विजयादशमीचा उत्सव
जेव्हा मनातील सर्व विकृती आणि नकारात्मक प्रवृत्ती दूर होतात तो दिवस म्हणजे विजयदशमी. वर्षभरात जमलेल्या मनातील सर्व लालसा आणि तिरस्कारांवर विजयाचे प्रतीक म्हणजे हा दिवस आहे.
जेव्हा चांगल्या प्रवृत्तीचा वाईटावर विजय झाला, जे अंतिमतः चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे हे दर्शवत हा विजय साजरा केला जातो. रावणाची दहा डोकी दहा नकारात्मक गुण दर्शवतात जे दूर करायचे असतात आणि त्याच्या पुतळ्याचे दहन आपल्यातील ही नकारात्मकता नष्ट करण्याची गरज दर्शवते. या नकारात्मक गोष्टी दूर केल्याने आपल्यातली आंतरिक दिव्यता उजळून निघते.
विजया दशमीच्या दिवशी, आपण सगळे नकारात्मकता दूर करण्याचा आणि आपला आंतरिक विजय साजरा करण्याचा प्रयास करतो. हा दिवस आपल्याला आपल्या आंतरिक आनंदाची आणि पवित्रतेची आठवण करून देतो, आपल्या बालपणाची आठवण करून देतो. आपल्या चेतनेला पुनरुज्जीवित करण्याची, जमा झालेली नकारात्मकता दूर करण्याची आणि सातत्याने उत्सव आणि आत्मज्ञानाचे जीवन अंगीकारण्याची ही वेळ आहे.
उत्तर भारतात, विजया दशमीला रावण दहन म्हणून मानले जाते, जे देवी आणि श्री रामजी यांना अंतःस्थपणे जोडते. श्रीराम अयोध्येला परतणे ही ऐतिहासिक घटना आणि आतल्या विकारांवर विजय या दोन्हींचे प्रतीक आहे. चैत्र नवरात्रीच्या दरम्यान, आपण श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा करतो, तर शरण नवरात्री त्यांच्या पुनरागमनाचा उत्सव म्हणून साजरा करतो, ज्याद्वारे आपल्यातील दिव्य प्रकाश प्रतिबिंबित होतो.
राम आणि अयोध्येचे प्रतीक
श्रीराम हे आपल्या अंतरात्म्याचे प्रतीक आहे आणि अयोध्या आपल्या शरीराचे प्रतीक आहे. अयोध्या, ज्याचा अर्थ “अजिंक्य” आहे, हे अशा शरीराच्या संदर्भात आहे जे इजा करत नाही किंवा त्याला इजा होऊ शकत नाही. हे विजया दशमीचा सार दर्शवते – जेव्हा आत्मा, दिव्य चैतन्य, या अजिंक्य शरीरात प्रवेश करते तेव्हा विजय प्रकट होतो. हा आंतरिक विजय आत्म-ज्ञानाचे सार आहे, आणि या वैयक्तिक विजयावर हा उत्सव केंद्रित होतो.
रामायणाच्या कथेमागील गहन अर्थ
रामायणाच्या कथा त्याच्या कथनापेक्षा त्यामागील सखोल अर्थातून बरेच काही सांगून जाते.. “रा” म्हणजे प्रकाश, आणि “म” म्हणजे माझ्या आत, म्हणून राम आपल्या आतील प्रकाशाला सूचित करतो. दशरथ आणि कौशल्य यांच्या पोटी जन्मलेला, दशरथ दहा रथांचे प्रतिनिधित्व करतो – पाच इंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये यांचे प्रतीक. कौशल्या कुशलता साकारते, सुमित्रा आपुलकीचे, मित्रत्वाचे प्रतिनिधित्व करते आणि कैकेयी म्हणजे उदारता. ऋषींच्या आशीर्वादाने दशरथ आणि त्यांच्या तीन पत्नींनी रामाचे या जगात स्वागत केले.
राम आपल्यातील आत्म्याचे, दिव्य प्रकाशाचे प्रतिनिधित्व करतो. लक्ष्मण म्हणजे सजगता, आपल्या अस्तित्वाचा सदैव सतर्कतेचा पैलू. शत्रुघ्न म्हणजे ज्याला शत्रूच नाहीत, तर भारत तेज आणि प्रतिभा दर्शवतो. अयोध्या म्हणजे “जे जिंकले जाऊ शकत नाही किंवा नष्ट केले जाऊ शकत नाही,” ते आपल्या शरीराचे प्रतिनिधित्व करते.
आपले शरीर अयोध्या आहे आणि या शरीराचा राजा दशरथ आहे – पाच इंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये. जेव्हा मन रुपी सीता, आपल्या आत्म्यापासून म्हणजेच रामापासून दूर गेली तेव्हा अहंकार दर्शवणाऱ्या रावणाने तिचे अपहरण केले. राम आणि लक्ष्मण (आत्मा आणि सजगता), हनुमानाच्या मदतीने, जे जीवनशक्ती किंवा उर्जेचे मूर्त रूप आहे, सीतेला (मन) घरी परत आणण्याचा प्रयत्न करतात. ही कथा उत्सवाचा गहिरा संदेश अधोरेखित करते – आंतरिक सुसंवाद पुनःस्थापित करणे आणि आपल्यातील दिव्यत्वाचा उत्सव साजरा करणे.

विजया दशमीला देवीच्या विजयाचे महत्त्व: आंतरिक संघर्षांवर मात करणे आणि दिव्य स्वरूप प्रकट करणे
नवरात्रीच्या या ९ दिवसांत, आपण महाकालीचे पूजन करतो, जिने मधू आणि कैटभ या राक्षसांचा पराभव केला. भगवान विष्णू विश्रांती घेत असताना त्यांच्या कानातून उद्भवणारे हे राक्षस राग (इच्छा) आणि द्वेष दर्शवतात. त्यांचा देवी महाकालीने केलेला पराभव आंतरिक संघर्षांवर मात करण्याचे प्रतीक आहे. हा दैवी विजय विजयादशमी या सणाला समजून घेण्यासाठी आवश्यक आहे – आपल्यातील नकारात्मक शक्तींना पार करत आपले खरे, दैवी स्वरूप जाणून घेण्यासाठी.
ध्यान आणि उपवासाची भूमिका
आपल्यातील ही दैवी शक्ती जागृत करण्यासाठी आपण स्वतःला ध्यान आणि मंत्रजापात गुंतवून घेतो. या काळात सजगतेने योग्य प्रकारचा उपवास करावा. पुष्कळजण उपवास करताना बटाटे किंवा मिठाई यासारखे जास्त स्टार्चयुक्त पदार्थ खातात, जे शरीराच्या शुद्धीकरण प्रक्रियेत अडथळा आणू शकतात. त्याऐवजी, उपवासात फळे आणि ताक यांसारख्या हलक्या, सहज पचण्यायोग्य पदार्थांचे सेवन करावे, ज्यायोगे शुद्धीकरण होते आणि चेतना वाढते. ही प्रथा थेट सणाच्या उद्देशाशी निगडित आहे – गहिरी आध्यात्मिक अनुभूती आणि वैयक्तिक प्रगतीसाठी स्वतःला तयार करणे.

आपल्यातील दिव्य प्रकाश जाणून, आपण जीवनाच्या चिरंतन उत्सवाशी तादात्म्य साधतो. आंतरिक नकारात्मकता आणि चिंतेवरचा हा विजय आपल्याला हे समजून घ्यायला लावतो की आपले खरे रुप शाश्वत आणि तेजोमय आहे. विजया दशमीचा संदेश म्हणजे आपल्यातील भव्यता जाणून घेणे आणि तिचा स्वीकार करणे, प्रत्येक क्षणाला आपल्या अंतरात्म्याच्या उत्सवात रूपांतरित करणे.












