एज्युकॉन २०१४ ने भारतीय युवकांना ‘आदर्श’ बनण्यासाठी प्रोत्साहीत केले (Indian Youths lead by Example in Marathi)

राजेश कुंडू ०७७६२८२७१०९
रांची, झारखंड :  “भारतामध्ये एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात तरुणांची संख्या ६६% आहे जी खूप जास्त आहे. यामधील जवळपास ४०% तरुण ३० ते ३५ वयोगटातील आहेत, आणि हेच आपल्या देशाचे सामर्थ्य आणि क्षमतेचे प्रतिबिंब दर्शवते. तथापि दिवसेंदिवस व्यसनाधिनतेचे वाढत असलेले प्रमाण हे मोठे आव्हान बनत आहे. पंजाब मध्ये तर याचे प्रमाण चिंताजनक झाले आहे”, असे मत रांची विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.रझिउद्दीन यांनी व्यक्त केले. ते एज्युकॉन २०१४ चे प्रमुख पाहुणे होते. ही परिषद आर्ट ऑफ लिव्हींगने ‘शिक्षणाच्या माध्यमातून मानवी मुल्ये रुजवणे’, या विषयासाठी २७ सप्टेंबर,२०१४ रोजी राज्याच्या राजधानीमध्ये कॅपिटल हिल येथे आयोजित केली होती.

“भारतातील युवकांमध्ये साक्षरतेचे सरासरी प्रमाण ७४% आहे, म्हणून आपण अविकसित देश संबोधू शकत नाही’ ते म्हणाले, तथापि त्यांनी युवकांकडे इच्छा व्यक्त केली की, “यातून भक्कम पावले उचलून, यातून बाहेर पडण्यासाठी प्रोत्साहीत व्हावे.”  बौद्धीक स्थलांतराबाबत बोलताना ते म्हणाले, “परदेशी स्थित भारतीय देशात परत येऊ इच्छितात, परंतु त्यांचा ‘स्वीकार’ ही समस्या आहे.

परिषदेचे सभागृह विश्वविद्यालयीन, महाविद्यालयीन, शाळकरी, कार्पोरेट सेक्टर, वैद्यकीय संस्था तसेच गृहिणी, अशा समाजातील विविध स्तरातील व्यक्तींनी खचाखच भरले होते.

झारखंड शासनाचे उच्च शिक्षण विभागाचे माजी संचालक, के.के. श्रीवास्तव यांनी आर्ट ऑफ लिव्हींगच्या सहभागाची, खास करून सुदर्शन क्रियेची प्रशंसा केली. जिच्या मदतीने ते तणावामध्ये देखील शांत राहू शकले. पुढे ते म्हणाले, “अलीकडील मंगळ - स्वारी काही अचानक सहज साध्य गोष्ट नाही तर भारताने वराह मिहीर आणि आर्यभट्ट यांच्या कालापासून याबाबतीत प्रामुख्याने प्रयत्न केले आहेत. सध्याच्या काळातील युवकांच्या बहुतांशी समस्याचे समाधान शोधण्यासाठी सध्याच्या पिढीमध्ये नैतिक मुल्ये रुजवणे गरजेचे आहे. परंतु प्रश्न हा आहे की, आजची पिढी मानवी मुल्ये शिकत आहेत कां?”

 या कार्यक्रमातील प्रमुख पाहूणे, सेन्ट्रल युनिव्हर्सिटीचे डीन. डॉ. तपस घोष म्हणाले, “आपल्या शिक्षण संस्था मुलांच्यावर माहितीचा भडीमार करत आहेत, परंतु मूल्याधारित शिक्षण देत नाहीत. आपण या शिक्षण व्यवस्थेला सर्वांगीण दिशा देणे गरजेचे आहे. आपण हा मानवी मूल्यांचा ऱ्हास थांबवून आदर्श बनणे गरजेचे आहे. आपण सर्वजणच विद्यार्थी आहोत आणि ज्या दिवशी ‘आपण खूप शिकलो’ असे वाटेल, त्या दिवसापासून आपली अधोगती सुरु होईल.

निवृत्त डीएसपी आणि आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रशिक्षक श्री. पी.एन.सिंग यांनी बोकारो कारागृहातील आर्ट ऑफ लिव्हिंग शिबिरांमुळे कट्टर नक्षलवादी अतिरेकी सर्वसामान्य नागरिक कसे बनले, याबद्दल माहिती दिली. श्री विभू यांनी, आपण स्वतः आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त होऊन आनंद, शांती कशी प्राप्त झाली, याचे आत्मकथन केले. आता ते आपला स्वानुभव देशभर आर्ट ऑफ लिव्हींगच्या शिबिरांमधून सांगतात.

कार्यक्रमाच्या संयोजकांपैकी डॉ.पी.के.डेव्हीड, झारखंड राज्य प्रशिक्षक समन्वयिका सबिता सिंह(०९९५५१२०८६३) आणि श्री. पी.एन.सिंग(निवृत्त डीएसपी आणि आर्ट ऑफ लिव्हींग प्रशिक्षक) यांनी सर्वांचे आभार मानले.