सुदर्शन क्रिया – लयबद्ध श्वसन प्रक्रिया – उपचारात्मक श्वास (Sudarshan Kriya Marathi)

‘सु’ म्हणजे योग्य, ‘दर्शन’ म्हणजे दृश्य आणि ‘क्रिया’ ही शुद्धीकरण प्रक्रिया होय. सुदर्शन क्रिया म्हणजे निव्वळ शुद्धीकरण प्रक्रिया होय. ज्यामध्ये एखाद्याला आपल्या अस्तित्वाचे खरे दर्शन घडते. हा सराव म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांच्यामध्ये सुसंवाद घडवणारे साधन होय.

१९८२ पासून सुदर्शन क्रिया- जी शक्तिशाली उपचारक, लयबद्ध श्वसन प्रक्रिया, आर्ट ऑफ लिव्हिंगचा पाया आहे. १९८२ साली शिमोगा मधील पहिल्या शिबिरामध्ये श्री श्री रविशंकरजीनी सुदर्शन क्रिया शिकवली. गेल्या २९ वर्षामध्ये श्री श्रीं नी आर्ट ऑफ लिव्हिंगची शिबिरे आणि सुदर्शन क्रिया यांच्या माध्यमातून लाखो लोकांना योगा, प्राणायाम आणि ध्यानाची ओळख करून दिली आहे.