एक वेगळा डोसा !

डोसा आवडतो नां? तुमचा आवडता डोसा तुम्ही उपवासात देखील खाऊ शकता हे समजले तर कसे वाटेल? हा सोपा, पौष्टिक आणि झटपट बनणारा पदार्थ कसा बनवायचा पाहू या.

साहित्य

वरी तांदळाचे पीठ-दीड कप

पाणी-पाऊन कप

जिरे-चिमुटभर

खा.सोडा-पाव चमचा

हिरव्या मिरच्या पेस्ट-चवीनुसार

खजूर-१२ नग

लिंबू रस-२ चमचे

तेल-१ चमचा

 

कृती

१.वारी तांदळाच्या पिठात पाणी मिसळून चांगले मिसळून घ्या.

२.जिरे, हिरव्या मिरचीची पेस्ट आणि मीठ त्या मिश्रणात चांगले मिसळून घ्या.

३.नॉन स्टिक तवा तापवून ते पीठ मोठा चमचा तव्यावर एकसारखे सोडून डोसा बनवा. डोसा बनल्यावर घडी करून ठेऊन द्या.

४.मिक्सरमधून खजूर बारीक पेस्ट करून घ्या. त्यात लिंबू रस मिसळा. मिक्सर करतानाच लिंबू रस मिसळू शकता.

५.या चटपटीत चटणीसोबत डोसे खायला द्या.

 

विशेष सूचना :​

१.वारीच्या तांदळाला सामव्रत किंवा उपवासाचे तांदूळ तसेच इंग्लिश मध्ये बर्नयार्ड मिलेट म्हणतात.

२.या तांदळाचा वापर मुख्यतः उपवासातच भात, पुलाव, खीर, खिचडी आणि बरेच पदार्थ बनवण्यासाठी करतात.

३.साधे तांदूळ आणि गव्हाच्या तुलनेत वरीच्या तांदळात लोह, तंतुमय पदार्थ आणि खनिज द्रव्ये जास्त आहेत आणि ते खूपच पौष्टिक धान्य आहे. तसेच त्यात कमी कार्बोहाइड्रेट आहेत म्हणून ते उपवासात वापरतात.