भुजंगासन म्हणजे काय
भुजंगासन भुजंग या शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ नाग आणि आसन म्हणजे मुद्रा. भुजंगासनाला कोब्रा स्ट्रेच असेही म्हणतात. हे आसन सूर्यनमस्कार तसेच पद्म साधनेमध्ये समाविष्ट आहे.

आपणास आपले ओटीपोट कमी करायचे आहे पण जिमला जाण्यासाठी वेळ मिळत नाही? जास्त कामाच्या ओझ्यामुळे आपणास थकवा, तणाव जाणवत आहे का?
या आणि इतर अनेक समस्या सोडवण्यासाठी घरी झोपून भुजंगासन करणे हा उपाय आहे. भुजंगासन हे एक असे आसन आहे जे आपण पोटावर झोपून करतो. हे आपल्या शरीराला (विशेषत: पाठीला) उत्तम ताण देते, ज्यामुळे आपला ताणतणाव लगेच दूर मदत होते.
भुजंगासन कसे करावे
- पायाची बोटे जमिनीवर सपाट ठेवून पोटावर झोपा, हाताचे तळवे खांद्याच्या शेजारी ठेवा; आपले कपाळ जमिनीवर ठेवा.
- आपले पाय जवळ ठेवा, पाय आणि टाच एकमेकांना अलगद स्पर्श करून ठेवा.
- दोन्ही हात अशा प्रकारे ठेवा की तळवे आपल्या खांद्याखाली जमिनीला स्पर्श करतील, कोपरं समांतर आणि शरीरालगत असावेत.
- दीर्घ श्वास घेत, हळू हळू आपले डोके, छाती आणि पोट वर करा. नाभी जमिनीवरच असू द्या.
- आपल्या हाताच्या आधाराने आपले धड मागे आणि जमिनीपासून दूर खेचा. दोन्ही तळहातांवर समान दाब देत असल्याची खात्री करा.
- आपल्या पाठीचा कणा, एक एक मणका वाकत असतो, त्यावेळी सजगतेने श्वास घेत रहा. शक्य असल्यास, शक्य तितक्या आपल्या पाठीला कमान करून आपले हात ताठ करा; आपले डोके मागे सोडून द्या आणि वर बघा.
- ४-५ दीर्घ श्वास घेत आसन स्थिर ठेवा.
- आता, श्वास सोडा आणि हळूवारपणे आपले पोट, छाती आणि डोके जमिनीवर परत आणा आणि आराम करा.
- ४-५ वेळा पुनरावृत्ती करा.
भुजंगासन व्हिडिओ
भुजंगासनाचे फायदे
- खांदे आणि मान सैल करते आणि तेथील वेदना कमी होतात.
- ओटीपोट कमी करते.
- संपूर्ण पाठ आणि खांदे मजबूत करते.
- पाठीच्या वरच्या आणि मधल्या भागाची लवचिकता सुधारते.
- छातीचा विस्तार होतो.
- रक्ताभिसरण सुधारते.
- थकवा आणि तणाव कमी होतो.
- दम्यासारखे श्वसनाचे विकार असणाऱ्यांसाठी उपयुक्त.
पूर्वतयारी
जास्तीत जास्त लाभ होण्यासाठी हे आसन आदर्श शारीरिक अवस्थेत करणे उत्तम.
- हे आसन जेवणानंतर ४-५ तासांनी करा. यामुळे आपण आपल्या पोटावर झोपल्याने अस्वस्थ होणार नाही.
- आपले हात, खांदे, मान आणि पाठ मोकळे होण्यासाठी काही मूलभूत वॉर्म-अप आणि स्ट्रेचिंग व्यायाम नक्की करा.
- योगासनांचा सराव सकाळीच करणे उत्तम. तथापि, आपणास शक्य नसल्यास, संध्याकाळी वेळ काढा.
पूर्वतयारीची आसने
जेव्हा आपण या पूर्वतयारीच्या आसनांचा चांगला सराव करता तेव्हा भुजंगासन अधिक सहजपणे करता येते:
- अधो मुखश्वानासन
- सलंब भुजंगासन
आता आपण भुजंगासन करू शकता. हे अगदी सोपे आहे, विशेषतः या टप्प्याटप्प्याच्या मार्गदर्शनासह.
नवशिक्यांसाठी टिप्स
चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवा आणि श्वास घेत रहा. हसऱ्या चेहऱ्याने केलेल्या भुजंगासनाचे बरेच फायदे आहेत आणि प्रत्येकजण ते करू शकते. काही जणांना हे असं न करण्याचा सल्ला दिला जातो.
- आसन झटक्यात करणे आणि खूप ताणणे टाळा.
- आपण सहजतेने आपले खांदे आपल्या कानापासून दूर नेवू शकता. आपला हात कोपरात वाकलेला असला असला तरी त्यांना सहज स्थितीत ठेवा. नियमित सरावाने, आपले कोपर ताठ करून ताण अधिक गहिरा करू शकाल.
- तुमचे पाय अजूनही स्पर्श करून आहेत याची खात्री करा.
- स्थिती स्थिर राखताना, समान रीतीने श्वास घ्या.
- आपण गरोदर असाल तर भुजंगासन टाळा.
- आपली बरगडी किंवा मनगट फ्रॅक्चर झाले असल्यास किंवा अलीकडेच हर्नियासारख्या ओटीपोटाच्या शस्त्रक्रिया झाल्या असल्यास हे आसन करू नका.
- तसेच, जर आपणास कार्पल टनल सिंड्रोमचा त्रास असेल तर भुजंगासन करणे टाळा.
- दम्याचा त्रास सुरु असताना भुजंगासन करू नका.
- पूर्वी जुनाट आजार किंवा पाठीच्या विकारांनी ग्रासले असेल तर मार्गदर्शनासाठी प्रशिक्षित प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली भुजंगासनाचा सराव करा.
आदर्शपणे सर्व योगासने प्रशिक्षित प्रशिक्षकाच्या योग्य मार्गदर्शनाखाली केली पाहिजेत. श्री श्री योग कार्यक्रम तसेच आमच्या योग कार्यक्रमांचा ऑनलाइन शोध घ्या.
योगाभ्यास केल्याने शरीर आणि मन विकसित होण्यास मदत होते, तरीही हा औषधाला पर्याय नाही. प्रशिक्षित योग प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली योग शिकणे आणि सराव करणे आवश्यक आहे. कोणताही वैद्यकीय आजार असल्यास आपल्या डॉक्टरांचा आणि श्री श्री योग प्रशिक्षकाचा सल्ला घेतल्यानंतरच योगाभ्यास करा.
सर्व योगासने मागील योगासन : धनुरासन पुढील योगासन: सलंब भुजंगासन










