सुक्या मेव्याची बर्फी

सुका मेवा पौष्टिक घटकांनी परिपूर्ण असतो हे आपण जाणतो. यांच्यामध्ये उपवासाला चालणारी आणि उपवासामध्ये शरीराला गरजेची जीवनसत्वे, खनिजे, प्रथिने आणि तंतुमय पदार्थ मुबलक प्रमाणात असतात. प्रत्येक घासाबरोबर हे सर्व लाभ मिळून देणारी ही पाककृती.

साहित्य :

  • अक्रोड-२०० ग्रॅम

    बदाम-२०० ग्रॅम

    काजू-३०० ग्रॅम

    सुके अंजीर-२०० ग्रॅम

    खजूर-१५० ग्रॅम

    तूप-१ चमचा
  •  

कृती ​

१. अक्रोड, बदाम आणि काजू मिक्सरमधून मध्यम आकारात भरडून घ्या. त्यातील निम्मे मिश्रण बाजूला काढून               राहिलेल्याची अगदी बारीक पूड करा.

२. सुक्या अंजिराचे बारीक बारीक तुकडे करून घ्या.  

३. खजूर मध्ये बिया असतील तर त्या काढून खजूर मिक्सरमध्ये फिरून एकजीव करा.

४. जाड कढईत एक चमचा तूप टाकून मंद आचेवर गरम करून घ्या. सुके अंजीर आणि खजूर त्यात परतून घ्या.           काही वेळाने काही शेंगदाणे आणि सर्व सुकामेवा त्यात मिसळून एकजीव करा.

५. सर्व मिश्रण चौकोनी थाळीत एकसारखे पसरून थंड होऊद्या. थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापा.

अन्य कृती -​

१. त्या मिश्रणाचे लाडू वळून त्यावर एकेक अखंड बदाम लाऊन ते सजऊ शकता.

२. बदाम ऐवजी पिस्ता वापरू शकता.

३. गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून तुमच्या बर्फीला ताजा तजेला सुगंध आणू शकता. आपल्या प्रिय व्यक्तींना           कोणत्याही प्रसंगी अशा सुगंधी लाडूंचा डब्यांची ‘सुंदर भेट’ देऊ शकता.