शासकीय कार्यकारी उपक्रम (Programs for Government Executives in Marathi)

भारतीय प्रशासन व्यवस्थेत अलीकडे अमुलाग्र बदल होत आहेत. बहुतेक संस्था आज त्यांची उद्दिष्टे गाठण्यासाठी  करण्यासाठी प्रचंड दबावाखाली आहेत, पण कर्मचारी वर्ग  आणि व्यावसायिक वातावरण दरवेळी त्याच्यासाठी  पोषक असेलच असे नाही.

परिस्थिती बदलायची असेल तर आधी प्रत्येक व्यक्ती मध्ये बदल होणे आवश्यक असतो. आज सरकारी कर्मचार्याना कर्तव्ये पार पाडताना अनेक बाजूंनी दबावांना तोंड द्यावे लागते जे त्याच्या/तिच्या कार्यक्षमता आणि प्रभावीपणासाठी आव्हान ठरू शकते.

कामाच्या ठिकाणी नव्हे तर त्यांच्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात देखील अनेक ताण असतात. यांचा परिणाम व्यक्तीच्या आरोग्य, कार्यक्षमता, आणि मनोधैर्या वर होतो. अनेकदा एखाद्याला वाटू लागते कि अशा ताणांना हाताळण्यासाठी आणि अधिक प्रभावी आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी काही कौशल्ये आणि तंत्रे शिकावी.

हे ताण साठत सुद्धा जातात आणि त्या संस्थेच्या कामगिरीवर सुद्धा परिणाम करतात. कार्यालयात सकारात्मक वातावरण करण्यासाठी आणि मानसिकतेत बदल आणण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग शिबिरांचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो.

 

  गव्हरमेंट एक्सिक्यूटिव्ह प्रोग्राम (GEP) आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे भारतीय सरकारी कर्मचार्यांसाठी विकसित केलेली कार्यशाळा आहे ज्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, कनिष्ठ विभाग, स्वायत्त संस्था, शासकीय विभाग अंगीकृत उपक्रम, सशस्त्र दल / पोलीस दल आणि प्रशिक्षण संस्थेचा समावेश आहे.

 

 शासकीय सेवकांच्या गरजा आणि त्यांना भेडसावणाऱ्या दररोजच्या आव्हानांना लक्षात ठेऊन हा कार्यक्रम योजिला

आहे. हा कार्यक्रम  वैयक्तिक पातळीवर, कार्यालयाच्या वातावरणावर, आणि संपूर्ण संस्थेवर अनेक पातळीवर परिणाम करतो. ह्या प्रशिक्षण कार्यक्रमात व्यावहारिक, सोपे, आणि प्रभावी पद्धती समाविष्ट आहेत ज्या प्राचीन ज्ञानावर आधारित आहेत. धर्म, जात, पंथ किंवा सामाजिक आर्थिक स्थितीच्या पलीकडे असल्यामुळे सर्व स्थरात हा प्रशिक्षण कार्यक्रम लोकांच्या पसंतीस उतरला आहे.

 

केंद्र आणि विविध राज्य सरकारच्या शेकडो विभागतल्या अधिकारी व कामगारांना आतापर्यंत ह्या

कार्यक्रमाचा लाभ पोहोचला आहे ज्यामध्ये मनुष्यबळ व प्रशिक्षण, गृह मंत्रालय, परराष्ट्र, अर्थ, संरक्षण, नागरिक

विमान, युवा, खाण, उर्जा, रस्ते आणि इतर विभागांचा समावेश आहे. अनेक प्रशिक्षण संस्था, शासकीय विभाग

अंगीकृत सार्वजनिक उपक्रम, पोलीस दल, निमलष्करी दल, लष्कर, स्वतंत्र जशा दक्षता (CVC), मुख्य निवडणूक

आयोग (CEC), इ. लोकसभा व विधानसभा सचिवालय, आणि कित्येक संस्थांनी त्याचा लाभ मिळविला आहे.

 

आमच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार ९०% पेक्षा अधिक सहभागी लोकांना अधिक उत्साह, तणावमुक्ती

बरोबरच मानसिक एकग्रता आणि स्पष्टता यामध्ये वृद्धि जाणवू लागली आहे.

९०% पेक्षा अधिक सहभागी सांगतात कि त्यांना नवीन आव्हाने स्वीकारण्यास अधिक आत्मविश्वास वाटतो आणि कार्यक्षमता आणि परस्पर संबंध सुधारले आहेत. तब्बल ८०% जणांना वाटते कि ह्या

कार्यक्रमामुळे एक कार्यालयात एक सकारात्मक वातावरण निर्माण होते, कर्मचार्यांच्या नैतिक मुल्यांमध्ये वाढ

होते आणि संस्थात्मक वृद्धिस योगदान मिळते.

 

सविस्तर चर्चा आणि सादरीकरणासाठी आमच्यापर्यंत पोहोचू शकता. आमच्याशी जरूर संपर्क करा.. आपण आम्हाला ईमेल करू शकता: gep@vvki.net मोबाईल: ९९१०२९९६९०