योग करा आणि उंची वाढवा (Height grow tips in Marathi)

”“मी बुटका नाही तर हे जगच उंच आहे, माझी उंची आणखी थोडी हवी होती. ”मी मोठा होत असताना माझ्या उंचीलाच काय झाले?”

हे जग आणखी थोडे चांगले दिसावे म्हणून गिड्डया व्यक्तींना असे वाटत असते कि त्यांची उंची आणखी थोडी जास्त असायला हवी होती. खरे तर उंचीचा आपला मूळ स्वभाव, व्यक्तिमत्व आणि आपल्या कार्यक्षमतेवर काडीमात्र फरक होत नाही.

खरे तर या जगावर मोठा प्रभाव पाडलेल्या बहुतांशी व्यक्ती गिअड्ड्याच आहेत. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची उंची ५’५”, फ्रेंच तत्वज्ञ, लेखक वोलटेअर यांची उंची ५’३”, प्रसिध्द सोवियत अंतराळवीर युरी गॅगरीन ५’२”, जीम्नॅस्ट शॉन जॉन्सन फक्त ४’९”, प्रसिध्द टीकाकार लेखिका ५’१”.

म्हणून उंच व्हायला नको, असे कोठे आहे? मग उंची वाढण्याचे काही नैसर्गिक उपाय आहेत कां?

आहे ! योगामुळे तुमच्या पाठीचा कणा ताणतो, पाठ आणि पायाचे स्नायू ताणले जातात आणि तुमची अंगकाठी सुधारून उंची वाढणे शक्य आहे. योगामुळे शरीरातील विषारी द्रव्यांचा निचरा होऊन निरोगी पेशींच्या वाढीस चालना मिळते. नियमित योग साधना तणाव नाहीसा करून विश्राम देते. अंतिमतः शरीरातील संप्रेरकांचे स्त्रवणे वाढून उंची वाढते.

आपली उंची वाढवण्यासाठी योग | Yoga to increase your height

खरे तर, हे प्राचीन भारतीय तंत्रच तुमच्या उंची वाढण्याच्या शंकांवर उत्तर होऊ शकते, साधी आणि विनासायास पद्धत! आश्चर्यचकित झालात?

जेंव्हा मन शिथिल आणि तणावरहित असते तेंव्हा शरीर वृद्धी कारक संप्रेरक (Growth Hormone) निर्माण करते [Growth : वृद्धी / वाढ, Hormone : संप्रेरक] जे उंची वाढण्याला कारणीभूत असते. सहज शरीराची योग्य ढब संपादन करणे फार महत्वाचे आहे आणि ते मिळवणे योगाच्या सरावाने शक्य होते.

श्री श्री योग हे ५ दिवसाचे शिबीर आहे जे योगासनांच्याद्वारे मनःस्थिती सुधारणे आणि शरीराला अधिक मजबूत बनवण्यावर लक्ष केंद्रित करते. काही मिनिटे नियमित योगाचा सराव केल्याने तुमची शारीरिक वाढ होते आणि तुमचे मन अधिक शांत होते. तुमची उंची वाढवण्यात मदत करू शकणारी योगासने कोणती ती आपण पाहूया.

1

भुजंगासन

 
Bhujangasana (Cobra Pose)
  • पाठीचे स्नायू मजबूत बनतात.
  • पाठीचा कणा लवचिक बनतो.
  • उत्तम शारीरिक ठेवण प्राप्त होण्यास मदत होते.
  • ताण-तणाव बाहेर पडतात.

 

2

वृक्षासन आणि ताडासन

 
  • पाठीचा कणा ताठ आणि उंच बनतो.
  • गुडघे आणि मांड्या मजबूत बनतात.
  • शरीराची ढब सुधारते.
  • शरीराचा समतोल सुधारून तुम्ही स्थिर आणि लवचिक बनता.
  • बौद्धिक समन्वय सुधारतो.
  • श्वास स्थिर, खोल बनतो.
3

नटराजासन

 
  • मानेच्या आणि पोटाच्या स्नायूंना ताण मिळतो आणि ते मजबूत बनतात.
  • पाठीच्या खालील भागातील आणि कंबरेच्या स्नायूंना ताण मिळून ते सशक्त बनतात.
  • पाठीचा कणा लवचिक बनतो.
4

मार्जरी आसान

 
 
  • कणा लवचिक बनतो.
  • खांदे मजबूत बनतात.
  • रक्ताभिसरण सुधारते.
  • शरीरात प्राणवायूचा साठा करण्याची क्षमता वाढू लागते.
  • तणाव नाहीसा होऊन मन शांत होते.
5

सूर्य नमस्कार

 
surya namaskar

१२ संचाची योगासनांचा चक्राकार असणारा हा सराव तुम्हाला थोड्याच अवधीत तुमचे सांधे आणि स्नायू मोकळे करण्यात मदत करतो.सूर्य नमस्कार, सूर्य देवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा बारा आसनांचा संच. यांचा व्यवस्थित सराव केल्याने शरीर, श्वास आणि मन यामध्ये समन्वय प्राप्त होतो.. सूर्यनमस्कार शिकण्यासाठी येथे क्लिक करा

  • सर्व स्नायू आणि सांधे मजबूत बनतात.
  • रक्ताभिसरण व्यवस्थित होते.
  • पचनक्रिया सुधारते.
  • शरीरातून विषारी द्रव्यांचा निचरा होतो.
  • अंतःस्त्राव ग्रंथींचे स्त्रवणे सुधारते.
  • निद्रानाश नाहीसा होतो.
  • अकारण चिंता दूर होते.

चिकाटीने घातलेल्या सूर्य नमस्कारांचा लाभ डोक्याच्या केसांपासून तळपायापर्यंत होतो. हे निव्वळ स्नायू आणि सांध्यांनाच लाभदाई नाहीतर सर्व अवयवांना याचा लाभ होतो.

 

जर तुम्हाला तुमची उंची आणखी वाढवायची असेल तर सकस आणि सात्विक आहारासोबत वर नमूद योगासने करा. आसनांमुळे तुमचा कणा आणि इतर अवयव देखील लांबू लागतात. तसेच शरीरातून विषारी द्रव्ये नाहीशी होऊन निरोगी पेशी आणि संप्रेकारांची उत्पती होऊ लागते. हे थोडे चिकाटीचे काम आहे पण दैनंदिन योग सरावाने ते साध्य होते. उंची वाढवण्यासाठी योग हा वाढत्या वयामध्ये उपयुक्त आहे.

योग ही प्राचीन कला आहे. जिचा नियमित सराव केल्याने चमत्कार घडून येईल. दुसऱ्या कोणत्याही सरावाप्रमाणेच आपण योगसुद्धा एका प्रशिक्षित तज्ञांकडून शिकला पाहिजे. श्री श्री योग शिबिरामध्ये प्रशिक्षित तज्ञ तुम्हाला निरनिराळ्या आसनांचे मार्गदर्शन करतात आणि तुम्हाला तुमच्या शरीरात जमा झालेल्या तणावापासून मुक्ती मिळवून देण्यात मदत करतात. श्री श्री योग प्रशिक्षक तुमच्या गरजेनुसार तुमच्या अनुरूप योग्य दिनचर्या आखून देण्यात मदत करतील.

 

योग सराव,शरीर आणि मन विकसित करून स्वस्थ ठेवते. परंतु ते औषधांसाठी पर्याय नाही. प्रशिक्षित श्री श्री योग शिक्षकाच्या च्या देखरेखीखाली योगाभ्यास करणे महत्त्वाचे आहे.कोणत्याही वैद्यकीय कारणासाठी,डॉक्टर आणि एखाद्या श्री श्री योग प्रशिक्षकाशी सल्लामसलत केल्यानंतरच योगाभ्यास करावा.

श्री श्री योग शिबीर आपल्या जवळच असलेल्या आर्ट ऑफ लिविंग केंद्रावर शोधा. आपणास शिबिराबद्दल माहिती हवी असेल किंवा अभिप्राय पाठवायचा असल्यास आम्हाला लिहून कळवा - info@srisriyoga.in.