स्वादिष्ट रताळू

swadista ratalu

या उपवासात चटपटीत खायची इच्छा आहे कां ? रताळी कां नाही बनवत? ते कमी कॅलरीचे, सकस आणि बनवायला सोपे आहे - तुमचा आवडता बटाटा नवीन अवतारात. कसे करायचे पाहू या:

साहित्य

शकरकंद-५०० ग्रॅम

रताळू-२०० ग्रॅम

कोथंबीर-१ चमचा

खोबरे-१ चमचा

हिरव्या मिरचीची पेस्ट-पाव चमचा

लिंबू रस-१ चमचा

मीठ-अर्धा चमचा

बेदाणे-५-६ नग

तेल-१ चमचा

 

कृती

१. शकरकंद आणि रताळूची साल काढून किसून घ्या.

२. दोन्ही १२ ते १५ मिनिटे उकडून त्यांचा मऊ लगदा करून घ्या. काळजीपूर्वक हं ! ते खूपच गरम असतात.

३. या लगद्यामध्ये कोथंबीर, लिंबू रस, मिरची आणि मीठ मिसळा.

४. त्यांचे छोटे छोटे गोळे बनवा.

५. सारण तयार करण्यासाठी तव्यात तेल तापवा, त्यात मोहरी. हिरव्या मिरचीची पेस्ट, खोबरे कीस आणि बेदाणे घालून हलवा.

६. तयार केलेले गोळे थोडे उघडा आणि त्या मध्ये ते सारण व्यवस्थित भरा.

 

विशेष सूचना :​

१. शकरकंद एक पौष्टिक कंदमूळ आहे.

२. विशेष म्हणजे रताळू व्हिटामिन सी चा चांगला स्त्रोत आहे. या दोन्हीचे मिश्रण कमी कलरीचे आहे. यामध्ये             व्हिटामिन ए आणि पोटशियम भरपूर प्रमाणात आहे.

३. भाजलेल्या रताळूचे काप, रताळूचे सूप, रताळूचे पुडिंग सोबत ही डीश उपवासात देऊ शकता.