सूर्यनमस्कार- वजन घटविण्यासाठी १२ योगासने (Surya namaskar poses in Marathi)

‘सूर्यनमस्कार’ ला परिपूर्ण व्यायाम प्रकार म्हणतात. योग तज्ञ म्हणतात, “बारा ते
पंधरा मिनिटात बारा सूर्यनमस्कार केल्याने २८८ प्रभावी आसनांचा लाभ मिळतो. बरेच चांगले लाभ छोट्या कृतीत प्राप्त करून देणारे ‘सूर्य नमस्कार’ एक उत्तम उदाहरण आहे”.

सूर्यनमस्कार : व्यस्त व्यक्तींसाठी व्यायाम प्रकार

१२ मिनिटात २८८ योगासने.

सुर्यनमस्काराच्या एका फेरीत १२ योगासने होतात. दोन सूर्यनमस्कारांचा संच म्हणजे एक संपूर्ण सूर्यनमस्कार. पहिल्या फेरीत शरीराची उजवी बाजू ताणणे आणि दुसऱ्या फेरी मध्ये डाव्या बाजूला ताण देणे. म्हणजेच १२ ते १५ मिनिटामध्ये एका सूर्यनमस्काराच्या  दोन संचामध्ये १२-१२ योगासनांचे १२ सूर्यनमस्कार, म्हणजेच २८८ योगासने.

सूर्यनमस्कार : कॅलरीज (उष्मांक) घटण्याचा हिशोब.

एका सुर्यनमस्काराच्या फेरीमध्ये सर्वसामान्य व्यक्तींच्या १३.९० कॅलरीज जळतात. हळू-हळू १०८ सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प करा.संकल्पापर्यंत पोहोचेपर्यंत तुम्ही सडपातळ, सुडौल झालेले असाल.

३० मिनीटांच्या व्यायामानंतरची कॅलरी मधील घट

३० मिनिटांच्या विविध व्यायाम प्रकारामध्ये कॅलरीज घटण्याचा तुलनात्मक अभ्यास:

वेट लिफ्टिंग= १९९ कॅलरीज , टेनिस= २३२ कॅलरीज, बास्केट बॉल= २६५ कॅलरीज,

बीच व्हॉली बॉल= २६५ कॅलरीज, फुट बॉल=२९८ कॅलरीज, जलद सायकलिंग = ३३१ कॅलरीज,
रॉक क्लाईबींग = ३६४ कॅलरीज, धावणे= ४१४ कॅलरीज, सूर्यनमस्कार= ४१७ कॅलरीज.

वेळ अपुरा आहे? या कमी वेळेत तंदुरुस्त कसे रहावे- जाणून घ्यायचे आहे..?
‘सूर्यनमस्काराच्या दुनियेमध्ये आपले हार्दीक स्वागत.’
      कामात अति व्यस्त असणाऱ्या व्यक्तींसाठी, ज्यांची तक्रार असते की, ‘ योगासने करण्यासाठी तेवढा  वेळ नसतो,’ अशांसाठी सूर्यनमस्कार अतिउत्तम आहेत. सकाळी- सकाळी जलद गतीने कमीत कमीत बारा सूर्यनमस्कार केल्याने हृदयाला बळकटी प्राप्त होते, तर संथ गतीने केल्याने स्नायू बळकट बनून मन शांत स्थिर होते. शरीर लवचिक बनल्याचा आनंद मिळतो.

इतर व्यायाम प्रकारापेक्षा सूर्यनमस्कार, सुरवातीचे शरीर सैल करणारे व्यायाम आणि योगासने यांच्यामधील दुवा बनू शकतात. म्हणून सकाळी-सकाळी शरीर सैलावणारे व्यायाम प्रकार झाल्यावर काही सूर्य नमस्कार केल्यामुळे शरीर लवचिक होऊन नंतरची योगासने करण्यासाठी शरीर तयार होते.

सूर्यनमस्कार तुमच्या साठी लाभदायक का आहे?

सुर्यनमस्काराचे फक्त वरील लाभच नाहीत तर आणखी बरेच लाभ होतात शरीराच्या सर्व अवयवांना हृदय, यकृत, पचनसंस्था, छाती, अगदी पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत या सूर्यनमस्कारा मध्ये असणाऱ्या योगासनांचा उत्तम परिणाम होतो. रक्त शुद्ध होऊन रक्ताभिसरण सुधारल्याने पोट, आतडी आणि मज्जासंस्थाचे कार्य सुधारते. सूर्यनमस्काराच्या दैनंदिन सरावामुळे वात, पित्त आणि कफ, ज्यांच्यावर आपले आरोग्य अवलंबून आहे, त्यांच्यात समतोल प्राप्त होण्यास मदत होते.सुर्य नमस्काराचे इतर लाभ

सूर्यनमस्कार: योगाद्वारे सूर्याप्रति कृतज्ञता 

‘या ग्रहावरील समस्त जीव सृष्टीचे अस्तित्व सूर्यामुळेच आहे’ हा शाळकरी धडा लक्षात आहे ना? या सोनेरी, तळपत्या ताऱ्याची आपल्या जीवनातील अपरिहार्य भूमिका आपण जाणतो - ज्याच्यामुळे अंधकार दूर होऊन जीवन फुलू लागते. यामुळे आत्ता आपले कर्तव्य आहे - या ताऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे. सूर्यनमस्कार आपल्याला ती संधी प्राप्त करून देतात. सूर्य नमस्काराच्या माध्यमातून संपूर्ण शरीराला व्यायाम देताना, त्या जीवन स्त्रोताचा ‘सूर्याचा’ आपण सन्मान करू शकतो.

सूर्यनमस्कार करण्यासाठी उतावळे आहात नां. सूर्य नमस्कार कसे करावेत यावरील सध्या सरळ आणि सोप्या सूचनांचे पालन करा.  आपल्या योगा चटई घ्या, प्रसन्न चेहऱ्याने सुर्यनमस्कारातील एकेक योगासनांचा आनंद घ्या. सूर्यनमस्कार आणखी पवित्र आणि आशिर्वचन बनण्यासाठी सुर्याप्रतीची कृतज्ञता त्यामध्ये अनुभवा. ही निरोगी शरीर आणि स्वस्थ मन प्राप्त करण्याची पहिली पायरी आहे.

 एका सत्रात १०८ सूर्य नमस्कारकसे करावेत या बद्दलचे प्रशिक्षण घेण्यास तुम्हाला आवडेल.

आपल्या आजुबाजुला श्री श्री योगा शिबीर जेथे सुरु होत आहे तेथून श्री श्री योगा प्रशिक्षकाकडून सूर्यनमस्कार व्यवस्थित शिकून घ्या. आपले प्रश्न आणि शंका info@srisriyoga.in येथे पाठवा. तुमच्या या सरावामध्ये आपणास मदत करणेसाठी आम्ही उत्सुक आहोत.

 

 

योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे लाभ प्राप्त होत असले तरी ते औषधोपचाराला पर्याय ठरू शकत नाही. तज्ञ  श्री श्री योगाच्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली योगासने शिकणे आणि सराव करणे महत्वाचे आहे. काही उपचार सुरु असतील तर जवळच्या डॉक्टरांच्या आणि श्री श्री योगा प्रशिक्षकाच्या सल्ल्याने योगाभ्यास करावा. जवळच्या आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर मधून श्री श्री योगा शिबिराचा तपशील मिळवा. शिबिरांची माहिती आणि आपले अनुभव कळवण्यासाठी info@srisriyoga.in या ईमेल वर संपर्क साधा.