चक्कीचलनासन | Mill Churning Pose in Marathi

चक्की- दळणाचं जातं + चालवणे + आसन

या आसनात भारतीय ग्रामीण भागात आढळून येणाऱ्या हाताने जात्यावर दळण दळण्याच्या हालचालींची नक्कल केली जाते. हा एक खूपच प्रभावी व आनंददायी व्यायाम आहे.

चक्कीचलनासन करण्याची कृती | How to do Chakki Chalanasana

पाय समोर पूर्णपणे फैलावून बसा. दोन्ही हातांची बोटे एकत्र गुंतऊन खांद्याच्या सरळ रेषेत आणा.

एक लांब, दीर्घ श्वास घेत आपल्या शरीराचा वरचा भाग समोर आणा व एक काल्पनिक वर्तुळ बनवीत उजवीकडून गोल फिरणे सुरु करा.

श्वास सोडत समोर व उजवीकडे आणि श्वास घेत मागे व डावीकडे शरीराचा वरचा भाग फिरऊया. श्री श्री योग प्रशिक्षकांचा सल्ला: शरीराच्या खालच्या भागात येणाऱ्या ताणावर लक्ष द्या आणि पाय स्थिर ठेवा. शरीर फिरत असल्यामुळे पायांची थोडी हालचाल होणे स्वाभाविक आहे. हात आणि पाठ एकत्र फिरत राहतील.

हालचाल होत असताना लांब, दीर्घ श्वास घेत रहा. तुम्हाला दोन्ही हात, पोट, कंबरेचा भाग व पायात ताण जाणवतोय नां? एक दिशेने ५-१० वेळा फिरल्यावर विरुद्ध दिशेने करा. तुमचे गव्हाचे पीठ स्वयंपाकासाठी तयार झाले !!!!

चक्कीचलनासन चे लाभ |Benefits of the Chakki Chalanasana

  • सायटिकापासून आराम मिळतो.
  • पाठ, पोट व हातांच्या स्नायूंना व्यायाम मिळतो.
  • छाती व कंबरेचा भाग विस्तृत होतो.
  • स्त्रियांच्या गर्भाशयाच्या स्नायूंना व्यायाम मिळतो. सातत्याने हे आसन केल्याने वेदनादायक मासिक पाळीपासून आराम मिळतो.
  • पोटाची चरबी कमी होते.
  • गर्भावस्थेनंतर जमा झालेला मेद कमी करण्यात हे आसन खूप उपयुक्त आहे. (परंतू हे आसन करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

चक्कीचलनासन कोणी करू नये | Contraindications of the Chakki Chalanasana

खालील परिस्थितीत हे आसन करू नये.

  • गरोदरपणा
  • कमी रक्तदाब असल्यास
  • पाठीच्या खालच्या भागात खूप वेदना असल्यास.(स्लीप डिस्क मुळे)
  • डोकेदुखी,अर्धशिशी
  • जर शस्त्रक्रिया (उदा. हर्निया) झालेली असेल.

 

<<पद्मासन |Padmasana शिशुआसन | Shishuasana (Balasana) >>

 

आणखी काही लाभदायी योगासने (beneficial yoga poses)

योगाभ्यास हा शरीर आणि मनाला लाभदायी असला तरी तो औषधांना पर्याय होऊ शकत नाही. योगासनांचा सराव आर्ट ऑफ लिविंग योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करणे लाभदायी होईल. काही शारीरिक किंवा मानसिक समस्या असतील तर योगाभ्यास सुरु करण्यापूर्वी आपले डॉक्टर आणि योग प्रशिक्षकांना पूर्वसूचना देऊन योगाभ्यास करावा. श्री श्री योगा कोर्स आपल्या जवळच्या आर्ट ऑफ लिव्हिंगकेंद्र येथे शिकू शकता. विविध कोर्सच्या माहिती साठी आणि काही सूचना देण्यासाठी info@artofliving.org ला संपर्क साधा.