कालहस्तिश्वर मंदिर
वायू तत्व | श्रीकालहस्ति, आंध्र प्रदेश
स्वर्णमुखी नदीच्या तीरावरील कालहस्तीश्वर मंदिर वायू तत्वाचे प्रतिक आहे. येथे वायू रूपातील वायू लिंगम या रुपामध्ये भगवान शिव यांची आराधना केली जाते.
श्री कालहस्ती हे दक्षिणेतील कैलास म्हणून ओळखले जाते. श्री म्हणजे कोळी, काल म्हणजे साप आणि हस्ती म्हणजे हत्ती. या तिन्ही जीवांनी आपल्या निःस्वार्थ भक्तीने भगवान शिव यांना प्रसन्न करून घेतले होते.
मंदिराच्या गाभाऱ्यातील दिव्याची ज्योत वारे असून देखील सतत फडफडत असते. पुजारी जेंव्हा मंदिराचे मुख्य द्वार बंद करतात तेंव्हा देखील आतमध्ये खिडकी नसून वायूलिंगमची ज्योत हलताना दिसते. हे लिंगम सफेद रंगाचे असून स्वयंभू आहे.
शिव तत्वाप्रमाणे समस्त विश्वातील प्राणीमात्रां मध्ये उपस्थित असण्याचे वरदान जेंव्हा वायू देवाने मागितले तेंव्हा भगवान शिव यांना वायू लिंगमच्या रूपाने प्रकट व्हावे लागले. म्हणून ते सफेद ज्योतीच्या रुपात प्रकट झाले ज्याला कर्पूरलिंग या नावाने देखील ओळखतात. आजदेखील या कथेतील श्रद्धेनुसार ती ज्योत सफेद रंगाची आहे.
कथासार
वायू म्हणजे प्राण. वायूशिवाय या विश्वात जीवन नाही. आपण वायू तत्वाच्या आराधनेप्रमाणे शिव तत्वाची आराधना करतो.
कालहस्तीश्वर मंदिराची ५ वैशिष्ट्ये
- श्रीकालहस्ती मंदिराचे प्राथमिक बांधकाम पाचव्या शतकात झाले. आत्ताच्या मंदिराचे बांधकाम नंतर शेकडो वर्षे चालले होते.
- मुख्य गोपूर १२० फुट उंचीचे असून त्याचे बांधकाम १५१६ इ.स.मध्ये विजयनगरचे राजे कृष्णदेवराया यांनी केले आहे जो स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.
- मे २०१० मध्ये झालेल्या याच्या पडझडीचे बांधकाम अद्याप सुरु आहे.
- हे मंदिर राहू-केतू पूजेसाठी प्रसिद्ध आहे. राहू आणि केतू यांचे असणारे, तसेच निर्माण होणारे दोष ही पूजा श्रद्धेने केल्यास नाहीसे होतात असा विश्वास आहे.
- या मंदिरातील वायू लिंगमला पुजारी देखील स्पर्श करत नाहीत.