योगा आणि गर्भावस्था (Yoga and pregnancy in Marathi)

योगाचा सराव तुम्हाला बाळंतवेणा आणि बाळंतपण याकरीता मनाने आणि शरीराने तयार होण्यास मदत करतो. कारण योगामुळे तुम्ही केंद्रित होता. तुम्ही अविचल आणि निरोगी बनता. योगासने ही सौम्य पद्धती आहे तुमच्या शरीराला कार्यशील आणि लवचिक ठेवण्याची आणि सकाळी वांती होणे आणि बद्धकोष्ठता यासारखी सामान्य गर्भावस्थेतील लक्षणे कमी करण्याची. याने बाळंतवेणा सुसह्य होतात आणि गर्भाशय आणि गर्भनलिका यातील तणाव कमी करून आणि ओटीपोट उघडे करून बाळंतपण निर्विघ्नपणे पार पाडण्यात मदत होते.

गर्भावस्थेत योगा करताना घ्यावयाची काळजी

पहिल्या तिमाहीमध्ये उभ्याने करावयाची योगासने करावीत. कारण त्याने पायांना बळकटी मिळते,रक्ताभिसरण सुधारते, ऊर्जेची निर्मिती होते आणि पायात येणारे पेटके बंद होतात.

दुसऱ्या तिमाहीमध्ये तुम्ही आसने करण्याचा समय कमी करावा. त्याने थकवा आणि शीण येणार नाही. त्याऐवजी श्वसन आणि ध्यान यावर अधिक लक्ष केंद्रित करावे.

तसेच गर्भावस्थेच्या दहाव्या आठवड्यापासून ते चौदाव्या आठवड्यापर्यंत सराव करू नये. कारण हे दिवस अतिशय महत्वाचे आहेत. ओटीपोटाला प्रमाणाबाहेर ताणू नये. शरीराला पीळ देणारी आसने करताना जास्त भर खांदे आणि पाठीच्या वरच्या भागावर द्यावा. ओटीपोटावर अजिबात तणाव येऊ देऊ नये. उलटे होणे पूर्णपणे टाळावे.

गर्भावस्थेत करावयाची योगासने

खाली दिलेली योगासने तुम्हाला गर्भावस्थेतील लक्षणे, सहज आणि सुलभ बाळंतपण आणि बाळंतपणानंतर जलद पूर्ववत होणे यात मदत करतात. पोटावर दबाव पाडणारी आसने आणि इतर अवघड आसने गर्भावस्थेच्या प्रगत टप्प्यामध्ये करू नयेत. ही दिलेली सर्व आसने तुम्ही करायलाच पाहिजे असे नाही. तुमच्या शरीराचे ऐका आणि केवळ तेवढेच करा जे तुम्ही सहजपणे करू शकता.

 

 

Interested in yoga classes?