सुदर्शन क्रिया म्हणजे काय? (What is Sudarshan Kriya in Marathi)

श्वास घेण्याच्या पहिल्या कृतीने जीवनाला सुरवात होते. ज्ञात नसलेली अनेक गुपिते श्वासामध्ये दडलेली आहेत. सुदर्शन क्रिया हे साधे सरळ लयबद्ध श्र्वासोच्छ्वास करण्याचे एक तंत्र आहे. अशा विशिष्ट शरीर, मन आणि भावभावना यांच्यात समन्वय साधला जातो.

या प्रकारच्या तंत्रामुळे, ताणतणाव, थकवा नाहीसा तर होतच पण त्या बरोबर राग, वैफल्य, नैराश्य या सारख्या नकारात्मक भावना सुद्धा नष्ट होतात. मन शांत आणि एकाग्र बनते. शरीरात चैतन्य सळसळायला लागते, शारिरिक स्तरावर विश्रांती मिळते..

सुदर्शन क्रियेमुळे जीवनातली रहस्य उलगडली गेल्यामुळे आयुष्याला सखोलता येते, अध्यात्मात प्रगती होऊन अनंत विश्वाची झलक अनुभवता येते. आरोग्य, आनंद, शांती आणि अंर्तज्ञान यांची रहस्यात्मकता वा गूढता आपल्याला अनुभवता येतात.

श्वासांद्वारे उत्तम आरोग्य मिळवा!

जीवनाला अत्यंत उपयुक्त असलेली प्राण शक्ती मिळविण्याचा श्र्वसन हा एक महत्वपूर्ण भाग आहे. आरोग्य हे प्राणशक्तीवरच अवलंबून असते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी प्राणशक्तीच आवश्यक असते. प्राणशक्ती वरच्या स्तरावर असताना तुम्ही सजग, उत्साही आणि स्वास्थपूर्ण असता. सुदर्शन क्रियेमुळे शरीरात साठलेले ९०% विषारी घटक आणि ताण तणाव बाहेर फेकले जातात आणि प्राणशक्तीची पातळी वाढते. असे रोजच घडत जाते..

जे लोक नियमित सुदर्शन क्रिया करतात त्यांच्या मते त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली, काम करण्याची क्षमता वाढली. त्याच प्रमाणे त्यांची उर्जा दिवसभर कायम राहते असा अनुभव त्यांना आला.

रोज सुदर्शन क्रिया केल्यामुळे, डॉक्टरांकडे जाण्याची तुमच्यावर फार वेळ येणार नाही, तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल, आनंदी आणि स्वस्थ आरोग्य मिळेल.

योग्य प्रकारे श्र्वासोच्छ्वास करून आयुष्यभर आनंदी रहा! 

आपले हास्य आणि आनंद सुदर्शन क्रियेमुळे सदैव हसतमुख व आनंदी कसे राहता येईल माहित आहे कां?

आणि सुदर्शन क्रिया आनंदी राहण्यासाठी कशी उपयोगी पडेल?

संताप, चिडचिड, नैराश्य, उदासीनता या सारख्या नकारात्मक भावना घालविण्यात आपला किती वेळ लागतो ह्याची कल्पना आहे का? सुदर्शन क्रियेच्या माध्यमातून ह्या सर्व नकारात्मक भावनांपासून सहज मात करता येते. मग ह्या सर्व नकारात्मक भावनांवर तुमचं नियंत्रण राहील.

जर संताप, चिडचिड, जळावू वृत्ती, भीती या नकारात्मक भावना नष्ट होऊन त्यांची जागा आनंद, हास्य, खोल श्र्वासोच्छ्वास आणि सुखी जीवन यांनी घेतली तर काय होईल याची नुसती कल्पना करा ! मैत्रीत, नात्यात, कुटुंबात, कारकिर्दीत, वैवाहिक जीवनात, व्यवसायात सगळीकडेच आनंदी आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले तर तुमचे तुम्ही राहाणार नाही, पण प्रत्यक्षात तुम्ही तसे नाहीत हा बदल घडवून आणण्यासाठी सुदर्शन क्रिया करा,

सुदर्शन क्रिया करा मग आरशालाही तुमचा हसतमुख चेहराच आरशात दिसू लागेल !

सुदर्शन क्रिया अद्वितीय का आहे?

दिवसां पाठोपाठ रात्री येतात, ऋतू येतात आणि जातात, नवीन पालवी फुटण्यासाठी झाडे आपली जीर्ण पाने झटकून टाकतात. अशा प्रकार निसर्गाची लय असते.

निसर्गाचाच आपण एक भाग असल्याने आपल्यात सुद्धा लय सामावलेली आही. त्यालाच जीवशास्त्रीय तालबद्धता म्हणतात. ही तालबद्धता शरीर, मन आणि भावना यांना व्यापून असते. काही ताण तणावमुळे किंवा आजारपणामुळे या जीवशास्त्रीय तालबद्धतेत असंतुलन निर्माण होते त्यावेळेस आपल्याला अस्वस्थ वाटायला लागते, आपण त्रस्त होतो, असमाधानी वृत्ती बळावते. आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडते, आपण दु:खी होतो.

सुदर्शने क्रियेमुळे शारिरिक आणि भावनिक समन्वय साधला जातो आणि आपण परत नैसर्गिक लयीशी एकरूप होतो. एकदा की ही लय साधली गेली की आपल्याला आपल्या नेहमीच्या सगळ्या नात्यातून नैसार्गिक रित्याच प्रेम प्रवाहित व्हायला लागते.

सुदर्शन क्रियेमुळे आपले शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक स्वास्थ्य सुधारते. सुदर्शन क्रिया ही आर्ट ऑफ लिव्हिंगचा एक अविभाज्य भाग आहे. या जगातल्या करोडो लोकांना सुदर्शन क्रियेचा फायदा होऊन त्यांचे जीवन आता एक उत्सव बनले आहे.

ती अमुल्य कां आहे?

उत्तम आरोग्य आणि आनंदी आयुष्य तुमच्या दृष्टीने किमती नाही कां?

शवासनात दडलेली काही गुपितं हि मानवी बुद्धीच्या पलीकडची आहेत. तुमच्या दैनंदिन श्वसनामध्ये (सुदर्शन क्रियेची) २० अमुल्य मिनिटे जोडा.

श्वसनाचे रहस्य शिका,

स्वतःला एक संधी द्या...!

PDF iconSOB brochure A4.032014.pdf

 

Get to learn Sudarshan Kriya