“नो युवर टीन” (तुमच्या किशोरवयीन मुलाला जाणा) (Teenage Problems in Marathi)

“नो युवर टीन” कार्यशाळा, वय १३-१८ वर्षे मुलांच्या पालकांकरिता.

 

किशोरवयीन मुले ही सर्वात मोहक जीव  आहेत. त्यांची सृजनशीलता, स्वप्ने आणि जगाचा शोध घेण्याची त्यांची अभिलाषा हे गुण त्यांच्यात  निसर्गत: असतात. उपकरणे, कॉम्पुटरचे खेळ, इंटरनेट यामधील त्यांचा रस हे त्यांच्या तल्लख  बुद्धिचे दर्शक आहेत. आणि तरीसुद्धा किशोरवयीन मुले हे नकारात्मक प्रभावाचे बळी होऊ शकतात, ज्याने पालकत्व अधिकच आव्हानात्मक बनते.

 

“नो युवर टीन”  कार्यशाळा ही पालकांना त्यांच्या किशोरवयीन मुलांना अधिक समजण्यात आणि त्यांच्या वर्तनाचे मूळ कारण शोधून काढण्यात मदत करते. किशोरवयीन मुलांच्या विचारांकडे  दुर्लक्ष करण्याची प्रौढांची प्रवृत्ती असते, ज्याचा या मुलांवर गहन परिणाम होऊ शकतो. थोडक्यात “नो युवर टीन” कार्यशाळा ही पालकांना आपल्या आधुनिक किशोरवयीन मुलाचे कौशाल्य पूर्वक संगोपन आणि पालनपोषण करण्यास सुसज्ज करते.

हि ३ तासांची कार्यशाळा अशी आहे ज्यात प्रशिक्षक आणि पालक यांच्यात एकमेकांशी संवाद साधण्यावर भर दिला जातो. त्यामुळे पालकांना खालीलप्रमाणे मदत होते:

 

फायदे

  • तुमच्या मुलाचे किशोरवयात होणारे परिवर्तन हाताळणे.
  • शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या तुमच्या किशोरवयीन मुलाच्या जीवनात सहभागी होणे.
  • त्यांचे  अद्द्दयावत दिसण्याबाबत आणि मित्रमंडळीकडून स्वीकारले जाण्याच्या गरजा समजून घेणे.
  • तुमच्या मुलाला भावनिकरीत्या स्थिर राहण्यात मदत करणे.
  • त्यांना करिअर निवडण्यात मदत करणारे त्यांचे मित्र व मार्गदर्शक  बनणे.