योग आणि प्राणायाम (Pranayama yoga in Marathi)

योगिक श्वसन किंवा प्राणायाम म्हणजे काय ?

‘प्राण’ म्हणजे वैश्विक जीवन शक्ती होय,तर ‘आयाम’ म्हणजे तिला नियंत्रित करणे, दीर्घ करणे. आपल्या शारीरिक आणि सूक्ष्म स्तरांसाठी प्राणशक्तीचे खूप महत्त्व आहे, जिच्या शिवाय आपले शरीर नष्ट पावू शकते, जिच्यामुळे आपण जिवंत आहोत. श्वसनाच्या माध्यमातून प्राणावर नियंत्रण प्राप्त करणे म्हणजे प्राणायाम. या प्रक्रिया नासिकांद्वारे श्वास घेण्यावर अवलंबून आहेत.

 

 

हजारो सूक्ष्म ऊर्जा मार्ग ज्यांना आपण ‘नाडी’ म्हणतो त्यांच्या मधून आणि ऊर्जा केंद्रबिंदू, ज्यांना आपण 'चक्र' म्हणतो यांच्यामधून प्राण संचारत असतो. एखाद्याची ‘मनस्थिती’ ही संचारणाऱ्या प्राणाचे प्रमाण आणि गुणवत्ता तसेच ज्या पद्धतीने तो नाडी आणि चक्रे यामधून संचार करतो, याच्यावर ठरते. जर प्राणाची पातळी उच्च असेल आणि त्याचा प्रवाह सलग, हलका आणि संथ असेल तर  त्याचे मन शांत, सकारात्मक आणि उत्साही राहते. ज्ञानाचा अभाव आणि श्वसनाबाबतची सजगता नसणे, यांच्यामुळे सर्व सामान्य व्यक्तींच्या नाडी आणि चक्रे यांच्यामधील आंशिक तसेच पूर्णतः अडथळ्यामुळे त्याचे श्वसन झटक्याने तसेच अपूर्ण असू शकते. त्याच्यामुळे वाढत्या काळज्या, भीती, अनिश्चितता, तणाव, विरोधाभास आणि इतर नकारात्मक गुणांचा अनुभव येऊ शकतो.

प्राचीन भारतीय पुराणांमध्ये या श्वसन प्रक्रियांचे महत्त्व माहित होते. भस्त्रिका, कपालभाती आणि नाडी शोधन प्राणायाम हे काही साधारण प्राणायाम आहेत. यांच्या सततच्या सरावामुळे प्राणशक्तीचे प्रमाण आणि गुणवत्ता यांची वृद्धी, नाडी आणि चक्रे यामधील अडथळे निघून जाणे तसेच या सर्वामुळे सराव कर्त्यास जोमदार, उत्साही,आणि सकारात्मक वाटते. तज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या प्राणायाममुळे  शरीर, मन आणि आत्मा यामध्ये संतुलन प्राप्त होऊन शारीरिक, मानसिक आणि आत्मिक बळकटी प्राप्त होते.

इशारा:  प्राणायाम सूक्ष्म प्राणशक्तींशी संबंधित असल्याने त्यांचा सराव योग शिबिरामध्ये शिकवल्याप्रमाणे करणे महत्वाचे आहे. त्यांच्याशी प्रयोग करू नका.

योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे लाभ प्राप्त होत असले तरी ते औषधोपचाराला पर्याय ठरू शकत नाही. तज्ञ  श्री श्री योगाच्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली योगासने शिकणे आणि सराव करणे महत्वाचे आहे. काही उपचार सुरु असतील तर डॉक्टरांच्या आणि श्री श्री योग प्रशिक्षकाच्या सल्ल्याने योगाभ्यास करावा. जवळच्या आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर मधून श्री श्री योगा शिबिराचा तपशील मिळवा. शिबिरांची माहिती आणि आपले अनुभव कळवण्यासाठी info@srisriyoga.in या संकेतस्थळावर संपर्क साधा.

 

 

Interested in yoga classes?

Founded in 1981 by Sri Sri Ravi Shankar,The Art of Living is an educational and humanitarian movement engaged in stress-management and service initiatives.Read More