PCOS उपचारासाठी योगाची मदत होते. (Yoga for pcos in Marathi language)

“जवळजवळ १५ वर्षापूर्वी मला PCOS  असल्याचे निदान झाले. जेंव्हा  डॉक्टरांनी मला पहिल्यांदा सांगितले तेंव्हा  मी घाबरले. मला शंका येऊ लागली की आता मला  मुले होतील नां ? माझी मैत्रीण योग प्रशिक्षिका  होती. तिच्याकडून योग साधनेचे धडे मी घेऊ लागले. हळूहळू माझे पुरळ नाहीसे झाले आणि आधीसारखे माझे प्रचंड प्रमाणातील मूड स्विंग्ज (अस्थिर मनस्थिती) होईनासे झाले. आता मी तीस वर्षाची आहे आणि दोन सदृढ मुलांची आई आहे. आयुष्य इतके सुंदर कधी नव्हते." -रुचिका अहुजा, गृहिणी.

PCOS, म्हणजे POLYCYSTIC OVARIAN SYNDROME नांवाच्या गर्भाच्या रोगाने ग्रासलेल्या जगातील अनेक महिलांपैकी रुचिका एक आहे. नांवावरुन वाटते तितकी परिस्थिती भीतीदायक नाही. PCOS  हा साधारणपणे आजकालच्या वयात आलेल्या महिलामध्ये आढळतो. राष्ट्रीय स्वास्थ्य संशोधन संस्थेने सुचवल्याप्रमाणे कमीतकमी ५–१०% तरुण महिलांना ह्या आजाराचे निदान होते. आणि खूप जणांनी हे मानायला सुरुवात केली आहे कि PCOS च्या उपचारांमध्ये योग हा अत्यंत सुरक्षित मार्ग आहे.

तुम्हाला देखील PCOS असेल तर योगा तुम्हाला कशी मदत करील याची माहिती पुढे वाचा. जरी तुम्हास तसे काही नसेल तरी याची माहिती पुढे वाचा कारण योगा तुम्हाला  नेहमीच मदत करील. तुम्हाला काही समस्या असो वा नसो !

महत्वाचे म्हणजे PCOS चे काही ठराविक कारण कुठल्या गोष्टीशी निगडीत असल्याचे अजून निष्पन्न झालेले नाही.

डॉ. प्रतिमा मलिक, अपोलो हॉस्पिटल मधील स्त्रीरोगतज्ञ म्हणतात, ”आज कालच्या खूप महत्वाकांक्षी, तणावग्रस्त तसेच नोकरी करणाऱ्या महिलांना PCOS होण्याचा कल अधिक आहे”.

तुम्हाला PCOS आहे हे कसे शोधाल?

 
  • अनियमित किंवा बंद झालेली मासिक पाळी.
  • नियमित पणे केस गळणे आणि चेहरा, पाठ, पोट, हात आणि पायावर दाट केसांची वाढ.
  • मोठे पुरळ.
  • मानसिक अवस्था सारखी बदलणे.
  • वजन वाढ.
  • वंध्यत्व
 

रोजच्या धकाधकीच्या जीवनातून पूर्णपणे तणावमुक्त होणे अशक्य असले तरी आपण त्यांच्याशी मुकाबला करण्यासाठी आपली क्षमता शकतो.

PCOS मध्ये योगाची भूमिका काय आहे?

योग निव्वळ शारीरिक स्तरावरच नाहीतर अधिक खोलवर आणि सूक्ष्म स्तरावर काम करते. खोलवर साचून राहिलेल्या आपल्या शरीर प्रणालीमधील तणावाचा निचरा करण्यास योगाची मदत होते; ज्यामुळे PCOS ची लक्षणे कमी होण्यास मदत होते.

PCOS साठी विकसित केलेल्या योगासनामुळे ओटीपोटीच्या भागाला सैल करण्यास आणि विश्राम देण्यास मदत होते. आणि प्राणायाम जी अधिक शक्तीशाली पद्धत आहे आपल्या मनास शांत करण्यास मदत करते. याच्यासोबत जोडीस काही ध्यानाचे प्रकार आहेत जे खोलवर सूक्ष्मात जाऊन आपल्या संस्थेतील मळभ दूर करण्याचे व ताण घालवण्याचे काम करतात. आणि शेवटी श्री श्री रविशंकरजी यांनी स्वतः विकसित केलेली सुदर्शन क्रिया ही प्रभावी श्वसन प्रक्रिया आहे जिच्यामुळे आपल्या  नकारात्मक भावना आणि मानसिक अस्थैर्य घालवण्यास मदत होते..

श्री श्री योगा प्रशिक्षक डॉ. सेजल शहा यांनी  PCOS साठी शिफारस केलेली योगासने :

PCOS मध्ये विश्राम मिळणे महत्वाचे आहे. श्वासाबरोबर मेळ घालून तुम्ही आसनामध्ये विश्राम करू शकता. प्रत्येक आसनामध्ये खोल आणि लांब श्वास घ्या.

टीप: सर्व आसने श्री श्री योग केंद्रामधील प्रमाणित प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करावीत. ज्या आसनामध्ये पोटावर अत्याधिक ताण येत असेल अशी आसने PCOS असलेल्या महिलांनी करू नयेत. यातील प्रत्येक आसन करताना तुम्ही विश्राम करीत आहात याची खात्री करावी.

  • PCOS साठी तितली (फुलपाखरू) आसन : खूप मदत करते. पायांची उघडझाप खूप करू नका, त्या ऐवजी त्या आसनात अधिक काळ स्थिर राहण्याचा प्रयत्न करा.
  • सुप्त-बद्ध-कोनासन : (रेलून केलेले फुलपाखरू आसन) तर अधिक मदत करू शकते, जे तितली आसनासारखेच पण खाली पडून करायचे असते. त्यामुळे ते अधिक विश्रामदायी असते. आणखीन चांगला अनुभव मिळण्यासाठी एखादे मधुर संगीत लावू शकता, शिवाय नितंबाखाली उशा घेऊ शकता. नवशिकाऊसाठी, हे आसन करताना उशांचा आधार घेणे चांगले ठरते.
  • भारद्वाजासन : हे बसून पाठीच्या मणक्याला पीळ देऊन करतात ज्याचा फायदा PCOS रुग्णांना होतो.
  • चक्की चालानासन : (जाते फिरविणे) खूप सोप्पा व्यायाम आहे ज्याचे अनेक फायदे आहेत. यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड, गर्भाशय, व जननेंद्रिय यांचे मालिश होण्यास मदत होते.
  • शवासन :हे आणखीन एक उपयोगी आसन आहे जे करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. PCOS असेल तेव्हा तुम्ही जितका आराम करता तेवढे तुम्हाला बरे वाटते आणि सर्व योगासने करून झाल्यावर या आसनात तुम्ही संपूर्णपणे विश्राम करता.
  • पद्मसाधना सुद्धा PCOS रुग्णांसाठी खूप परिणामकारी आहे.
  • ज्या आसनांमुळे (धनुरासन, विपरीत शलभासन, भुजंगासन, आणि नौकासन) पोटावर ताण येतो त्या आसनांमध्ये जास्त वेळ न राहण्याचे लक्षात ठेवले पाहिजे.
  • जलद गतीने केलेल्या सूर्यनमस्काराच्या काही फेऱ्या वजन कमी करण्यासाठी चांगल्या असतात. परंतु दररोज धीम्या गतीने काही फेऱ्या करणे अधिक विश्रामदायी असते.

या आसनाचा फायदा वजन कमी करण्यास देखील होतो (PCOS असणाऱ्या महिला मध्ये वजन वाढण्याची प्रवृत्ती असते).

डॉ. सेजल शहा म्हणतात की, “नियमित योगासने आणि ध्यान साधनेमुळे अगदी ५-१०% वजन देखील कमी करण्यात यशस्वी ठरलात तरी तुम्हाला खूप बरे वाटेल. यामुळे तुमचे मन शांत होते. वजन वाढीमुळे तुम्हाला आलेला ताण देखील कमी होतो ज्याचा पुढे तुमची मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते. PCOS असताना हे खूप महत्वाचे ठरते की रोज योगा व ध्यान यांच्यासाठी तुम्ही पुरेसा वेळ द्यावा.

PCOS मध्ये विश्राम करणे महत्वाचे ठरते;  श्वासाधारित व्यायाम प्रकारात प्राणायामाची मदत होते किंवा असे म्हणता येईल की नैसर्गिकरीत्या तणावमुक्तीसाठी प्राणायाम हा उत्तम मार्ग आहे. डॉ. सेजल शहा म्हणतात की PCOS ग्रस्त स्त्रियांनी नाडीशोधन आणि भ्रामरी प्राणायाम दररोज काही मिनिटे करणे चांगले ठरेल. श्वासाच्या माध्यामाद्वारे हे प्राणायाम मनातील तणावमुक्ती देण्यास मदत करतील.

निसर्गाशी नाते पुनःप्रस्थापित करण्याच्या कानमंत्र :

 
  • रसायनमुक्त अन्न खा. जंक फूड टाळा.
  • खूप पाणी प्या.
  • नियमित व्यायाम करा. जलद गतीने चालणे वजन कमी करण्याचा उत्तम मार्ग.
  • नैसर्गिक स्थळांना भेट द्या व स्वतःबरोबर थोडा वेळ घालवा.
  • मन शांत करण्यासाठी काही वेळ चाला . एखाद्या समस्येविषयी चिंता केल्याने ती समस्या अधिक वाढू शकते – संगीत ऐका, वाचन करा किंवा बागकामात वेळ घालवा.

 ध्यान करा आणि त्यामुळे पडणारा फरक अनुभवा : 

तणावाची सुरुवात मनात होत असल्याने आणि त्याचा परिणाम हळू हळू शरीरावर दिसू लागल्याने हा मुद्दा मानसिक स्तरावर सोडविणे महत्वाचे आहे.
ध्याना द्वारे हे साध्य होऊ शकते. अमेरिकन मेडिकल असोसिएशनने शास्त्रीय अभ्यास करून हे सिद्ध केले आहे कि अशा साधनेमुळे शारीरिक स्वास्थ्याचे अनेक लाभ मिळतात.

“जेंव्हा आपण खोल आत्मनिरीक्षण करतो तेंव्हा आतून आरोग्य लाभ होतो“ असे डॉ. सेजल शहा म्हणतात. काही काळ डोळे मिटून स्थिर बसल्यामुळे खूप आराम मिळतो. तसेच ज्या समस्यावर तुम्ही सतत चिंता करीत असता ती सोडवण्याची योग्य सापेक्ष दिशा सापडते.

बहुतेक स्त्रियांना अगदी लहान वयात,वयात येताना PCOS चे निदान होते तेंव्हा त्या गोंधळून जातात व निराश होतात. योग आणि ध्यानधारणा याचा मेळ लहान वयात घातला की व्याधिमुक्त शरीर आणि तणावमुक्त मन साध्य होण्यास मदत होते.

अनेक PCOS ग्रस्त स्त्रियांना सुदर्शन क्रियेमुळे मदत झाली आहे.

नऊ वर्ष PCOS रुग्ण असलेल्या सरीना महबुबानी अनुभव सांगतात की, “माझी मुख्य समस्या म्हणजे संपूर्ण चेहऱ्यावर उठलेले पुरळ. ज्यामुळे मन खूप वैफल्यग्रस्त असायचे! पण कधी त्यासाठी औषधे घेतले नाहीत. मी फक्त माझ्या आहाराची काळजी घेते, खूप सॅलड आणि ताजे अन्न खाते, भरपूर पाणी पिते आणि व्यायाम करते. कधी शरीर खूप फुगलेले व जड वाटते आणि मला खूप सुस्त वाटते. त्या वेळी माझी रोजची सुदर्शन क्रिया मला मदत करते. ती मला उत्साह देते आणि मला खूप बरे वाटते.

सरीना हेही सांगते की." सुदर्शन क्रियेमुळे मला माझ्या भावनाचे अस्थैर्य हाताळायला, चिडचिडेपणा आणि नकारात्मकता हाताळण्यास खूप मदत होते. आरोग्यदायी आहार, व्यायाम, योगा आणि ध्यान याचा फायदा सरीनाला तिच्या आजाराच्या लक्षणांना मर्यादित ठेवण्यास मदत करतो शिवाय ती समस्या अधिक त्रासदायक होण्यास निर्बंध झाला आहे.

शास्त्र आणि अध्यात्म – एकमेकांसोबत

आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक अस्वस्थता जशा Diabetes व PCOS सारख्या आजारावर उपचार म्हणून योग व ध्यान यांचे वाढते महत्त्व आजच्या शास्त्राने देखील मानावयास सुरुवात केली आहे.
PCOSच्या उपचारामध्ये नेहमीच्या औषधांबरोबर आता डॉक्टर्स काही मिनिटे प्राणायाम व ध्यान करण्याचा सल्ला त्यांच्या रुग्णांना देतात. फोर्टिस हॉस्पिटल मधील प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ डॉ. छाया पाटील म्हणतात की, “आजकालच्या जगात चांगला परिणाम मिळविण्यासाठी आपल्याला शास्त्राची सांगड अध्यात्मासोबत घालणे गरजेचे आहे. दोन्ही समांतरपणे चालले पाहिजे.”

PCOS होण्याचे कारण जरी अजून माहित नसेल तरी त्याच्या उपचाराच्या उपलब्ध मार्गामुळे आपल्याला धन्यता वाटते. योगासोबत नैसर्गिक आणि सर्वसमावेशक जीवनशैली अंगिकारून तुम्ही त्या बाबतीत काहीतरी करण्याची निवड करू शकता. परंतु, त्याचे पूर्ण फायदे मिळविण्यासाठी तुमची साधना नियमित असणे गरजेचे आहे.

खुश खबर :

खुशखबर अशी आहे की हे मिळणारे फायदे तुम्ही योगसाधनेसाठी घेतलेल्या प्रयासाशी प्रमाणशीर पणे मिळतात. म्हणून थोडी जरी सुरुवात केली तरी त्याचे फळ मिळेल !

PCOSबद्दल चिंता मिटविण्यासाठी नियमित आणि दिर्घकाळ योगसाधना गरजेची आहे

 

Interested in yoga classes?