मोक्ष / निर्वाण म्हणजे काय ? | Meaning of Nirvana or Moksha in Marathi

मोक्ष / निर्वाण काय आहे ? Nirvana (Moksha) in Marathi

संतुलन प्राप्त करणे आणि इच्छा नसणे - निर्वाण होय. इच्छा असणे म्हणजे अभाव आहे. जेंव्हा आपण म्हणतो की, ’मला काहीही नको, मी संतुष्ट आहे ‘ – निर्वाण होय. ज्ञानलालसा देखील ज्ञानप्राप्तीमध्ये बाधा बनते. सर्व भावना व्यक्ती, वस्तू आणि परिस्थितीशी निगडीत असतात. वस्तू, व्यक्ती आणि नातेसंबंधामध्ये अडकणे - मोक्ष आणि मुक्ती मध्ये बाधा होय. जेंव्हा मन सर्व इच्छा आणि धारणांपासून मुक्त होते तेंव्हाच मोक्ष प्राप्त होतो. ‘काहीही नाही अर्थात शून्य अवस्था‘ म्हणजेच निर्वाण, ज्ञानोदय, समाधी. ‘मी’ मधून ‘स्व’ मध्ये जाणे म्हणजे निर्वाण. मी कोण आहे?

सर्व काही बदलत आहे

जेंव्हा तुम्ही ‘स्व’ मध्ये खोल उतरता, तेंव्हा तुम्हाला विविध स्तर प्राप्त होतात, ते निर्वाण आहे. हे म्हणजे कांदा चिरण्यासारखे आहे. कांद्यामध्ये काय असते-काही नाही. जेंव्हा तुमच्या लक्षात येते की, सर्व नातेसंबंध, व्यक्ती, शरीर आणि भावना सारे काही बदलत आहे तेंव्हा दुःखाशी झुंझत असलेले मन ‘स्व’ मध्ये परत येते. ‘मी’ पासून ‘स्व’ मध्ये परतणे आपल्याला आनंद देऊन दुःखापासून मुक्ती देते. या आनंदी अवस्थेमध्ये विश्राम – निर्वाण होय.

मोक्ष प्रयत्नामुळे की विनासायास प्राप्त होतो ?

श्री श्री रविशंकर : “ दोन्हीमुळे ! हे एखादी रेल्वे पकडण्यासारखे आहे. जेंव्हा तुम्ही रेल्वेत चढता तेंव्हा विश्राम करायचा असतो. सतत हाच विचार करायचा नसतो की मला या स्टेशन वर उतरायचे आहे. आपल्याला निव्वळ विश्राम करायचा असतो, काहीही करायचे नसते. विश्राम करत बसायचे असते.”

जन्म आणि मृत्यूपासून स्वातंत्र्य – श्री श्री सोबत हास्य वार्तालाप