तणाव मुक्त शिक्षण – परिसंवाद (Stress free programs in Marathi)

‘तणाव मुक्त शिक्षण’ हे एक तासाचे छोटे पण प्रभावशाली चर्चासत्र आहे ज्यामध्ये शिक्षण क्षेत्रात तणाव कां आहे आणि तो कमी कसा करायचा ह्या विषयांवर चर्चा होते. शिक्षकाच्या दैनंदिन जीवनात तणाव हा एक अविभाज्य घटक आहे. शिक्षकांना तणाव येण्याची कारणे:

  • विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेची क्षमता
  • मोठे वर्ग सांभाळणे
  • अद्यावत रहाणे
  • चांगल्या गुणांच्या निकालासाठी कामगिरी
  • अभ्याक्रम पूर्ण करणे
  • विद्यार्थ्यांच्या वागणुकीतील आणि भावनिक अडचणी.

तणावाचे कारण समजले, तर शिक्षक त्याच्या अडचणी / आव्हाने यांच्यावर मात करण्यासाठी काही आखणी करू शकतो, ह्याच्या मुळे जीवनाची गुणवत्ता सुधारते आणि तणाव कमी होतो, त्यामुळे शिक्षक आनंदी, निरीगी आणि शिक्षण क्षेत्रात जास्त यशस्वी होतो.

फायदे

  • ताणावाची कारणे समजतात
  • तणाव घालवता येतो
  • निरनिराळ्या प्रकारची मुले सांभाळण्याबद्दलच्या सूचना

गोषवारा

शिक्षकांसाठी एक तासाचे सत्र

शिबिराची रूपरेखा

  • शिक्षकांमधील तणावाचे कारण शोधणे
  • शारीरिक ताण घालवण्यासाठी सोपी आसने
  • मानसिक ताण घालवण्यासाठी काही प्राणायामाचे प्रकार
  • अनेक प्रकारची मुले हाताळत असताना त्यांची उत्तम कामगिरी व्हावी यासाठी सूचना
  • शिकवण्यातला ताण घालवणे