अध्यात्मिक अनुभव (Spiritual experiences in Marathi)

  • आयुष्याच्या उद्देशाचा शोध घेणे.
  • जीवनातील आणि श्रुष्टीतील गूढ रहस्यांचा शोध घेणे.
  • स्वातंत्र्य अनुभवणे आणि तुमच्या अस्तित्वाच्या गहनतेचा ठाव घेणे.
  • सद्गुरुंच्या सान्निध्यात परम सत्यचा, उच्चतम ज्ञान आणि अतुलनीय आनंद यांचा अनुभव घेणे.

अध्यात्मिक मार्गावरील अनुभव खात्रीशीर परंतु अवर्णनीय आहेत.

पायरी पायरीने होणारा गूढ प्रवास

तुमचे शरीर, मन आणि आत्मा यांना निरोगी आणि अनुरूप करा

सुदर्शन क्रिया शिकणे ही सगळ्यात पहिली पायरी आहे. ,सुदर्शन क्रिया हे अतिशय शक्तिशाली श्वसन तंत्र असून जे केल्याने आपले शरीर, मन आणि आत्मा शुद्ध होऊन सुसंगत होतात. सुदर्शन क्रिया आपल्यातील साचून राहिलेल्या तणावाला नैसर्गिकपणे आणि प्रभावीपणे दूर करते.

तुमच्या अनंत स्वभावात निःश्चिन्त व्हा

मौनाचा सराव – आपली ऊर्जा व लक्ष सतत बाह्य जगातील विचलित करणाऱ्या घटनांवर असते. ते बदलून आंतरिक शांतीवर लक्ष केंद्रित केल्याने शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक ह्या तिन्ही स्तरांचे पुनरुज्जीवन होते. ह्या तंत्राचा वापर प्राचीन काळापासून विविध परंपरांमध्ये करण्यात आलेला आहे. या प्रक्रिया खास करून आपल्याला सतत क्रियाशील असलेल्या आपल्या मनाच्या पलीकडे नेण्यासाठी बनविलेल्या आहेत. त्यांच्यामुळे एका आगळ्यावेगळ्या शांततेचा आणि नवीन ऊर्जेचा अनुभव आपण घेऊ शकतो. ज्याचा उपयोग आपण आपल्या दैनंदिन जीवनात करू शकतो.

तुमच्या अस्तित्वाच्या गहनतेचा शोध घ्या

ध्यानामध्ये तळ गाठण्याकरिता एका योग्यता असलेल्या शिक्षकाकडून मंत्र प्राप्त करून घेणे अतिशय महत्वाचे आहे. सहज समाधी ध्यान, ध्यानाची गहनता अनुभवण्यासाठी एका योग्यता असलेल्या शिक्षकाकडून मंत्र प्राप्त करून घेणे अतिशय महत्वाचे आहे. यामध्ये एका साध्या सोप्या ध्वनीचा मनातल्या मनात उच्चार करून मन शांत व अंतर्मुख करण्याचे तंत्र शिकविले जाते. जेव्हा गहन शांततेमध्ये मन आणि चेतासंस्था यांना काही क्षणांची विश्रांती मिळते, तेव्हा आपल्या प्रगतीला अडसर ठरणारे अडथळे हळूहळू विरघळून जाऊ लागतात. या तंत्राच्या नियमित सरावाने शांतता, अधिक उर्जा आणि जागरूकता दिवसभर कायम राखता येते आणि त्यामुळे आपल्या आयुष्याचे संपूर्णपणे रुपांतर घडून येऊ शकते.

आशीर्वाद देण्याची आणि बरे करण्याची शक्ती प्राप्त करून घ्या

ब्लेसिंग (आशीर्वाद) कार्यक्रमामध्ये समृद्धी, तृप्ती आणि कृतार्थता हे आपल्या मधील सुप्त गुण विकसीत होतात. कृतार्थता हा चैतन्याचा फारच सुंदर गुण आहे. यामुळे आपल्याला आशीर्वाद देण्याची क्षमता आणि बरे करण्याचे माध्यम बनणे शक्य होते. आशीर्वाद मागणाऱ्याला तो देता येणे ही तुमच्यातील प्रेमळ वृत्ती व सेवाभावाचे द्योतक आहे. तुम्ही दिलेल्या आशीर्वादाने समोरच्या व्यक्तीचे आयुष्य पालटू शकते. अनेक लोकांना चमत्कारिक अनुभव आलेले ऐकिवात आहेत.

कृतज्ञतेत बहरून या

अध्यात्मिक मार्गावर असलेल्या बहरून आलेल्या चैतन्याची सर्वांत पवित्र आणि शुद्ध अभिव्यक्ती म्हणजे कृतज्ञता. पवित्र गुरु परंपरेतील गुरु, ज्यांनी हे अनमोल ज्ञान वर्षानवर्षे सांभाळून ठेवले आहे त्यांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजेच गुरु पूजा होय.
जेव्हा एक थेंब सागराला जाऊन मिळतो तेव्हा त्याला सागराएवढी बळकटी वाटते. त्याचप्रमाणे, जेव्हा आपण गुरुपरंपरेतील गुरुंसोबत जोडले जातो तेव्हा अनंत शक्तीचा स्रोत्र आपल्याला प्राप्त होतो.