आपल्या देशात आपण अध्यात्माला विज्ञानापासून कधीच वेगळे केले नाही. विज्ञान हा अध्यात्माकडे जाणारा मार्ग आहे आणि अध्यात्म हा विज्ञानाचा भाग आहे

नवरात्री : स्त्रोताकडे परत जाणे

‘नव’ चे दोन अर्थ आहेत- ‘नऊ’ आणि ‘नवीन’; आणि हा एक समय आहे जो आपल्या जीवनात ताजेपणा आणि नवचैतन्य आणतो कारण आपण या नऊ रात्री आपल्या स्त्रोताकडे परत येतो, दिवसभरातील सर्व त्रासांपासून आपले मन दूर करतो आणि स्वत: चे सर्वेक्षण करण्यात वेळ घालवतो. मग आपण अधिक सर्जनशील बनतो, आपण विजय प्राप्त करतो.
जेव्हा नकारात्मक विचार मनात येतात, किंवा जेव्हा आपण आपल्या स्वभावापासून दूर होतो, तेव्हा आपण अस्वस्थ होतो, आपल्या आजूबाजूला असणे अप्रिय होते आणि आपण उत्पादक आणि रचनात्मक रहात नाही. आणि जेव्हा तुम्ही तुमच्यातील उर्जेच्या स्त्रोताकडे – शक्तीकडे जाता तेव्हाच तुम्हाला या नकारात्मकतेपासून मुक्तता मिळते.

नवरात्रीमागील शास्त्र : ब्रम्हांडाला पिंडाशी जोडणे

रक्तबीजासुराची कथा सूचित करते की आपले गुण आपल्या डीएनएमध्ये अंतर्भूत आहेत. ज्याप्रमाणे राक्षसाच्या प्रत्येक थेंबातून एक नवीन राक्षस जन्माला आला, याचा अर्थ प्रत्येक थेंबात संपूर्ण राक्षसाची निर्मिती करण्याची क्षमता होती, आपण कोण आहोत आणि आपण कोण होतो – हे सर्व आपल्या डीएनएमध्ये संकेतबद्ध (एन्कोड) केलेले आहे. तर परिवर्तन हे अगदी मुलभूत स्तरावरुनच व्हायला हवे आणि हे परिवर्तन फक्त देवीच घडवते. दैवी माता तिच्या त्रिशूळासह येते आणि ज्ञान, प्रेम आणि कृती या ३ गोष्टी दर्शवते.
ती आपल्याला असुरांपासून, आत असलेल्या नकारात्मक गुणांपासून मुक्त करते. जरी ते आपल्या डीएनएमध्ये असले तरी ते मातेच्या कृपेने नाहीसे होतील. म्हणून, जेव्हा तुम्ही साधना करता किंवा अध्यात्मिक साधना करता, जेव्हा तुमच्यातील आध्यात्मिक ऊर्जा जागृत होते, ती तुमचे संपूर्ण शरीरशास्त्र व्यवस्थित करते, ती तुमच्या आत योग्य मानसिकता, योग्य विचार आणि जीवनाची योग्य अभिव्यक्ती आणते. हे केवळ विचारांच्या पातळीवर नाही, तर अस्तित्वाच्या पातळीवर परिवर्तन घडते.

विविधतेत एकता

तुमचे मन मोठ्या मनाचा एक छोटासा भाग आहे, तुमचे शरीर संपूर्ण अस्तित्वाचा एक भाग आहे. जर हवेत काही समस्या असेल तर फक्त एक व्यक्तीच प्रभावित होणार नाही तर आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होईल. पर्यावरण हे आपले पहिले शरीर आहे, आपले अन्न हे पर्यावरणातून मिळते, म्हणूनच त्याला अन्नमय कोश म्हणतात. वेदांत आणि क्वांटम मेकॅनिक्स खूप जवळ आहेत, खूप सारखे आहेत. क्वांटम मेकॅनिक्स म्हणते की हे संपूर्ण विश्व फक्त एका तरंग फलनाने (वेव्ह फंक्शनने) बनलेले आहे; वेदांत तीच गोष्ट सांगतो – संपूर्ण विश्व म्हणजे केवळ कंपने, स्पंदने आणि धडधड. आणि त्या कंपनांच्या अनेक अभिव्यक्तींमध्ये हे विश्व निर्माण झाले आहे; आणि एक कंपन लाखो नावे आणि रूपे म्हणून प्रकट झाले आहे. नवरात्रीच्या दिवसांत म्हटले जाणारे श्लोक हेच सांगतात, दैवी माता सर्वत्र कशी प्रकट होते – सर्व गुण तिचे आहेत; ती या सृष्टीच्या प्रत्येक अणूमध्ये, प्राणी, झाडे, कीटक, आकाशगंगा आणि अनेक जगांमध्ये आणि ग्रहांमध्ये उपस्थित आहे. तिचे वैभव अणूपासून विश्वापर्यंत पसरलेले आहे. म्हणून आपण सर्व रूपांत दैवी मातेची पूजा करतो आणि अन्नमय कोशातील ऊर्जा अनुभवतो.

दैवी मातेची पूजा करताना तिची कथा ऐकल्यावर; तुमच्यातील ऊर्जा जागृत होते, प्राण जागे होतात; आणि तुम्हाला आशीर्वाद मिळतात आणि तुमच्या सर्व इच्छा साकार होतात.

~गुरुदेव श्री श्री रविशंकर

म्हणून, त्यांनी सूक्ष्म पिंडाबरोबर ब्रम्हांड जोडण्यासाठी विस्तृत पद्धती ओळखल्या; ज्यामध्ये जीवनाचा प्रत्येक पैलू गुंतलेला असतो आणि त्यालाच यज्ञ म्हणतात. येथील यज्ञ संपूर्ण जगासाठी, सर्व मानवांच्या कल्याणासाठी केला जातो; आणि शास्त्रात प्रक्रिया सांगितल्या आहेत – किती औषधी वनस्पती विकत घ्याव्यात? कोणते साहित्य वापरावे? कोणते जप आणि मंत्र वापरावेत? हे सर्व अगदी तंतोतंत आहे, जेव्हा ते ज्या पद्धतीने केले पाहिजे त्या पद्धतीने केले जाते, तेव्हा त्याचा परिणाम खूप चांगला होतो.
आपले मन लालसा आणि तिरस्कार आणि योग्य आणि अयोग्य यांच्यामध्ये हेलकावे खाऊन थकले आहे. नवरात्री म्हणजे सर्वकाही टाकून देण्याची वेळ असते आणि जेव्हा आपण सर्व काही सोडतो आणि स्वतःमध्ये विश्रांती घेतो तेव्हा गहन ध्यान, समाधी होते. हाच जीवनातील सर्व यशाचा आधार आहे.

सर्व चांगले आणि वाईट गुण; भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य दैवी मातेला अर्पण करून, आपण स्वतःमध्ये आराम करतो. आणि आपल्या मनाला आणि आत्म्याला शांतता देणे, हेच नवरात्रीचे सार आहे.

विधींचे महत्त्व: विधी महत्त्वाच्या का आहेत?

विधींमध्ये थोडेसे व्यस्त राहिल्याने मन एकाग्र होते आणि सकारात्मक आणि उत्सवी वातावरण निर्माण होते. प्राचीन लोकांच्या प्रत्येक विधीला काही ना काही महत्त्व असते, त्याचा पर्यावरणावर आणि सूक्ष्म जगावर विशिष्ट प्रभाव पडतो.

पाण्यासहित मंत्रांचा जप केला जातो आणि पाणी काही स्पंदने शोषून घेते. पाण्याचे स्फटिक तुमच्या विचारांना कसा प्रतिसाद देतात याचे प्रयोग आम्ही पाहिले आहेत. तुमच्या प्रत्येक विचाराचा ब्रह्मांडावर प्रभाव पडतो.

तुम्ही बटरफ्लाय इफेक्टबद्दल ऐकले आहे का? दक्षिण अमेरिकेत पंख फडकवणाऱ्या एका फुलपाखराचा चीनमधील ढगांच्या हालचालीवर परिणाम होतो. हे दर्शवते की प्राण्यांची प्रत्येक हालचाल त्यांच्या सभोवतालच्या इतर सर्व गोष्टींवर किती शक्तिशाली असू शकते. प्राचीन लोकांना ब्रम्हांड आणि पिंड आणि आपल्या शरीराचे भाग यांच्यातील संबंध माहित होते. ब्रह्मांड, ग्रह, वैश्विक किरण आणि कंपन हे विशिष्ट पक्षी, विशिष्ट धान्य, औषधी वनस्पती किंवा आपल्या मानवी शरीराच्या विशिष्ट भागाशी जोडलेले असतात. या सखोल संबंधाचा शोध घेण्याची नवरात्री ही वेळ आहे.

विधींच्या मागे असलेले विज्ञान

यज्ञ – अव्यक्त ऊर्जा प्रकट जगात आणण्याचे शास्त्रयज्ञ आणि तपाने, व्यक्ती सर्वोच्च आत्मप्राप्ती करतो. यज्ञामध्ये तीन घटकांचा समावेश होतो: देव पूजा – विविध दैवी गुण आणि शक्तींचा सन्मान करणे. प्रत्येकाची विशिष्ट गुणवत्ता किंवा उपयोग आहे आणि ते वेगवेगळ्या मंत्र आणि औषधी वनस्पतींशी जोडलेले आहेत. वेगवेगळ्या वनस्पतींना विशिष्ट कंपन आणि निश्चित उर्जेची नियुक्ती केली जाते आणि म्हणून ते अव्यक्त देवत्व व्यक्त करतात. प्रत्येक प्राणी, उदाहरणार्थ, एक विशिष्ट ऊर्जा विकिरण करतो. संगतिकरण – सर्वजण एकत्र गतिमान आहेत. यज्ञ एकट्याने होऊ शकत नाही कारण आपण सर्वांशी जोडलेले आहोत. एखाद्यावर परिणाम झाला तर काही प्रमाणात त्याचा इतरांवरही परिणाम होतो; आणि दान – देणे, वाटून घेणे.

यज्ञ, वेगवेगळ्या मंत्रांद्वारे, आपल्या चेतनेमध्ये विशिष्ट गुण जागृत करतात. विशिष्ट मंत्रांसह विशिष्ट यज्ञांचा आपल्यावर, आपल्या पर्यावरणावर, आपल्या सामूहिक चेतनेवर, सामूहिक मनावर आणि वैयक्तिक मनावर विशिष्ट प्रभाव पडतो.

भगवान श्रीकृष्ण म्हणतात – जगात यज्ञ केले जातात कारण ते लवकर फायदेशीर परिणाम देतात.

यज्ञ करताना, पहिली गोष्ट म्हणजे ते सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या बिया पेरतात. बियाण्यातील जीव जरी सर्वकाळ प्राण असला तरी तो अंकुर फुटल्यावरच प्रकट होतो. तसेच मंडपाभोवती प्राणाची निर्मिती करून यज्ञ केला जातो. बिया फुटतात आणि ते प्राणशक्तीला अवकाशातील घटकातून खाली आणतात. शेवटच्या दिवशी, समारंभाच्या शेवटी, सर्वजण कोंबांच्या भोवती नाचतात, जीवनाचा आनंद साजरा करतात, उदात्त प्राणात स्नान करतात. तर यज्ञाद्वारे –जल, अग्नी, पृथ्वी, पाचही तत्वांमध्ये प्राणाचे आह्वान केले जाते; आणि मग तुम्हाला सर्व मंत्रोच्चार, भजन, संगीत आणि नृत्य यासर्वांमुळे संपूर्ण वातावरणात आनंद फुलताना दिसून येईल.

मूर्तीची सजावट – त्यामागचे तत्त्वज्ञान

तुमचे मन प्रत्येक चमकदार आणि रंगीबेरंगी गोष्टीकडे आकर्षित होते – दागिने, कपडे, फुले आणि सुगंध; त्यामुळे तुमच्या संवेदना रोखण्यासाठी त्यांनी ते सर्व मूर्तीवर नेऊन ठेवले. जेव्हा ते मूर्तीवर असते, तेव्हा तुम्ही ते धारण करू शकत नाही; त्यामुळे तुम्हाला त्याबद्दल आदर वाटतो. तुम्ही देवतेसमोर उभे राहून डोळे बंद करणे; हे सूचित करते की देव तुमच्या आत आहे. आत जाण्याची ही व्यवस्था आहे.

आरती

आपण प्रार्थना करतो – आमचे जीवन दिव्यासारखे आहे आणि दिव्याप्रमाणेच माझ्या ५ संवेदना, माझे जीवन, तुझ्याभोवती फिरू दे, दैवी माते.

तीर्थ

संस्कृतमध्ये पाणी आणि प्रेम या दोन्हीसाठी आपः हा एकच शब्द आहे. जेव्हा आपण तीर्थ घेतो, तेव्हा याचा अर्थ होतो – मी प्रत्येकाशी एक असण्याचा अनुभव घेतो. तुम्ही थोडासा प्रसाद घेता आणि तुम्हाला समाधान आणि आनंद यांची जाणीव होते.

मंत्र: सूक्ष्म आणि स्थूल यांच्यातील दुवा.

मंत्र हे विशिष्ट आणि शक्तिशाली स्पंदने आहेत जे भौतिक आणि सूक्ष्म जग यांच्यातील दुवा आहेत. पण जोपर्यंत ते स्पंदन, स्वत:च्या सखोल स्पंदनेंशी जोडले जात नाही तोपर्यंत ते निष्प्रभ असतात. म्हणून जे सखोल समाधीत आहेत तेच मंत्र शक्तिशाली आणि फलदायी करू शकतात; मंत्र प्रभारित होण्यासाठी शून्यतेचा अनुभव घेणे महत्वाचे आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा कोणताही यज्ञ केला जातो तेव्हा ते तेथे योगात असलेल्या गुरुला आमंत्रित करतात, कारण त्यांच्या उपस्थितीतच ते फलित होते.

जेव्हा हे मोठे यज्ञ होत असतात आणि ध्यानकर्ते येथे मंत्रजप करत असतात तेव्हा तुम्हाला वातावरणात निश्चित फरक जाणवू शकतो. ध्यानकर्ते त्यांच्या विशेष मंत्रांनी वर्षानुवर्षे ध्यान साधना करतात. नामजप आणि ध्यानाचा हा मिलाफ असे वातावरण निर्माण करतो जिथे प्रत्येकजण सखोल ध्यान आणि आनंद अनुभवू शकतो. ज्या लोकांनी यापूर्वी कधीही मंत्र ऐकले नाहीत, परंतु त्यांनी चांगले ध्यान केले असेल, त्यांनी ते एकदा ऐकले किंवा ते तिथे बसले की त्यांना कंपन जाणवतात.
मंत्र हे अस्तित्वाचे कालातीत बीज आहेत, म्हणून मंत्रांचा अर्थ त्यांच्या स्पंदना इतका महत्त्वाचा नाही. त्यामुळे फक्त आवाज आणि त्याच्या स्पंदनांचा आनंद घ्यायचा आहे. जेव्हा आपण ओळखतो की हे संपूर्ण विश्व एक स्पंदन आहे, तेव्हा मंत्र आपल्याकडे येतात. त्या चेतनेची अवस्था आणि मंत्र यांच्यात एक नैसर्गिक आत्मीयता असते आणि मग ते फलित होतात.

मंत्र निरोगी होण्याचा, इच्छा पूर्ण करण्याचा एक मार्ग आहे

मंत्रांचा प्रभाव पाणी शोषून घेते. जपानमधील एका शास्त्रज्ञाने पाण्याच्या स्फटिकांवर आणि पाण्याच्या थेंबांवर ध्वनींच्या प्रभावाचा एक सुंदर प्रयोग केला आहे; आणि असे दिसून आले की जेव्हा वेगवेगळ्या मंत्रांचा जप केला जातो तेव्हा पाण्याची स्फटिक निर्मिती कशी वेगळी असते. तर, मंत्र इच्छित परिणाम आणू शकतात.
भौतिक जगात, वेगवेगळ्या गोष्टी तयार करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या सामग्रीची आवश्यकता असते; पण ते मंत्राच्या क्षेत्रात लागू होत नाही. कोणताही मंत्र परिणाम म्हणून तुम्हाला जे हवे आहे ते आणण्यासाठी पुरेसे चांगले आहे. म्हणून मंत्र भौतिक अस्तित्वाच्या विभाजनाच्या पलिकडे जातात; म्हणूनच ते परमात्म्याच्या खूप जवळ आहेत.

संकल्प: महत्त्व, रहस्य आणि विज्ञान

आयुष्य दिशे अभावी पुढे जाऊ शकत नाही, म्हणून तुमच्याकडे ध्येय असणे आवश्यक आहे. म्हणून, सर्व पूजांमध्ये आपण संकल्प घेतो; संकल्प म्हणजे – “या वेळी आणि स्थानी मी हा हेतू घेतो,” आणि मग तुम्ही तो हेतू सोडता.
हेतू आणि इच्छा यांच्यातील फरक हा आहे की इच्छेमध्ये तुम्ही ते धरून राहता, तुम्ही इतके उत्कंठीत होता आणि ते धरून ठेवण्यात तुम्ही तुमची सर्व शक्ती गमावून बसता.

जो हेतू सोडू शकतो त्याचाच संकल्प आविष्कृत होतो, हेच रहस्य आहे

संकल्प मनात येतात आणि मंत्र मनाला ऊर्जा देतात. तुमच्या मनात जितके जास्त विचार असतील तितके संकल्प कमकुवत होतात आणि त्यामुळे संकल्प फलदायी होत नाहीत. मंत्रांनी, मन उत्साही आणि केंद्रित होते आणि त्या उत्साही अवस्थेत जेव्हा एखादा संकल्प हाती घेतला जातो तेव्हा तो फलदायी ठरतो.

ध्यान आणि आपला मेंदू

सामूहिक ध्यान सामूहिक चेतना उन्नत करते आणि मानवी आत्म्याला अधिक सर्जनशील आणि उपयुक्त बनवते.
संशोधकांना असे आढळून आले आहे की, जर तुम्ही फक्त ८ आठवडे किंवा २ महिने ध्यान केले तर मेंदूची बुद्धिमत्ता (ग्रे मॅटर) वाढते, त्यामुळे मेंदूची रचना बदलते. मेंदू अधिक अंतर्ज्ञानी, सर्जनशील आणि जोशपूर्ण बनतो.