मत्स्यासन | Matsyasana in Marathi

मत्स्यासन : हे आसन पाण्यात केल्यास आपले शरीर आरामात पाण्यात माश्यासारखे तरंगताना दिसेल, म्हणून या आसनाचे नांव मत्स्यासन आहे.

मत्स्यासन कसे करावे ​| How to do Matsyasana

  • पाठीवर झोपा. दोन्ही पाय एकत्र असुद्या. दोन्ही हात आरामात आपल्या शरीराशेजारी ठेऊया.
  • दोन्ही हातांचे तळवे जमिनीला स्पर्श करतील असे आपल्या नितंबाखाली घेऊया. दोन्ही कोपर एकमेकाजवळ आहेत नां, पहा.
  • श्वास घेत डोके आणि छाती वर उचला.
  • छाती अंतराळी ठेऊन डोक्याच्या मागचा भाग जमिनीला टेकेल असे डोके टेका.
  • डोके अलगद जमिनीला टेकल्यावर कोपरे जमिनीला दाबून आपले सर्व वजन डोक्यावर न घेता कोपरांवर घ्या. खांद्याचे ब्लेड्स आणि छाती अंतराळी वर उचलून धरू. मांड्या आणि पाय जमिनीवरच आहेत.
  • हि आसन स्थिती जेवढा वेळ शक्य होईल तेवढा वेळ दीर्घ श्वसन करत टिकऊन धरूया. प्रत्येक बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर आसनामध्ये विश्राम करूया.
  • आत्ता डोके वर उचलू, छाती खाली घेत नितंबाखालून हात काढून घेऊन शरीरासोबत ठेऊन संपूर्ण शरीर जमिनीवर टेकऊन विश्राम करू.

मत्स्यासनाचे लाभ | Benefits of the Matsyasana

  • छाती आणि मानेमध्ये ताण निर्माण होतो.
  • मान आणि खांद्यामध्ये जमलेला तणाव दूर होतो.
  • या आसनात दीर्घ श्वसन घेत राहिल्याने श्वसनाचे आजार कमी होण्यास मदत होते.
  • थॉयरॉईड, पिटयूटरी आणि पिनिअल ग्रंथींना मसाज मिळतो.

मत्स्यासन व्हीडीओ

मत्स्यासन कोणी करू नये | Contraindications of the Matsyasana

  • उच्च तसेच कमी रक्तदाब असणाऱ्यांनी हे आसन करू नये. तीव्र डोकेदुखी आणि निद्रानाशाचा त्रास असणाऱ्यांनी हे आसन टाळावे. ज्यांच्या कंबर आणि मानेमध्ये काही दुखापत झाली असेल अश्यानी हे आसन अजिबात करू नये.

पूर्वीचा लेख:पवनमुक्तासन। Pawanmuktasana

पुढचा लेख:सेतुबंधासन। Setu Bandhasana

 

और कुछ फायदेमंद योगासन (yoga poses in Marathi)

योग शरीर व मन का विकास करता है। इसके अनेक शारीरिक और मानसिक लाभ हैं परंतु इसका उपयोग किसी दवा आदि की जगह नही किया जा सकता। यह आवश्यक है की आप यह योगासन किसी प्रशिक्षित श्री श्री योग (Sri Sri yoga) प्रशिक्षक के निर्देशानुसार ही सीखें और करें. यदि आपको कोई शारीरिक दुविधा है तो योगासन करने से पहले अपने डॉक्टर या किसीभी श्री श्री योग प्रशिक्षक से अवश्य संपर्क करें। श्री श्री योग कोर्स करने के लिए अपने नज़दीकी आर्ट ऑफ़ लिविंग सेण्टर पर जाएं। किसी भी आर्ट ऑफ़ लिविंग कोर्सके बारे में जानकारी लेने के लिए हमें info@artoflivingyoga.org पर संपर्क करें।