नवरात्री २०२६

११ - २० ऑक्टोबर

ध्यान कार्यक्रमसंकल्प

नवरात्री २०२६ मध्ये आपले स्वागत आहे

आर्ट ऑफ लिव्हिंग बेंगलोर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे चैत्र नवरात्री उत्सवात योगासन, यज्ञ, ध्यान, प्रार्थना,संकल्प, सेवा, सत्संग, सांस्कृतिक कार्यक्रम याद्वारे आपले भौतिक अस्तित्व, सूक्ष्म अस्तिव व चेतना पुनःरुत्तेजित होते. जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक आणि भक्त येथे येतात व आपल्यातील उच्च मानवी गुण वाढवण्यासाठी येथे भाग घेतात. या दिवसांत आश्रमात शांती, प्रेम, आनंद आणि उत्साह याचे दिव्य स्वरूप बघायला मिळते. गुरुदेव श्री श्री रवि शंकर यांच्या समवेत होणाऱ्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी आम्ही आपले स्वागत करतो.

नवरात्रीचे महत्व

"रात्री” या शब्दाचा अर्थ आहे सखोल विश्राम किंवा तीन तप, तीन प्रकारच्या अग्नी किंवा चिंता - शारीरिक, सूक्ष्म आणि चेतनावरच्या यांपासून सुटका.

“हा वेळ प्रार्थनेचा आणि पुनःरुत्तेजित होण्याचा आहे. लहान बाळ जन्माला येण्याच्या अगोदर नऊ महिने आईच्या पोटात असते. तसेच हे नऊ दिवस आईच्या पोटातून परत बाहेर आल्यासारखे आणि परत जन्म घेतल्यासारखे असतात."
- गुरुदेव श्री श्री रवि शंकर

कार्यक्रमाची रूपरेषा

तिथि

दिनाँक

कार्यक्रम

अमावस्या शनिवार, १० ऑक्टोबर सकाळी 9:00 वा - रूद्र पूजा
प्रतिपदा - पंचमी रविवार, ११ - गुरुवार, १५ ऑक्टोबर सायं 7:00 वा - रूद्र पूजा
षष्ठी शुक्रवार, १६ ऑक्टोबर सकाळी 9:00 वा - महागणपति होम, महा लक्ष्मी होम, सुब्रमण्य होम आणि नवग्रह होम
सायं 4:30 वा - चंडी होम प्रारम्भ
सप्तमी शनिवार, १७ ऑक्टोबर सकाळी 9:00 वा - महा रूद्र होम
सायं 4:30 वा - महा सुदर्शन होम आणि विष्णु सहस्रनाम पारायण
अष्टमी रविवार, 18 ऑक्टोबर सकाळी 7:00 वा - शट चंडी होम
नवमी सोमवार, १९ ऑक्टोबर सकाळी 9:00 वा - ऋषि होम
दशमी मंगलवार, २० ऑक्टोबर सकाळी 8:00 वा - विद्यारम्भ
सकाळी 9:00 वा - रूद्र पूजा
एकादशी - त्रयोदशी बुधवार, २१ - शुक्रवार, २३ ऑक्टोबर सकाळी 9:00 वा - रूद्र पूजा
चतुर्दशी शनिवार, २४ ऑक्टोबर सकाळी 9:00 वा - रूद्र पूजा
सकाळी 9:00 वा - जय दुर्गा होम
पूर्णिमा रविवार, २५ ऑक्टोबर सकाळी 9:00 वा - रूद्र पूजा
टिप: कार्यक्रम पत्रिका वेळेच्या गरजेनुसार बदलू शकते.

बेंगलोर आश्रमात घेतल्या जाणाऱ्या ध्यानाच्या विविध कार्यशाळा

मला नवरात्री उत्सवात सहभागी व्हायचे आहे पण ...