परिवार आणि नातेसंबंध आनंदी ठेवण्याचे रहस्य (Family relationships in Marathi)

फक्त सणासुदीलाच नाही तर जीवनातील प्रत्येक क्षण परिवारासोबत साजरा करा.

तुमच्याकडे जे आहे फक्त तेच तुम्ही इतरांना देऊ शकता. 

आपला परिवार आनंदी आणि एकोप्याने रहावा असं तुम्हाला वाटत असेल तर आधी स्वत: आनंदी आणि शांत राहिले पाहिजे.

आपल्याला त्या आनंदाचे केंद्रस्थान कसे बनता येईल हे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिबिरांमध्ये शिकविले जाते. अत्यंत प्रभावी श्वसन क्रिया व व्यावहारिक ज्ञानाच्या माध्यमातून हे साध्य केले जाते.

भावनांचा त्याग करा, प्रेमाचा नाही.

जेव्हा आपण भावनांच्या वादळात अडकतो, तेव्हा आपण काय करतो? लगेच अपशब्द वापरतो अथवा असं काही तरी करून बसतो ज्याचा काही काळानंतर आपल्याला पश्चाताप होतो. कारण आपल्या क्रोध, दुःख किंवा नकारात्मक भावना यांना कसे हाताळावे हे शाळेत किंवा घरी शिकविले जात नाही.

अशा वेळी आर्ट ऑफ लिव्हिंग हॅपिनेस प्रोग्राम मध्ये शिकविल्या जाणाऱ्या श्वसन क्रिया कामास येतात. मनात  उठणाऱ्या प्रत्येक भावनेला प्रतिरूप अशी एक लय श्वासांमध्ये असते. म्हणून जेव्हा मनावर थेट ताबा मिळविणे शक्य  नसते, तेव्हा श्वासाद्वारे मनावर ताबा ठेवता येतो.

जेव्हा आपल्याला श्वासांबद्दल अधिक ज्ञान होते, तेव्हा आपण आपल्या विचार आणि भावनांवर ताबा ठेवू शकतो, आणि आपल्या इच्छेनुसार क्रोध व नकारात्मक भावनांना दूर ठेवू  शकतो. आर्ट ऑफ लिव्हिंग हॅपिनेस प्रोग्राम मध्ये शिकविलेल्या “सुदर्शन क्रिया” च्या दैनंदिन अभ्यासामुळे तुमच्यातील नकारात्मक भावना आपोआप नाहीशा होतात. वारंवार येणारा क्रोध व तणाव हा प्रचंड प्रमाणात कमी होतो. वस्तुस्थिती स्वीकारायची क्षमता वाढते. भावनांच्या आवेगात काहीतरी करून बसण्या ऐवजी तर्कसंगत कृती कराल.  

आपापसातील प्रेम टिकवून ठेवण्यासाठी प्रारंभीचे आकर्षण आणि परिवर्तनशील भावनांच्या पलीकडे तुम्हाला जावे लागेल. मग कोणत्याही प्रकारच्या भावना आल्या तरी तुम्ही तुमच्या प्रियजनां बरोबर जीवनाची गोडी कौशल्याने टिकवून ठेवू शकाल.

आपसात सुसंवाद साधा

“मला खरेच तसे म्हणायचे नव्हते, तुम्हाला कळत कसे नाही?”

तणावामुळे तुमच्या विचार, वाणी आणि कृती यामध्ये तफावत निर्माण होउ शकते.

जेव्हा तुमचे मन तणाव-मुक्त असेल, तेव्हा परिस्थितीचे स्पष्टपणे आकलन होईल. वाणी शुद्ध होईल आणि कृतीमध्ये  सौम्यता येईल.

प्रेमाची अभिव्यक्ती योग्य तेवढीच करा.

जमिनीच्या पृष्ठभागावर पसरवलेल्या किंवा जमिनीत खोलवर पेरलेल्या बियांना अंकुर फुटू शकत नाही. त्यांना जमिनीच्या थोड्या आतमध्ये रुजवल्या तरच त्यांना अंकुर फुटून त्यांचे रुपांतर मोठ्या झाडामध्ये होते.
त्याचप्रमाणे प्रेम पण योग्य प्रमाणातच व्यक्त करावे आणि ध्यान केल्याने हि कला आपण सहजपणे अवगत करू शकतो.

आर्ट ऑफ लिव्हिंग हॅपिनेस प्रोग्राम मध्ये शिकविलेल्या पद्धतीमुळे तुम्हाला आराम मिळतो आणि तुम्ही तणाव मुक्त होता, त्यामुळे तुमचा परिवाराच्या बाकी व्यक्तींबद्दल अधिक संवेदनशील आणि जागरूक राहता, यामुळे तुम्ही स्वत:ला प्रभावीपणे व्यक्त करू शकता आणि तुम्हाला नेमके काय सांगायचे आहे ते इतरांना बरोबर उमगू लागेल.

आपल्या घरी शांती, आनंद आणि सुख येण्यासाठी एक पाऊल उचला.

एक आनंदी मनच तुम्हाला शांत ठेवू शकते, तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता आणि आयुष्याचा दर्जा सुधारू शकता.  आनंदमय जीवन जगण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा.