सूर्य नमस्कार उत्कृष्ट जमण्यासाठी ११ सूचना

सूर्य नमस्काराचा सराव करत आहात? याचा अनुभव आणखी ‘उत्कृष्ट’ बनवू इच्छिता ? या अनुभवांसाठी काही सोप्या आणि व्यवहारी सूचना ज्यांच्यामुळे  तुमचा सूर्यनमस्काराचा अनुभव परिपूर्ण आणि आनंदी बनू शकेल. ‘सूर्यनमस्कारासाठी हार्दिक शुभेच्छा’.

  • टीप १ :  सूर्य नमस्कार सुरु करण्यापूर्वी शरीर उबदार बनवा.

सूर्य नमस्कार सुरु करण्यापूर्वी सूक्ष्म व्यायाम किंवा शरीर उबदार बनवणे, शरीराला ताण देणे चांगले आहे. यांच्यामुळे शरीरातील आळस निघून जाऊन शरीर सूर्य नमस्कारातील आसनांसाठी तयार होते.

  • टीप २ : पूर्वाभिमुख कि पश्चिमाभिमुख ?

सूर्य नमस्कार करताना तोंड पूर्वेस असावे कि पश्चिमेस ? सकाळी सूर्य नमस्कार करत असाल तर पूर्वेकडे आणि सायंकाळी करत असाल तर पश्चिमेकडे करावे.

  • टीप ३ : कृतज्ञतेचा भाव असू द्या.

सूर्य नमस्कार करताना ज्यांच्या ऊर्जेतून या ब्रम्हांडाची, जीवसृष्टीची उत्पत्ती झाली, त्या सुर्याप्रती, त्या तेजस्वी ताऱ्याप्रती कृतज्ञता बाळगूया. यामुळे त्या उर्जेचा प्रवाह आपल्यामध्ये पुनरपि प्रवाहित होते.

  • टीप ४ : आकर्षक रितीने सूर्य नमस्कार करा.

जास्तीत जास्त सूर्य नमस्काराचे उद्धीष्ट्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे महत्वाचे ( काही व्यक्ती १०८ सूर्यनमस्कार घालतात ) ज्यावेळी गतीने सूर्य नमस्कार करत असता त्यावेळी झटका देऊन किंवा जोर लाऊन आसने करू नका. एका आसनामधून दुसऱ्या आसनामध्ये हळुवारपणे, आकर्षकपणे जा.

  • टीप ५ : चेहऱ्यावर स्मित हास्य असू द्या.

याच्यामुळे मोठा फरक जाणवतो. यामुळे प्रत्येक आसनामध्ये तुम्ही आनंद उपभोगू शकता. चेहऱ्यावरील स्मित हास्यामुळे ऊर्जा आणखी वाढते.

  • टीप ६ : सूर्य नमस्कार सजगतेने करा.

हा घटक सूर्य नमस्काराच्या संपूर्ण सरावामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. विश्वास ठेवा अथवा ठेऊ नका – परंतु सूर्य नमस्कार कृतज्ञतेने, हळुवार आणि श्वासावर लक्ष ठेऊन सजगतेने केल्याने आणखी ऊर्जावान बनतात. उदा. सहावे आसन- अष्टांगासनमध्ये नाभी जवळील मणिपूर चक्र - जे सूर्याशी संबंधीत आहे, जे ऊर्जेचा स्त्रोत आहे, सक्रीय बनून संपूर्ण शरीरामध्ये उर्जा प्रवाहित होऊन, ऊर्जावान वाटू लागते. जर हे आसन सजगतेने केल्यास नाभीपासून संपूर्ण शरीरभर ऊर्जा प्रवाहित झालेली अनुभवता येते. मला तर शरीरातील या ऊर्जेमुळे कधी कधी विश्राम करणे अशक्य होते.

  • टीप ७ : नैसर्गिक श्वसन असू द्या.

सूर्य नमस्कार साधारण श्वसनामध्ये करू या, ( उज्जायी श्वासात नको.) प्रयत्नपूर्वक श्वसन नसावे. संथ, हलका आणि सहज श्वसन हवे. प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाप्रति सजग राहू या. शारीरिक हालचाली आणि श्वसन यांच्यामध्ये ताळमेळ असू द्या.

  • टीप ८ : मंत्रोच्चारासोबत सूर्यनमस्कार करणे उत्कृष्ट

सूर्यनमस्काराच्या मंत्रांमधील तरंगांमध्ये शरीर आणि मन यांना भेदण्याची सूक्ष्म आणि जबरदस्त परिणामकता आहे. प्रत्येक बारा आसनांसाठी सूर्याच्या सन्मानाची उच्चारली जाणारी बारा विविध मंत्रे आहेत. याशिवाय बारा आसने करताना आपले लक्ष संबधीत विविध चक्रांकडे द्यायचे ( प्रत्येक आसनांसाठी एक अशी बारा चक्रे आहेत.) उदा. पहिले आसन, ‘ नमस्कारासन’ मध्ये आपले लक्ष हृदयाच्या ठिकाणी स्थित अनाहत चक्राकडे नेऊ या. अत्यंत कृतज्ञतेने मंत्रोच्चार आणि चक्रांप्रती सजगता ठेऊन सूर्यनमस्कार केल्याने आपल्या सरावाला सखोल अध्यात्मिकता आणि ध्यानस्थ परिणाम प्राप्त होतो.

  • टीप ९ : सूर्य नमस्कार शरीर सैलावणारे, ऊबदार करणारे किंवा उभ्याने करायचे व्यायाम होऊ शकतात.

स्वतःच्या योग सरावाची योजना बनवा.
 

     व्यस्त योगींसाठी : सूर्य नमस्कार – योग निद्रा

तुमच्याकडे ज्यादा वेळ असल्यास :

शरीर सैलावणारे, ऊबदार करणारे व्यायाम प्रकार – सूर्य नमस्कार (प्रथम संथ- मग गतीने- शेवटी पुन्हा संथ) – शक्तिशाली योगासने – योगनिद्रा मध्ये विश्राम- प्राणायाम आणि ध्यान ने  सांगता.
 

शेवटचा व्यायाम क्रम, ज्यांच्याकडे मुबलक वेळ आहे त्यांना उत्तम आहे. सूर्यनमस्काराच्या काही फेऱ्यामुळे दहा ते पंधरा मिनिटात परिपूर्ण शारीरिक व्यायाम मिळू शकतो. दैनंदिन योगाभ्यासामध्ये सहा संच म्हणजेच सूर्यनमस्काराच्या बारा फेऱ्या पुरेश्या आहेत. पद्मसाधना किंवा इतर शक्तिशाली योगासने करण्यापूर्वीचे सूर्य नमस्कारामुळे शरीर सैलावण्यास मदत होते. शरीर सैलावण्यासाठी सूर्य नमस्कार करत असाल तर थोडे गतीने करा. योगासने म्हणून करत असाल तर संथ तसेच मध्यम गतीने करा, थोड्या फेऱ्यानंतर शरीर हलके आणि लवचिक बनेल. नंतरची शक्तिशाली योगासनामधील लवचिकता आणखी वाढेल. पाठदुखी असेल तर गतीने सूर्य नमस्कार करू नका.                                                                                                                                                                  

  • टीप १० : सूर्यनमस्कारानंतर विश्राम करा.

सूर्य नमस्काराची शेवटची फेरी संपवून पाठीवर झोपून विश्राम करा. उत्तम परिणामांसाठी योगनिद्रा करणे उत्तम, जिच्यामुळे निर्माण झालेले शरीरातील ताण शरीरात जीरवणेस पुरेसा वेळ मिळेल. जर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर शरीर आणि मनाला संपूर्ण विश्राम मिळण्यासाठी काही काळ शवासन उत्तम. 

  • टीप ११ : प्रयत्न करणे आणि त्यागणे याचे रहस्य

शेवटची परंतु गरजेची टीप जी तुमचे सूर्य नमस्काराचा अनुभव आणखी सखोल बनवू शकता. प्रत्येक योगासानांप्रमाणे, सूर्य नमस्कार करताना सुरवातीला काही प्रयत्न लावावे लागतात, तो प्रयत्न गरजेचा आहे. ज्याच्यामुळे शरीरातील चंचलता, रजोगुण समतोल होऊन, जे शिल्लक राहील ते ‘सत्त्व’ होय, सुसंगतता होय. व्यायामामुळे रजोगुण नाहीसा होतो, उरलेले सत्त्व –ध्यानासाठी उपयोगी असते – ज्या भावना त्यागाची आहे.

या सूचनांसह सूर्यनमस्कारांचा सराव एक परिपूर्ण साधना बनेल, जिच्या मध्ये आसन – प्राणायाम – मंत्रोच्चार आणि चक्रांवर केंद्रित ध्यान आहे. कधी विचार केला होतात, की सूर्य नमस्कार म्हणजे वजन घटवणाऱ्या व्यायामापेक्षा ज्यादा असू शकेल?.

अचूक सूर्य नमस्कार श्री श्री योगा प्रशिक्षकाकडून शिकण्यासाठी आपल्या जवळील श्री श्री योगा शिबीर शोधा. आपले प्रश्न आणि शंकासाठी info@srisriyoga.in ला भेट द्या. आपल्या योगाभ्यास मध्ये मदत करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.

(श्री श्री योगाचे ज्येष्ठ प्रशिक्षक दिनेश काशीकर , आणि राष्ट्रीय समन्वयक डॉ. सेजल शहा यांच्या मार्गदर्शनाने)

Interested in yoga classes?