वृक्षासन | Tree Pose - Vrikshasana

या आसनामध्ये आपण डौलदार आणि स्थिर अश्या झाडाची प्रतिकृती निर्माण करतो. बहुतांशी आसने करताना आपण आपले डोळे बंद ठेवतो. पण शरीराचा तोल राखण्यासाठी आपण या आसनात डोळे उघडे ठेवतो.या आसनामध्ये आपण डौलदार आणि स्थिर अश्या झाडाची प्रतिकृती निर्माण करतो. बहुतांशी आसने करताना आपण आपले डोळे बंद ठेवतो. पण शरीराचा तोल राखण्यासाठी आपण या आसनात डोळे उघडे ठेवतो.

वृक्षासन करण्याची कृती | How to do the Tree Pose

  • हात शरीराच्या बाजूला ठेऊन ताठ उभे राहूया.
  • उजवा पाय उचलून, वाकवून उजवे पाऊल डाव्या मांडीच्या खालील भागात घट्ट रोऊन उभे राहूया.
  • डावा पाय ताठ आहे नां, याची खात्री करा. तोल सांभाळा.
  • एकदा तोल प्राप्त झाल्यावर दीर्घ श्वास घेत आरामात दोन्ही हात डोक्याच्यावर नेऊया. तळहात एकत्र जुळवून नमस्ते मुद्रा करूया.
  • थोड्या अंतरावरील एखाद्या गोष्टीवर नजर स्थिर करा, नजर स्थिर राखल्याने तोल सांभाळता येतो. पाठीचा कणा ताठ आहे नां, शरीर रबरासारखे ताणलेले असुद्या. दीर्घ श्वसन सुरु ठेवा. प्रत्येक बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर शरीर आणखी विश्राम करत राहूया. चेहऱ्यावर सुंदर हास्य ठेवत आपले लक्ष शरीर आणि श्वासावर राहूद्या.
  • संथ श्वास सोडत हात शरीराशेजारी खाली घेऊन येऊया. उजवा पाय खाली आणूया.
  • हात शरीराशेजारी ठेवत ताठ उभे राहूया. आत्ता डावा पाय उजव्या मांडीवर नेत हे आसन परत करूया.

 

 

वृक्षासानाचे लाभ | Benefits of the Tree Pose

  • या आसनामुळे नवचैतन्य निर्माण होते, पाय, पाठ आणि हातांमध्ये ताण निर्माण होऊन तरतरी निर्माण होते.
  • आपल्या मनामध्ये समतोल निर्माण होतो.
  • एकाग्रता वाढण्यास मदत होते.
  • सायटीकाच्या काही रुग्णांना या आसनामुळे आराम मिळाला आहे.
  • यामुळे पाय मजबूत बनतात, तोल राखता येतो आणि कंबर खुली होते.
  • सायटिका बरा होण्यास मदत होते.

 

वृक्षासन कोणी करू नये | Contraindications of the Tree Pose

जर तुम्हाला अर्ध शिशी, जागरणाचा त्रास असेल, कमी अथवा उच्च रक्तदाब असेल तर हे आसन करू नये. उच्च रक्त दाब असणाऱ्यांनी हे आसन हात वर न उचलता हेआसन करावे, जेणेकरून रक्त दाब वाढणार नाही.

 

योगाभ्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी लाभदायक असला तरी तो औषधोपचारांना पर्याय बनू शकत नाही. योगासनांचा अभ्यास आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली  करणे योग्य होईल. काही शारिरीक वा मानसिक त्रास असतील तर वैद्यकीय सल्ला व आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षकांच्या सल्ल्याने  योगाभ्यास करावा. श्री श्री योग कोर्स जवळच्या आर्ट ऑफ लिविंग केंद्रा मध्ये शिकू शकता. विविध शिबिरांच्या माहितीसाठी तसेच आपल्या प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी info@artoflivingyoga.in या संकेत स्थळावर संपर्क करा..info@srisriyoga.in

 

Interested in yoga classes?