पश्चिम – पश्चिम; उत्तान-ताणणे; आसन – शरीराची मुद्रा / पवित्रा
पश्चिमोत्तानासन कसे करावे
- आपले पाय समोर पसरवून बसा. पाठीचा कणा ताठ ठेवा. पायाची बोटे आपल्या दिशेला ताणलेली ठेवा.
- श्वास घेत आपले दोन्ही हात डोक्याच्या वर घेऊन जा आणि वर खेचा.
- श्वास सोडत कमरेतून पुढे वाका. पाठीचा कणा ताठ ठेवत गुडघ्याकडे वाकण्याऐवजी हनुवटी पायांच्या बोटांच्या दिशेने पुढे न्या.
- कोणताही जोर न देता जिथपर्यंत तुमचे हात पोहोचतील तिथे त्यांना पायावर ठेवा. आपल्या पायांची बोटे पकडता आली तर त्यांना आपल्या दिशेने खेचत अधिक पुढे जाण्यास मदत मिळू शकते.
- पश्चिमोत्तानासन योगासन – बसून आपल्या शरीराला पुढच्या दिशेने खेचण्याचे योगासन.
- श्वास घेत आपले डोके थोडे वर उचला. आपल्या मणक्याला लांब होऊ दया.
- श्वास घेत हळूवारपणे आपल्या नाभीला गुडघ्याकडे झुकवा.
- हीच क्रिया दोन-तीन वेळा करा.
- आपले डोके खाली करून २० – ६० सेकंद खोल श्वास घ्या.
- आपले हात आपल्या समोरच्या बाजूला ताणा.
- श्वास घेत आपल्या हातांच्या मदतीने उठून बसत सुरुवातीच्या स्थितीमध्ये या.
- श्वास सोडत हात खाली घ्या.
पश्चिमोत्तानासन व्हिडिओ
पश्चिमोतानासनाचे फायदे
- पाठीचा खालचा भाग, गुडघ्याच्या मागचे स्नायू (hamstrings)आणि नितंबामध्ये तणाव उत्पन्न करते.
- पोटाच्या आणि ओटीपोटाच्या अवयवांना मसाज करून त्यांना सुडौल बनवते.
- खांदयांना सुडौल बनवते.











