आपण नवरात्रीमध्ये उपवास कां करायला हवा?

रंगाची उधळण असलेला, परंपरा, गाणी आणि नृत्याने परिपूर्ण असलेला नवरात्रीचा काळ आपल्याला अंतर्मुखी होऊन स्वतःला नव्या ऊर्जेने भरून घेण्याचा आणि विश्राम करण्याचा देखील असतो. नवरात्री दरम्यान उपवास करण्याने हा आनंदाकडे आणि सुखाकडे नेणारा प्रवास सहज होतो. उपवास मनाची अस्वस्थता कमी करून सजगता व आनंद आणतात.

उपवासाची प्रेरक शक्ती

ईश्वराला खूष करण्यासाठी नाही तर आपले शरीर शुद्ध करण्यासाठी आपण उपवास करतो.

~ गुरुदेव श्री श्री रविशंकर

गुरुदेव श्री श्री रवि शंकरजींच्या पावन सान्निध्यात शक्तिशाली वैदिक मंत्रोच्चार, मौन आणि सखोल ध्यानाचा अनुभव घ्या. बेंगळुरू आश्रमात आयोजित चैत्र नवरात्री २०२६ (१९ – २७ मार्च) च्या उत्सवात सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा!

आयुर्वेदानुसार, उपवासामुळे आपला जठराग्नि जागृत होतो. वाढलेला जठराग्नि आपल्या शरीरातील विषारी द्रव्ये जाळून टाकतो. जेव्हा हे विषारी पदार्थ शरीरातून बाहेर टाकले जातात, तेव्हा शरीरातील आळस आणि जडपणा निघून जातो. शरीरातील सर्व पेशींचे पुनर्नवीकरण होते. म्हणूनच शरीर शुद्ध करण्यासाठी उपवास करणे परिणामकारक ठरते. जेव्हा शरीर शुद्ध बनते तेव्हा मन आणि शरीरातील संबंध दृढ बनतात. त्यामुळे मन शांत आणि निश्चल बनते.

उपवासामुळे जागृत झालेला जठराग्नि तणाव कमी करण्यास व प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतो.

आपल्यापैकी बरेचजण बहुतेकवेळा भूक लागण्याची वाट पाहत नाहीत. आपले शरीर अन्न पचविण्यासाठी तयार आहे याचे लक्षण म्हणजे भूक लागते. भूक लागण्यापूर्वीच अन्न घेतल्याने आपली पचन संस्था कमकुवत होते.परिणामी ताण आणि अशक्त प्रतिकारक्षमता तयार होते.उपवासामुळे जठराग्नि जागृत होवून ताण कमी करण्यास व प्रतिकारशक्ती दृढ करण्यास मदत होते.

नवरात्री उपवासासोबत गहिऱ्या ध्यानात डुबकी मारा.

नवरात्रीचा काळ हा स्वतःसोबत वेळ घालवण्याचा, ध्यान करण्याचा आणि अस्तित्वाच्या मूळ स्त्रोतासोबत स्वतःला जोडण्याचा असतो. उपवासामुळे मनाची बेचैनी कमी होते तेव्हा अंतर्मुखी होऊन ध्यान करणे सोपे जाते. परंतु स्वतःला टवटवीत ठेवण्यासाठी पर्याप्त प्रमाणात ताजी फळे व सात्विक अन्न खाणे आवश्यक आहे.

सात्विक बहराची फळे मिळवा.

उपवासासोबत ध्यान केल्याने आपले सत्व (स्थिरचित्तता आणि सकारात्मकतेची वैशिष्ट्ये) वाढते. सत्व वाढल्यामुळे आपले मन शांत आणि जागृत राहते. परिणामी आपली उदिद‌ष्टे आणि प्रार्थना जास्त शक्तिशाली बनतात. सत्वाचा बहर आपल्या शरीराला हलके आणि ऊर्जावान बनवतो. आपण जास्त कार्यक्षम बनतो. परिणामतः आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि आपली कामे सहज पूर्ण होतात.

जगभरातील सर्व धर्मांमध्ये उपवासासोबत प्रार्थना करण्याची प्रथा कां आहे? कारण जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा आपण शुद्ध बनतो आणि आपली प्रार्थना गहन आणि खरी बनते.

~ गुरुदेव श्री श्री रविशंकर

सूचना : काही शरीर रचना आणि स्वास्थ्य परिस्थितीमध्ये उपवास करण्याची शिफारस केली जात नाही. त्यामुळे उपवास करण्याआधी आपल्या आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घेणे योग्य ठरते. तसेच आपणास आरामदायी ठरेल इतकाच उपवास करावा हे ही लक्षात ठेवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

नवरात्री हा काळ ऋतू बदलाचा असतो, ज्यामध्ये आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. उपवास केल्यामुळे शरीराला अन्नाचे पचन करण्यासाठी लागणारी ऊर्जा वाचते, ज्यामुळे शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स (विषमुक्त) होते आणि मनाला शांती मिळते. हे केवळ धार्मिक व्रत नसून आरोग्यासाठी एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे.
उपवास केल्याने शरीराला खालील फायदे मिळतात:
१.   डिटॉक्सिफिकेशन: शरीरातील घातक द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते.
२.   पचनशक्ती सुधारते: पचनसंस्थेला विश्रांती मिळाल्याने तिची कार्यक्षमता वाढते.
३.   वजन नियंत्रण: योग्य पद्धतीचा उपवास वजन कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतो.
४.   ऊर्जा पातळीत वाढ: हलका आहार घेतल्यामुळे शरीरातील आळस कमी होऊन ऊर्जा वाढते.
उपवासामुळे मन अधिक सजग आणि शांत होते. जेव्हा शरीर हलके असते, तेव्हा ध्यान (Meditation) आणि प्रार्थना अधिक खोलवर लागते. हे मनावर ताबा मिळवण्यास आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे आध्यात्मिक प्रगती होते.
उपवासात सात्विक आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये ताजी फळे, दूध, ताक, राजगिरा, साबुदाणा (मर्यादित प्रमाणात), शिंगाडा आणि सुका मेवा यांचा समावेश असावा. तसेच, जास्तीत जास्त पाणी पिऊन शरीर हायड्रेटेड ठेवणे आवश्यक आहे.
शास्त्रीयदृष्ट्या, वर्षातून दोनदा येणारी नवरात्री ही दोन ऋतूंच्या संधिकाळात येते. या काळात पचनशक्ती मंदावलेली असते. म्हणून, जड अन्न टाळून हलका आहार किंवा उपवास केल्याने शरीराचे संतुलन राखले जाते आणि बदलत्या हवामानाशी जुळवून घेणे सोपे जाते.
आर्ट ऑफ लिव्हिंगनुसार, उपवास म्हणजे केवळ अन्न त्यागणे नव्हे, तर ‘उप’ (जवळ) आणि ‘वास’ (राहणे) म्हणजेच स्वतःच्या अंतरात्म्याच्या जवळ राहणे होय. उपवास, ध्यान आणि मौन यांच्या संगमाने मन आणि बुद्धी शुद्ध होते.