श्री श्री योग (Sri Sri Yoga in Marathi)

श्री श्री योग – तणावमुक्त शरीर आणि मनाचा मार्ग

योगामधील वैविध्य श्री श्री योग अतिशय सोप्या आणि आनंदमयी प्रकारे साजरे करतो. आम्ही योगाची मुलभूत तत्वे : श्वसनाची तंत्रे, अंग ताणणे, योगासने, ध्यान, शिथिलता आणि योगाचे ज्ञान यांना एकत्र आणतो. या सर्व योगाच्या सुंदर पैलूंना अंतर्भूत केल्यामुळे आपण भौतिक शरीराच्या पातळीच्या पलीकडे पाहू शकतो आणि अस्तित्वाच्या सूक्ष्म पातळीवर आपली संवेदनशीलता आणि जागरुकता या खरोखर तीक्ष्ण होतात. श्री श्री योगाच्या सरावाने अधिक निरोगी आरोग्य आणि अधिक आनंदी जीवनशैली अंगी बाणते.

श्री श्री योगाने माझा काय फायदा होणार?

श्री श्री योगाचे कार्यक्रम यांची रचना श्री श्री रविशंकर यांच्या द्वारे करण्यात आली असून त्याचा उद्देश्य उत्तम प्रकृती आणि तुमचे मन आणि आत्मा यांना जोपासणे हे आहे. तुम्ही नवशिके आहात किंवा नियमित सराव करणारे ज्याला योगाभ्यासात आणखी खोलात जायचे आहे, अशा दोहोंकरिता श्री श्री योग कार्यक्रम अत्यंत उपयुक्त आहे. योग म्हणजे केवळ शरीराला वेडेवाकडे वाकवणे नव्हे – तर योग म्हणजे शरीर, मन आणि श्वास यांची एकरूपता अनुभवणे होय – आणि श्री श्री योग नेमका तोच अनुभव तुम्हाला देतो. नवशिके आणि असे प्रगत सराव करणारे ज्यांना त्यांचे शारीरिक, भावनिक आणि अध्यात्मिक जीवन संपन्न करावयाचे आहे अशा दोघांकरिता हे एकदम आदर्श आहे.

श्री श्री योग लेव्हल १ – आनंदी आणि निरोगी जीवनाच्या दिशेने उचलेले तुमचे पहिले पाऊल

श्री श्री रविशंकर जी यांनी रचना केलेला श्री श्री योग लेव्हल १ हा १० तासांचा कार्यक्रम खेळीमेळीने योग शिकवतो. सुरवातीच्या हलक्या व्यायामांचा संच, सोपी ते अवघड योगासने, चैतन्य आणणारी प्राणायामे, मार्गदर्शित ध्यान, पतंजली सायोग सूत्रांचे प्राचीन साधे आणि समयोचित ज्ञान, आयुर्वेदाची एक झलक आणि आपल्या शरीराची अद्वितीय रचना यांचे मजेने भरलेले हे मिश्रण आहे.

तुमच्या जवळील श्री श्री योग कार्यक्रम शोधा

श्री श्री योग लेव्हल २ – शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाका आणि मनाला तणावमुक्त करा

ज्यांना श्री श्री योग लेव्हल २ बरोबर योगामध्ये खोलवर जायचे आहे, ते संपूर्ण प्रणालीचे – शरीर आणि मन दोन्हीचे – पूर्णतः शुद्धीकरण अनुभवतील आणि परिणाम होईल ते हलके आणि ताजेतवाने होऊन दिवसाची नवी सुरुवात करण्यात. प्रगत योगासने आणि श्वसन तंत्रे यांच्या सोबत सटल (तरल) (एस) स्ट्रेनदनिग (मजबूत करणारे) (एस) आणि (ए) हिलिंग (रोगनिवारक) (एच) कॅानूट्रॅक्शनस (आकुंचने) (सी) (एसएसएएचसी) – कार्यक्रमाचा चित्तवेधक भाग -- श्री श्री योग लेव्हल २ हा शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्याचा आणि मन तणावमुक्त करण्याचा मार्ग आहे. प्रसन्न शांत जागी चार दिवसांची ही सुट्टी अशी असेल की तुम्ही फिरून पुन्हा पुन्हा स्वयंकडे वरचेवर याल.

तुमच्या जवळील श्री श्री योग कार्यक्रमामध्ये नोंदणी करा आणि योगाचे एक नवीन परिमाण अनुभवा, मन आणि आत्म्याला होणारे तरल फायद्यांचा आनंद घ्या, त्याचबरोबर शरीराचे होणारे फायदे तर दिसून येतातच.

पूर्व- आवश्यकता: श्री श्री योग लेव्हल १, दि आर्ट ऑफ लिव्हिंग हॅप्पिनेस प्रोग्राम १ / येस!+

कार्यक्रम समन्वयक

श्री श्री योग याचे राष्ट्रीय समन्वयक: national@srisriyoga.in

श्री श्री योग याचे भारतातील राज्य समन्वयक

 

मार्च ११, १२ आणि १३ २०१६ रोजी होणारा जागतिक सांस्कृतिक उत्सव (वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल) म्हणजे दि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेवा, माणुसकी, अध्यात्म आणि मानवतावादी मुल्ये या क्षेत्रातील ३५ वर्षाच्या कार्याचे पर्व साजरे करणे होय. हा उत्सव म्हणजे संपूर्ण जगभरातील संस्कृतींमधील वैविध्य साजरे करताना मानवी समाजाचे सदस्य म्हणून आपल्यातील एकोप्याचे दर्शन घडवून आणेल.

www.artofliving.org/wcf

  • तंत्र
  • फायदे
    • प्रभावी योगासने
    • मनाचे शुद्धिकरणासाठी श्र्वासोच्छ्वासाचे तंत्र
    • जागरूक राहून योगासने कशी करावीत
    • मार्गदर्शित ध्यान
    • आधुनिक जगाशी संबंधित योग तत्वज्ञान
    • सुंदर जीवन प्रणाली साठी सूचना
  • शरीराप्रति

    • शरीरातील अंतर्गत अवयव मजबूत होतात
    • शरीरातील लवचिकता, ठेवण सुधारते, शरीर एकरेखीत होते
    • स्नायू आणि हाडे मजबूत होतात
    • पचन, अभिसरण आणि प्रतिकार शक्ती सुधारते
    • मज्जातंतू संस्था आणि संप्रेरक अवयवांच्या कार्यात सुधारणा होते
    • उर्जा वाढते

    मनाला होणारे फायदे

    • अंतर्ज्ञान विकसित होते
    • तणाव कमी करून मन शांत करते
    • बुद्धी तल्लख होते
    • स्मृती वाढते
    • स्पष्टता वाढते
    • एखाद्याच्या जीवनात सृजनशीलता फुलते