झोपे साठी योगा (Yoga for sleep in Marathi)

बराच काळ चांगली झोप लागत नसेल तर तुमच्या शरीराची झीज प्रमाणा बाहेर होण्याची शक्यता जास्त असते. ह्या व्यतिरिक्त, अस्वस्थ वाटणे व गोंधळलेली मनस्थिती ही पुरेशी झोप न मिळण्याची लक्षणे असू शकतात. निद्रावस्थेत शरीरातील प्रत्येक पेशींच्या स्तरावर विश्द्राव्य (गरळ) काढण्याचे व झीज भरून काढण्याचे काम होत असते. म्हणूनच पुरेशी झोप (६ – ८ तास) मिळणे आवश्यक आहे.

निद्रानाशाच्या समस्येवर योगाभ्यास हा उत्तम तोडगा ठरू शकतो.  योगाभ्यासाच्या सरावाने दिवस भरात साठलेला तणाव निवळतो व रात्री शांत झोप लागते.

शांत झोप अनुभवणे सहज शक्य आहे. ह्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे झोपण्या आधी करण्याची काही आसने. त्यासाठी काही आसने पुढे नमूद केलेली आहेत.

हस्तापादासन : पाठीचे स्नायू ताणले जातात, रक्त पुरवठा वाढल्याने मज्जासंस्था पुष्ट होते आणि पाठीचा कणा लवचिक राहतो..

मर्जरी आसन : पाठीच्या कण्याची लवचिकता टिकून राहते. पचन संस्थेलाही  चालना मिळते व त्याची कार्यक्षमता वाढते. ह्यामुळे शांत झोप लागते. रक्ताभिसरण वाढल्याने मन ही शांत होते

शिशु आसन: पूर्ण  विश्रांती देणारं हे आसन आहे.  मज्जासंस्था स्थिर झाल्याने झोपही शांत लागते.

बद्धकोनासन : तासंतास उभं राहिल्याने किवा चालल्याने आलेला थकवा घालवण्यासाठी उत्तम. मांड्यांचा आतील भाग, जांघा आणि गुडघे चांगलेच ताणले जातात.

विपरीतकरणी

  • पाठीवर झोपावे. एक पाय वर उचलावा, मग दुसरा पायही वर उचलावा. मग  भिंतीच्या आधाराने दोन्ही पाय वरच ठेवावेत.
  • दोन्ही हात बाजूने खांद्याच्या रेषेत आणावेत.
  • ह्याच स्थितीत दिर्घ  श्वासोच्छ॒वास चालू ठेवावा.पूर्ण विश्रांतीसाठी डोळ्यावर पट्टी बांधावी. आरामात राहता येईल तेवढा वेळ ह्याच स्थितीत राहावे. हळू हळू पाय खाली आणावे.

थकलेल्या पायांना आराम देण्यासाठी उत्तम, मेंदूला उत्तम प्रकारे रक्तपुरवठा होतो, डोकेदुखी पासून मुक्ती व मन शांत होते.

ह्या व्यतिरिक्त जेवणा नंतर शवासन आणि योग निद्र केल्याने सगळ्या स्तरांवर विश्रांती मिळते.

ह्या विषयातील तज्ञ म्हणतात की जर तुम्ही झोपेच्या आधीचा उपक्रम व झोपेची वेळ निश्चित ठेवलीत  तर बरोबर त्या वेळी तुमच्या शरीराला झोपण्याचे योग्य ते संकेत आपणहून मिळतील.  झोपण्या आधी नाडी शोधन प्राणायाम   केल्यासही शांत झोप लागते.

शांत झोपेसाठी आणखी काही सूचना:

  • संध्याकाळ नंतर भास्त्रीका किवा सुदर्शन क्रिया करू नये.तसं केल्याने खूप सारी उर्जा मिळते ज्यामुळे झोप येणे कठीण होईल.
  • रात्री उशीरा भयपट बघणे टाळावे, तसे केल्यास रात्रभर तशाच प्रकारचे विचार मनात रेंगाळत राहतात.  झोपण्यापूर्वी वीणा किवा इतर हलकं संगीत, मंत्रोच्चार किवा ज्ञान ऐकावं.
  • झोपेसाठी स्वता:च वेळापत्रक बनवावे. दिवसा झोपणे टाळावे कारण त्यामुळे जैविक संतुलन बिघडण्याचा संभव असतो. दुपारी फक्त अर्धा तास व रात्री आठ  तास झोप पुरेशी असते.
  • आपण दिवसभरात काय केले त्याचा आढावा घ्यावा. समाधानी रहावे, प्रार्थना करून आनंदी मनाने झोपावे,
  • रात्रीचे जेवण ८:३० पर्यंत आटपून घ्यावे. झोपण्याच्या २ तास आधी काहीही खाऊ नये.
  • तुमच्या प्रिय व्यक्तीशी भांडण झालेलं असेल तर झोपण्यापूर्वी ते मिटवून मगच झोपावे. नाहीतर झोपही शांत लागणार नाही व त्याचा प्रभाव दुस-या  दिवशी देखील जाणवेल.
  • तुम्हाला जर निद्रानाश आजार असेल तर शक्यतो रात्री उत्तेजक घेण्याचे टाळावे.

एक चांगले स्वास्थ्यपूर्ण आयुष्य निवडा

मार्च ११, १२ आणि १३ २०१६ रोजी होणारा जागतिक सांस्कृतिक उत्सव (वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल) म्हणजे दि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेवा, माणुसकी, अध्यात्म आणि मानवतावादी मुल्ये या क्षेत्रातील ३५ वर्षाच्या कार्याचे पर्व साजरे करणे होय. हा उत्सव म्हणजे संपूर्ण जगभरातील संस्कृतींमधील वैविध्य साजरे करताना मानवी समाजाचे सदस्य म्हणून आपल्यातील एकोप्याचे दर्शन घडवून आणेल.

www.artofliving.org/wcf