त्रिकोणासन | Trikonasana in Marathi

 

शरीराचा तोल सांभाळण्यासाठी हे आसन डोळे उघडे ठेवून करणे गरजेचे आहे.

त्रिकोणासन कसे करावे |How to do the Trikonasana

  • सरळ उभे रहा. दोन्ही पायांच्या मध्ये साधारपणे साडेतीन ते चार फुट अंतर ठेवा.
  • उजवे पाऊल ९० अंशामध्ये तर डावे पाऊल १५ अंशामध्ये उजवीकडे फिरवा.
  • तुमच्या उजव्या पायाची टाच आणि डाव्या पायाचा कमानी भाग एका रेषेत असुद्या.
  • दोन्ही पावलांची पकड जमिनीवर घट्ट आहे याची खात्री करून घ्या.
  • आणि शरीराचे वजन दोन्ही पायांवर समान आहे नां, लक्ष द्या.
  • एक दिर्घ श्वास आत घेऊन, श्वास सोडत सोडत कंबर सरळ ठेवत उजवीकडे झुकताना दोन्ही हात सरळ एका रेषेत ठेवा, उजवा हात जमिनीकडे तर डावा हात हवेत येऊ द्या.
  • कंबरेत न वाकता सहजासहजी शक्य होईल अशा रीतीने उजवा हात उजव्या पायाच्या नडगीवर, घोट्यावर किंवा जमिनीवर पाया जवळ टेकवा. डावा हात खांद्यातून सरळ ठेवत छताकडे ताणा. डोके सरळ किंवा डावीकडे वळवा, नजर डाव्या हाताच्या तळव्याकडे.
  • तुमचे शरीर पुढे किंवा मागे न झुकता बाजूला झुकले आहे याची खात्री करून घ्या. ओटीपोट आणि छाती पूर्ण उघडली आहेत नां.
  • शरीर स्थिर ठेवून थोडासा आणखी थोडासा ताण वाढवा. दिर्घ श्वसन सुरु ठेवा. प्रत्येक श्वासाबरोबर शरीराला आणखी विश्राम द्या. आपले लक्ष शरीर आणि श्वासावरच असू द्या.
  • श्वास आत घेत उभे रहा. दोन्ही हात शरीरा जवळ आणा, पाय सरळ एकत्र करा.
  • याच कृतीने डाव्या बाजूने हे आसन करा.

त्रिकोणासना चे ५ लाभ | 5 benefits of the Trikonasana

  • पाय, गुडघे, घोटे, हात आणि छाती यामध्ये बळकटी येते.
  • कंबर, माकड हाड, मांडीचे सांधे आणि स्नायू, खांदे, छाती आणि पाठीचा मणका लवचिक बनतात आणि खुलतात.
  • मानसिक आणि शारीरिक समतोल प्राप्त होतो.
  • पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
  • अकारण भीती आणि ताण-तणाव कमी होतात. सायटिका, पाठदुखी कमी होते.

त्रिकोणासन करण्यासाठी सूचना

  •     त्रिकोणासन करण्यापूर्वी शरीर सैल करणारे व्यायाम करणे गरजेचे आहे.
  •      पुढे वाकताना तोल जाऊ नये म्हणून अत्यंत हळुवारपणे कृती करा.

त्रिकोणासन करण्यापूर्वी प्राथमिक तयारी म्हणून ही आसने करा

  •       कटी चक्रासन
  •        कोनासन
  •         वृक्षासन

त्रिकोणासन नंतर करा 

  •         वीरभद्रासन

खबरदारी

  • डोकेदुखी, जुलाब पिडीत असणाऱ्यांनी हे आसन करू नये. तसेच कमी रक्तदाब, मानदुखी, पाठदुखी असणाऱ्यांनी करू नये. (उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी हे आसन हात वर न उचलता करू शकतात. कारण असे केल्याने रक्त दाब वाढू शकतो)

<<Warrior Pose                                                                                            Ardha Chakrasana >>

(beneficial-yoga-poses)

योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे लाभ प्राप्त होत असले तरी ते औषधोपचाराला पर्याय ठरू शकत नाही. श्री श्री योगा च्या तज्ञ प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली योगासने शिकणे आणि त्यांचा सराव करणे महत्वाचे आहे. काही उपचार सुरु असतील तर जवळच्या डॉक्टरांच्या आणि श्री श्री योगा प्रशिक्षकाच्या सल्ल्याने योगाभ्यास करावा. आपल्या जवळच्या आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर मधून श्री श्री योगा शिबिराचा तपशील मिळवा. शिबिरांविषयी माहिती हवी असल्यास अथवा आपले अनुभव कळवण्यासाठी info@srisriyoga.in इथे ई-मेल करा.