आपल्या पौराणिक कथांचे सौंदर्य हे आहे की, त्या विशिष्ट स्थळ आणि काळामध्ये बंदिस्त नाहीत. रामायण, महाभारत आणि तत्सम कथा हे निव्वळ पूर्वी घडलेल्या घटना नाहीत तर त्या तुमच्या आमच्या जीवनात सातत्याने घडणारे प्रसंग आहेत. या कथांचा मतितार्थ ‘शाश्वत ‘ आहे.

कृष्ण जन्माची कहाणी

कृष्णजन्मकथेला देखील एक मतितार्थ आहे. देवकी मानवी देहाचे प्रतीक आहे तर वासुदेव प्राणशक्तीचे प्रतीक आहे. मानवी देहामध्ये जेंव्हा प्राणशक्ती वृद्धिंगत होते तेंव्हा कृष्णाची म्हणजे आनंद ची अनुभूती प्राप्त होते.

कंस हा देवकीचा भाऊ, म्हणजे देवकीचा सहोदर, जो अहंकाराचे प्रतीक आहे. अहंकार मानवी देहासोबत येतो. होय नां ? अहंकार आनंदाच्या म्हणजे कंस कृष्णाच्या विनाशाचा प्रयत्न करतो.

आनंदी व्यक्ती कोणालाही उपद्रव देऊच शकत नाही. दुःखी आणि भावनात्मक दुखावलेली व्यक्ती व्यत्यय निर्माण करत रहाते. ज्या व्यक्तींना, आपल्यावर अन्याय झाला आहे असे वाटते, अशा व्यक्ती त्यांच्या दुखावलेल्या अहंकारापोटी इतरांवर अन्याय करतात.

अहंकाराचा शत्रू

अहंकाराचा सर्वात मोठा शत्रू आनंद आहे. आनंद आणि प्रेम असेल तेथे अहंकार टिकू शकत नाही. प्रेम, साधेपणा आणि अनंदापुढे अहंकार विरघळून जातो. कृष्ण म्हणजे आनंदाचे, साधेपणाचे मूर्तिमंत उदाहरण, प्रेमाचे उगमस्थान होय.

देवकी आणि वासुदेव यांना कंसद्वारा बंदी बनवणे, हे अहंकाराचा जीवनावरील प्रभुत्व असणे दर्शवते. कृष्ण जन्मावेळी सर्व पहारेकरी झोपले होते. आपली पंचेंद्रिये जी बहिर्मुख असतात तीअहंकाराला खतपाणी घालत असतात. आनंदप्राप्तीसाठी पंचेंद्रिये अंतर्मुख होणे गरजेचे असते.

माखनचोर

कृष्णाचे एक रूप ‘ माखनचोर ‘ आहे. दूध पौष्टिकतेचे, परिपक्वतेचे प्रतीक आहे. ताक दुधाचे पक्व रूप आहे जे घुसळल्यावर लोणी वर तरंगते जे आणखी पौष्टिक, परिपक्व असते. तसेच आपल्या विद्ववत्तेच्या परिपाकातून प्राप्त होणाऱ्या ज्ञानप्राप्तीमूळेे आपण शांत, स्थिर बनतो, विरक्त बनतो, कुशल बनतो. माखनचोर रूप हे प्रेमाची प्रतिष्ठा वाढवणारे, विरक्ती मुळे प्राप्त होणारी मोहिनी आणि कौशल्य दर्शवणारे आहे.

मोरमुकुटधारी

राजावर संपूर्ण राज्याची जबाबदारी असते, जी मुकुटासारखी त्याच्या डोक्यावर असते, जी डोईजड वाटू शकते. परंतू आईला आपल्या बाळाची जबाबदारी ‘जड‘ वाटते कां ? तसे कृष्णाने त्याच्या सर्व जबाबदाऱ्या मोरपिसासारख्या लीलया आणि सहजतेने पार पाडल्या.

आपल्या प्रत्येकामध्ये असणारी सहजता, आकर्षकपणा आणि आनंद म्हणजेच कृष्ण होय. जेंव्हा चंचलता, चिंता आणि आशा अपेक्षा नसतील, जेथे गाढ शांती असते तेथे कृष्णाचा जन्म होतो.

जन्माष्टमीचा संदेश हाच आहे की, समाजामध्ये आनंदाची लहर पसरवण्याची वेळ आली आहे. शांत आणि आनंदी बना.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

जन्माष्टमी म्हणजे केवळ श्रीकृष्णाचा वाढदिवस नसून, तो आपल्या स्वतःच्या आत असलेल्या आनंदाचा आणि ईश्वरी तत्त्वाचा जन्म आहे. श्री श्री रविशंकर जी यांच्या मते, कृष्ण हे आनंदाचे प्रतीक आहेत आणि जेव्हा आपण अंतर्मुख होतो, तेव्हा त्या परमात्म्याचा अनुभव येतो.
‘जन्माष्टमी’ म्हणजे अजन्म्याचा जन्म. जो कधीही जन्माला येत नाही आणि ज्याचा कधीही अंत होत नाही, अशा निराकार चैतन्याचा साकार रूपात प्रकट होण्याचा दिवस म्हणजे जन्माष्टमी. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की देव आपल्यापासून लांब नसून आपल्यातच आहे.
आध्यात्मिक भाषेत, देवकी म्हणजे हे शरीर (Physical Body) आणि वसुदेव म्हणजे प्राण (Life Force/Breath). जेव्हा प्राण आणि शरीर एकाग्र होतात, तेव्हा आनंदाचा म्हणजेच श्रीकृष्णाचा जन्म होतो.
कंस हा मानवी अहंकाराचे (Ego) प्रतीक आहे. अहंकार हा नेहमी आनंदाच्या (कृष्ण) विरोधात असतो. जिथे अहंकार असतो, तिथे खरा आनंद टिकू शकत नाही. म्हणूनच कंस कृष्णाला मारण्याचा प्रयत्न करतो, पण शेवटी सत्याचा आणि आनंदाचा विजय होतो.
अष्टमी ही चंद्राची आठवी तिथी आहे. हा दिवस संतुलन दर्शवतो—अर्धा प्रकाश आणि अर्धा अंधार. श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम आहेत, जे आध्यात्मिक आणि भौतिक अशा दोन्ही जगाचा समतोल राखतात. म्हणूनच त्यांचा जन्म अष्टमीला झाला, जे पूर्णतेचे प्रतीक आहे.
दहीहंडी हा उत्सव मनातील माखन (शुद्धता) चोरणाऱ्या श्रीकृष्णाची आठवण करून देतो. हे प्रतीक आहे की ईश्वराला केवळ शुद्ध मन आणि भक्ती प्रिय आहे. सामुदायिक प्रयत्नातून ध्येय गाठणे (हंडी फोडणे) हा देखील यामागचा सामाजिक संदेश आहे.
जन्माष्टमी साजरी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ध्यान (Meditation), भजन आणि सेवा. श्री श्री रविशंकर जी सांगतात की, जेव्हा आपण शांत बसून ध्यान करतो, तेव्हा आपल्यातील ‘कृष्ण तत्त्व’ जागृत होते, ज्यामुळे जीवनात उत्साह आणि शांती येते.
माखन (लोणी) हे दुधाचे सार आहे. ज्याप्रमाणे दह्याचे मंथन केल्यावर लोणी मिळते, तसेच ध्यानाच्या मंथनातून मनाचे सार म्हणजे भक्ती मिळते. श्रीकृष्ण ही भक्ती चोरतात, म्हणजेच ते भक्ताच्या मनावर अधिराज्य गाजवतात, म्हणून त्यांना ‘चित्तचोर’ किंवा ‘माखनचोर’ म्हणतात.

    Wait!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

     
    *
    *
    *
    *
    *