध्यानाला बसताना देखील ताठ बसायला सुरवात करा.

 - आपली ठेवण योग्य राहण्यासाठी आठवण करत रहा. सुरवातीला याची मदत होईल. चिकटवलेल्या चिठ्ठ्या कामाच्या टेबलला, टीवी जवळ, भिंतीवर किंवा मोबाईलवर गजर लावा कि जे तुम्हाला ताठ बसण्याची, उभे राहण्याची आणि चालण्याची आठवण करत राहील.

 - आपल्या शरीराचे वजन दोन्ही खांद्यांवर समान ठेवा. ही साधी सुधी चूक ऑफिसला लॅपटॉप घेऊन जाणारे करत असतात. म्हणून काही तरणी ताठी माणसे पाठ आणि खांदेदुखीची तक्रार करत असतात. म्हणून दोन पट्ट्यांची लॅपटॉप बॅग वापरा जेणेकरून तुमच्या शरीराचे वजन दोन्ही खांद्यांवर समान राहील. नसेल तर ती बॅग सतत एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर घेत राहा.

 - वजन उचलताना मार्गदर्शक तत्वे पाळा. बहुतांशी व्यक्ती वजन, ओझे उचलताना योग्य रीतीने न उचलल्यामुळे त्यांची पाठ दुखू लागते. ओझे उचलताना पहिल्यांदा गुढघे वाकवा मग पाठ वाकवा.

योग्य शरीराच्या ठेवणीमुळे तुमचे शरीर दीर्घकाळपर्यंत सुडौल राहते आणि तुम्ही आकर्षक आणि आत्मविश्वासू दिसता.

श्री श्री योगा तज्ञांकडून प्रभावी योगासने शिका !

आत्ता रजिस्टर करा 

डॉ. सेजल शहा – श्री श्री योगा प्रशिक्षक यांच्या कडून मिळालेला निवेश