उपवासामुळे तुमच्या यकृत आणि स्वादुपिंड अशा अंतर्गत अवयवांना आवश्यक विश्रांती मिळते, जे बऱ्याचदा ओव्हरटाइमवर (अतिरिक्त) काम करतात. विश्रांतीचा हा कालावधी तुमच्या शरीरातील झीज भरून काढण्यास मदत करतो आणि संपूर्ण आरोग्याला चालना देतो. अधूनमधून तुम्ही आपल्या ‘कम्फर्ट झोन’ला ताण देणे महत्त्वाचे असते. तुम्ही नेहमीकरिता आपल्या ‘कम्फर्ट झोन’मध्ये राहू शकत नाही; वर्षभरात कधीतरी, त्यापलीकडे ताण दिल्यास तुम्हाला तुमच्या अशा क्षमता शोधण्यात मदत करते, ज्या कदाचित तुम्हाला तुमच्यात आहेत हे माहीत सुद्धा नसेल. तुमचे शरीर ताठर नसून लवचिक आणि जुळवून घेण्याच्या क्षमतेचे आहे. या जुळवून घेण्याच्या क्षमतेकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते आणि उपवासा सारख्या पद्धती आपल्याला आठवण करून देतात की शरीरापेक्षा आपले मन अधिक बलशाली असू शकते.

खरे व्रत समजून घेणे

तथापि, उपवासाचा खरा अर्थ काय याबद्दल अनेकदा गोंधळ होतो. नवरात्रीच्या दरम्यान, जसे काही लोक उकडलेले आणि तळलेले बटाटे, जेवणासाठी दोन केळी, एक वाटी सुकामेवा आणि थोडी मिठाई खातात, तरीही आपण उपवास करीत असल्याचा दावा करतात. हा दृष्टीकोन, ज्यात उपवासात जड मेजवानी चा आस्वाद घेत दुसऱ्या दिवशी ही पोट भरलेले असते, असे उपवास म्हणून कुचकामी ठरतात.

हा देखील एक सामान्य गैरसमज आहे की उपवास हा देवतांना प्रसन्न करण्यासाठी किंवा पूजा विधी पूर्ण करण्यासाठी केला जातो. उपवासाचा खरा उद्देश देवी देवतांना प्रसन्न करणे हा नसून, उपवास करणे म्हणजे आपले शरीर विषमुक्त करणे आणि शुद्ध करणे.

उपवासा दरम्यान काय खावे

उपवासाच्या दिवशी, तुमच्या शरीराच्या नैसर्गिक शुद्धीकरण क्रियेला योग्यपणे पार पडण्यासाठी फळे, भाज्या आणि पाणी सेवन करण्याचे सुचवले जाते. लिंबू आणि मध पाणी यांसारखी पेये शुद्धीकरणात मदत करू शकतात, शरीर विषमुक्त होण्यास चालना देतात आणि त्यामुळे मन निर्मळ, अधिक केंद्रित होते. बहुदा पूजा, प्रार्थनेसह जोडलेल्या उपवासांचे अनेक धार्मिक परंपरांमध्ये एक महत्त्वपूर्ण स्थान आहे, ज्यामुळे आध्यात्मिक आणि शारीरिक कल्याणामध्ये त्याचे गहन महत्त्व दिसून येते. तथापि, जर तुम्हाला मधुमेहा सारखे आजार असतील तर सावधगिरी बाळगणे आणि या उपवासा दरम्यान तुमच्या शरीरावर ताण पडू न देणे महत्वाचे आहे.

तुमच्या शरीराच्या प्रकारावर आधारित उपवास

जर तुमची प्रामुख्याने पित्त प्रकृती असेल तर तुमचे पाचन संतुलन राखण्यासाठी उपवास पूर्णपणे टाळणे योग्य असेल. तृणधान्ये आणि घन आहार या ऐवजी ताज्या रसदार फळांचे रस सेवन करा, जे तुमच्या शरीर प्रणालीला जास्त ताण न देता पोषण प्रदान करू शकतात. कफ आणि वात दोष असलेल्या व्यक्ती, उपवास सामान्यतः सहजपणे करू शकतात आणि ताजेतवाने होण्यासाठी तसेच शरीर शुद्धीकरणासाठी नियमित उपवास लाभदायक ठरू शकतो. विशेषत:, कफ दोष असलेल्यांना पाणी, लिंबू पाणी किंवा नारळाच्या पाण्यावर उपवास करणे त्यांच्या दोषाचे संतुलन साधण्यासाठी आणि सर्वांगीण आरोग्यासाठी प्रभावी ठरू शकते.

तुमची नवरात्रीची अनुभुती वाढवा

उपवास करताना, खाण्याबाबत ध्यास लागल्यास तुमची भूक तीव्र होऊ शकते. जेव्हा तुमचे मन अध्यात्मिक कार्यात गुंतून जाते तेव्हा उपवासाचा अनुभव खूपच नितळ आणि अधिक सहज बनतो. अध्यात्मिक विधी किंवा ध्यान यासारख्या अर्थपूर्ण कार्यामध्ये स्वतःला गुंतवून घेतल्याने तुमचे लक्ष अन्नापासून दूर होण्यास मदत होऊ शकते. दिव्यत्वाशी तादात्म्य ठेवल्याने आणि आपल्या चेतनेच्या उत्थानात व्यस्त राहल्याने, उपवास हा एका आव्हानात्मक परीक्षेऐवजी अधिक सुसंवादी आणि सहज अनुभव असू शकतो.

या नवरात्रीत, तुम्ही गुरुदेवांच्या नेतृत्वाखालील ९ दिवसांच्या नवरात्रीच्या ध्यानात सामील होऊन तुमचा उपवासाचा अनुभव गहन करु शकता.

तुम्ही तुमचा उपवास कसा सोडता याकडे लक्ष देणे देखील महत्त्वाचे आहे. उपवासाच्या कालावधीनंतर, फ्रिटर, चिप्स, बर्गर किंवा ब्रेड यांसारख्या जड पदार्थांनी सुरुवात केल्याने तुमच्या संवेदनशील पचनसंस्थेवर भार पडू शकतो. तीन ते पाच दिवस उपवास केल्याने तुमचे शरीर विशेषतः नाजूक होते, हे लक्षात घेता, हळूहळू अन्नपदार्थांचे सेवनाची सुरुवात करणे आवश्यक आहे. या काळजीपूर्वक दृष्टीकोनाने तुमची पचनसंस्था सुरळीतपणे कार्य करू लागेल आणि संपूर्ण आरोग्य चांगले राहण्यास मदत लाभेल.

तसेच नेहमी योग्य मार्गदर्शनाखाली उपवास करा आणि तुमच्या शरीराच्या विशेष गरजांकडे लक्ष द्या. आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास तुमच्या शरीराच्या प्रकारावर आधारित उपवास करण्याच्या सर्वोत्तम वैयक्तित शिफारसी देऊ शकतात. तुमच्या शरीराचे ऐकून आणि तज्ञांच्या सल्याचे पालन करून, तुम्ही तुमचा उपास सहजपणे करू शकता. तुमचे एकंदर आरोग्य सुधारू शकता आणि अधिक प्रभावी आणि संतुलित अनुभव नक्की घेऊ शकता.