रांचीमध्ये स्वच्छता मोहीम (Cleanliness campaign in Ranchi Marathi)

राजेश कुंडू : ०७७६२८२७१०९

रांची, झारखंड : रांची येथे १८ ऑक्टोबर रोजी आर्ट ऑफ लिव्हिंगने स्वच्छता मोहीम आयोजित केली होती. आपल्या पंतप्रधानांच्या ‘स्वच्छता अभियान’ ला प्रतिसाद देण्यासाठी, आपला वार्ड आदर्श बनवावा म्हणून शनिवारी शहरातील विविध भागामधील स्वयंसेवकांचा ताफा वार्ड २१ मधील नागरतोळीच्या जेल रोड प्रवेशद्वाराजवळ जमला होता.

रांचीचे माजी डीएसपी. श्री. पी.एन.सिंग जे आर्ट ऑफ लिव्हिंगचे  प्रशिक्षक आहेत, ते म्हणाले, “ आमच्या संस्थेचा प्रतिनिधी नियमित या वार्डाच्या स्वच्छतेची देखरेख करेल.” पुढे म्हणाले, “भारतातील बहुतांशी लोक आपले घर,स्वयंपाकघर चकचकीत,स्वच्छ ठेवतात परंतु सार्वजनिक ठिकाणांना मात्र कचराकुंडी समजतात. स्वच्छतेबरोबरच लोकाना सार्वजनिक ठिकाणी केर-कचरा न टाकण्याची मानसिकता बदलण्यासाठी प्रशिक्षित करणे गरजेचे आहे.

रांची महानगरपालिका महापौर आशा लाक्रा, उपमहापौर संजीव विजयवरगिया, मुख्याधिकारी मनोज कुमार, वार्ड नगरसेविका रोशनी खालको, राज्याचे वाय एल टी पी समन्वयक उज्ज्वल भास्कर, झारखंडच्या माजी एसटीसी श्रीमती सबिता सिंह, स्वामी ओंकारानंद, झारखंडचे अपेक्सचेअरमन श्री बी.के.सिन्हा, अशिम कुंडू आणि उषा बुधिया हे या मोहिमेमध्ये सहभागी झाले.