थिलाई नटराज मंदिर (आकाश तत्त्व)

आकाश तत्व | चिदंबरम्, तमिळनाडू

चिदंबरम् मधील थिल्लाई नटराज मंदिरामध्ये भगवान शिवा यांच्या आकाश तत्वाची आराधना केली जाते, जे पंचभूतांमध्ये सूक्ष्माति सूक्ष्म आहे. या मंदिरात भगवान शिव यांच्या निराकार रुपाची पूजा होते.

पुराणात चिदंबरम् शहराची खूप आकर्षक कथा आहे ज्यामुळे भगवान शिव यांची महानता कळते. भगवान शिव एकदा आमराईत (थिल्लाई वन) फिरत असतात. याच जंगलात काही ऋषी रहात असतात ज्यांचा मंत्र-तंत्र, जादूटोणा यावर विश्वास असतो. त्यांना वाटत असते की विधी आणि मंत्रांद्वारे देवावर देखील नियंत्रण करू शकतो. ऋषीपत्नी शिवस्तुती गात असतात. त्यांचे हे स्तुतीपठण ऐकून ऋषींनी कोपिष्ट होऊन त्यांच्यावर असंख्य साप सोडले. भगवान शिव यांनी त्या सापांना उचलून आपल्या सर्व सांध्यांवर, गळ्यात आणि कंबरेला धारण केले.

अति कोपिष्ट होऊन ऋषींनी त्यांच्यावर भयंकर वाघ सोडला, ज्याची कातडी भगवान शिव यांनी  आपल्या कंबरेभोवती वस्त्र म्हणून गुंडाळले. मग सोडलेल्या भयंकर हत्तीला भगवान शिव यांनी फाडून मारून टाकले. मग त्यांनी मुयलकन राक्षस (जो आपल्या सर्वामधील अहंकार आणि अज्ञानाचे प्रतिक आहे) त्याला अंगावर सोडले. भगवान शिव यांनी त्याला पायाखाली चिरडले आणि आनंद तांडव, जे शाश्वत अत्यानंदाचे प्रतिक आहे, ते केले आणि आपले मूळ रूप प्रकट केले. चिदंबरम् मधील नटराजाची मूर्ती आनंद तांडव प्रतिनिधीत्व करते.

नटराज अवतारासह ‘चिदंबर रहस्य’ या मंदिरातच निर्माण झाले. मंदिराच्या गाभाऱ्यामधील पोकळीतून पुराणकर्त्यांनी या चिदंबर रहस्यावरून पडदा दूर सारला. याचाच अर्थ असा आहे की अज्ञानावरील पडदा दूर झाल्यावरच शाश्वत आनंद प्राप्त होतो. ‘ज्यावेळी आपण पूर्णतः समर्पित होऊन ईश्वराला आपल्यातील अज्ञान दूर करण्याची संधी देतो तेंव्हाच आपलयाला ईश्वराच्या अस्तित्वाची आणि अत्यानंदाची अनुभूती होऊ शकतो.’

कथासार

अध्यात्माचे अंतिम ध्येय आहे ‘अत्यानंदाची प्राप्ती‘. या मार्गाचा हेतू हाच आहे की तुम्हाला ‘पोकळ आणि रिकामे, खाली‘ बनवणे.

अध्यात्मिक साधकांनी दिव्यत्वाची प्राप्ती करण्यासाठी हा मार्ग अंगीकारावा, साधकांचे अंतिम ध्येय अंतर्बाह्य रिक्त अनुभव प्राप्त करणे आहे, याचे स्मरण रहाण्यासाठी थिल्लाई नटराज प्रतिक आहे.

थिल्लाई नटराज मंदिराची ५ वैशिष्ट्ये

  • चिदंबरम् शहराच्या मध्यवस्तीत ४० एकरात वसलेले हे मंदिर भारतातील सर्वात मोठे पाचव्या क्रमांकाचे मंदिर आहे.
  • “चिदंबरम्“ हा शब्द ‘चित्’ म्हणजे सजगता आणि ‘अंबरम्’ म्हणजे आकाश यापासून बनला आहे.’असीमित सजगता‘ प्राप्त करणे हेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे.
  • पंचभूतस्थलम् मधील हे एकमेव मंदिर असे आहे जेथे भगवान शिव यांना लिंगाऐवजी मानवी रुपामध्ये दर्शवले आहे. तसेच स्फटिक लिंग म्हणजे मोकळ्या गाभाऱ्याची म्हणजे शिवाच्या निराकार रुपाची पूजा केली जाते.
  • मंदिराच्या गोपुराचे छत चोल राजा पारंतक यांनी सोन्याने मढवलेले आहे.
  • ‘वीरथ्रीदयापद्मस्थलम’ म्हणजे हे मंदिर विश्वाच्या हृदयकमळाच्या जागी आहे, अशी आख्यायिका आहे.